चालू घडामोडी १८ एप्रिल २०१८

चालू घडामोडी १८ एप्रिल २०१८

दिल्लीत ‘मिशन बुनियाद’चा शुभारंभ

दिल्लीत इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी दिल्ली सरकारने 11 एप्रिल 2018 रोजी ‘मिशन बुनियाद’ नावाने एका मोहिमेचा शुभारंभ केला आहे.

‘मिशन बुनियाद’ या मोहिमेमधून 3 महिन्यांच्या आत इयत्ता तिसरी ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना वाचन-लिखाण आणि सामान्य गणित याबाबत शिक्षण देण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.



प्रसिद्ध चित्रकार राम कुमार यांचे निधन 

भारतीय चित्रकार राम कुमार यांचे 14 एप्रिल 2018 रोजी निधन झाले. ते 93 वर्षांचे होते.

रामकुमार यांची ‘व्हेगाबॉण्ड’ आदी चित्रे आर्थिक-सामाजिक वास्तव दाखवणारी होती. 1996 साली त्यांची एकट्याची ‘राम कुमार: ए जर्नी वीदीन’ प्रदर्शनी भरविण्यात आली होती.



तायपेई चॅलेंजर 2018: युकी भांबरीने आपले पहिले वैयक्तिक चॅलेंजर अजिंक्यपद जिंकले 

भारतीय टेनिसपटू युकी भांबरी ह्याने तायपेई चॅलेंजर 2018 च्या अंतिम लढतीत भारताच्याच रामकुमार रामनाथन ह्याचा पराभव करून स्पर्धा जिंकली आहे.

युकी भांबरीचे सत्र 2018चे हे पहिलेच वैयक्तिक चॅलेंजर अजिंक्यपद आणि कारकिर्दीतले सातवे चॅलेंजर अजिंक्यपद आहे.

तायपेई चॅलेंजर (किंवा संताइझी ATP चॅलेंजर) ही तायवानमधील तायपेई शहरात 2014 सालापासून आयोजित केली जाणारी एक टेनिस स्पर्धा आहे. ही स्पर्धा ATO चॅलेंजर टूरचा एक भाग आहे आणि ती इनडोअर कार्पेट कोर्टवर खेळली जाते.



ब्रिटनमध्ये CHOGM 2018 परिषदेचे आयोजन 

लंडन (ब्रिटन) येथे 19 एप्रिल व 20 एप्रिल 2018 या दोन दिवसात राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांची बैठक (Commonwealth Heads of Government Meeting -CHOGM 2018) चालणार आहे.

सन 2009 नंतर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच प्रमुख ठरतात ज्यांनी आपली उपस्थिती या परिषदेत दाखवली.

राष्ट्रकुल संसदीय संघटना (Commonwealth Parliamentary Association -CPA) याची स्थापना 1911 साली ‘एम्पायर पार्लीमेंटरी असोसिएशन’ म्हणून करण्यात आली. ही संघटना सुव्यवस्था, लोकशाही आणि मानवाधिकारांचे समर्थन करण्यासाठी कार्य करते. याचे मुख्यालय सचिवालय लंडनमध्ये आहे.


NASA नव्या ग्रहांचा शोध घेण्यासाठी TESS दूर्बिण पाठवविणार 
अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिसट्रेशन (NASA) संस्थेनी अन्य ग्रहावर जीवनाचे संकेत शोधण्यासाठी ‘ट्रांझिटिंग एक्झोपॅनेट सर्व्हे सॅटलाइट’ (TESS) ही शोध मोहीम 16 एप्रिल 2018 रोजी अंतराळात पाठवली आहे.

TESS ही एक अंतराळ दूर्बिण असून या मोहिमेमधून सूर्यमालेच्या बाहेर ग्रहांचा शोध घेतला जाणार आहे. हे यान स्पेस एक्सच्या ‘फॉल्कन 9’ अग्निबाणाने फ्लोरिडा येथील प्रक्षेपण केंद्रावरून सोडण्यात आले आहे.

TESS मध्ये वाइड-फील्ड कॅमेरे बसविलेले आहेत. यांचा वापर करून दोन वर्षांच्या कालावधीत आपल्या सूर्याभोवती असलेल्या 200,000 तार्‍यांचा वेध घेतला जाणार आहे.



अमेरिकेच्या ‘करंसी वॉच लिस्ट’मध्ये भारताचा समावेश
अमेरिकेच्या प्रशासनाने आपल्या ‘करंसी वॉच लिस्ट’मध्ये भारताचा समावेश केला आहे.

भारतासोबतच चीन, जर्मनी, जपान, कोरिया आणि स्वित्झर्लंड या देशांचाही समावेश करण्यात आला. यादीत त्या प्रमुख व्यापारी भागीदार देशांचा समावेश करण्यात आला आहे ज्यांच्या चलनविषयक धोरणांवर लक्ष ठेवल्या जाने आवश्यक आहे.



‘न्यू यॉर्क टाइम्स’ आणि ‘द न्यू यॉर्कर’: पुलित्झर पुरस्कार विजेता 

‘न्यू यॉर्क टाइम्स’ आणि ‘द न्यू यॉर्कर’ हे सार्वजनिक सेवेसाठी 2018 सालच्या पुलित्झर पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

ऑक्टोबर 2017 मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानंतर 100 पेक्षा जास्त स्त्रियांनी सार्वजनिकरित्या लैंगिक अत्याचारापासून ते बलात्कारापर्यंत होणार्‍या दुर्व्यवहाराबाबत अनेक निर्मात्यांवर आरोप लावले गेले. 

त्यानंतर लैंगिक शोषणाच्या विरोधात ‘#मी टू’ आंदोलन चालवले गेले आणि पाहता-पाहता हे आंदोलन जागतिक झाले. आरोपींमध्ये बर्‍याच शक्तिशाली व्यक्तींचा समावेश आहे.

अन्य श्रेणीतले पुरस्कार –

तपास कार्यासह पत्रकारिता श्रेणी – द वॉशिंग्टन पोस्ट
आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रकारिता श्रेणी – न्यू यॉर्क टाइम्स आणि द वॉशिंग्टन पोस्ट (संयुक्त)
आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रकारिता श्रेणी – रूटर्स

पत्रकारिता क्षेत्रात वृत्तपत्रीय लिखाण, वाङ्मय रचनेसाठी सन 1917 पासून पुलित्झर पुरस्कार दिला जात आहे. या पुरस्काराची स्थापना अमेरिकेचे प्रकाशक जोसेफ पुलित्झर यांनी केली होती. दरवर्षी 21 प्रकारच्या साहित्य श्रेणीत हा पुरस्कार दिला जातो
Scroll to Top