२०००-२०१५ या कालावधीत LMI देशांमध्ये भारतात प्रतिजैविकांचा सर्वाधिक वापर झाला
नॅशनल अकॅडेमी ऑफ सायंसेसच्या नियतकालिकेत प्रसिद्ध एका अभ्यासानुसार, भारताकडून २००० ते २०१५ या कालावधीत कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये (LMICs) प्रतिजैविकांचा खप सर्वाधिक वाढल्याचे दिसून आले आहे.
नॅशनल अकॅडेमी ऑफ सायंसेसच्या नियतकालिकेत प्रसिद्ध एका अभ्यासानुसार, भारताकडून २००० ते २०१५ या कालावधीत कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये (LMICs) प्रतिजैविकांचा खप सर्वाधिक वाढल्याचे दिसून आले आहे.
या कालावधीत भारतात प्रतिजैविकांच्या वापरात १०३% ची वाढ नोंदवली गेली आहे. भारतानंतर चीन आणि पाकिस्तान यांचा क्रमांक लागतो.
२०१५ मध्ये अती प्रतिजैविकांच्या वापरात अमेरिका, फ्रांस आणि इटली हे प्रगत देश तर LMIC श्रेणीतील भारत, चीन आणि पाकिस्तान हे देश सर्वात मोठे ग्राहक आहेत.
अती प्रतिजैविकांच्या वापराची ही समस्या अशीच पुढे राहिल्यास, २०३० सालापर्यंत अगदी साध्या संक्रमणासाठीही कोणतेही प्रतिजैविक काम करणार नाही, असा इशारा अहवालात वर्तविण्यात आला आहे.
मणिपूरचे माजी मुख्यमंत्री आर. के. दोरेंद्र सिंग यांचे निधन
मणिपूरचे माजी मुख्यमंत्री आर. के. दोरेंद्र सिंग यांचे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.
आर. के. दोरेंद्र सिंग सन १९७४-१९९३ या कालावधीत राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री बनले होते. त्यापूर्वी ते मणिपूर विधानसभेचे सभापती होते.
हरियाणाचा मेवात जिल्हा भारतातला सर्वात मागासलेला जिल्हा
NITI आयोगाच्या अहवालानुसार, हरियाणाचा मेवात जिल्हा देशातला सर्वात मागासलेला जिल्हा ठरला आहे.
आयोगाने देशातल्या १०१ महत्वाकांक्षी (मागासलेला) जिल्ह्यात मेवातनंतर अनुक्रमे आसिफाबाद (तेलंगणा), सिंगरौली (मध्यप्रदेश), किफिरे (नागालँड) आणि श्रावस्ती (उत्तरप्रदेश) यांचा क्रमांक लागतो.
विजयनगरम (आंध्रप्रदेश), राजनांदगाव (छत्तीसगड), उस्मानाबाद (महाराष्ट्र), कडप्पा (आंध्रप्रदेश) आणि रामनाथपुरम (तामिळनाडू) या पाच जिल्ह्यांचे याबाबतीत सर्वात चांगले प्रदर्शन दिसून आले.
सर्वेक्षणात प्रत्येक जिल्ह्याचे लसीकरण, शाळा सोडणे, बाल मृत्युदर अश्या ४९ निर्देशकांमधून मूल्यांकन करण्यात आले आहे. ओडिशाचे १०, पश्चिम बंगालचे ४ आणि केरळचा एक जिल्हा लवकरच या यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे, त्यासाठी या जिल्ह्यांची ओळख पटविण्यात आली आहे.
आयोगाने या जिल्ह्यांमध्ये आपसी स्पर्धात्मक वातावरण तयार करून विकासास प्रोत्साहन देण्याचा उद्देश्य ठेवला आहे.
अमेरिकेची व्हिसा प्रक्रिया फक्त मुंबईतच होणार
व्हिसाशी संबंधित सर्व प्रक्रिया मुंबई येथील केंद्रावर होणार असल्याने दिल्लीतील अमेरिकी दूतावासाकडून येत्या एक एप्रिलपासून आयआर ५, आयआर १, आयआर २, सीआर १ किंवा सीआर २ या व्हिसांवर प्रक्रिया होणार नाही.
व्हिसाशी संबंधित सर्व प्रक्रिया मुंबई येथील केंद्रावर होणार असल्याने दिल्लीतील अमेरिकी दूतावासाकडून येत्या एक एप्रिलपासून आयआर ५, आयआर १, आयआर २, सीआर १ किंवा सीआर २ या व्हिसांवर प्रक्रिया होणार नाही.
तसेच त्यामुळे अमेरिकी नागरिकाचे पालक, पत्नी अथवा अल्पवयीन अपत्य यांना अमेरिकेत स्थलांतर करण्याच्या दृष्टीने व्हिसा मिळविण्यासाठी आता मुंबई गाठावी लागणार आहे.
ज्या व्यक्तींना दिल्लीतील कार्यालयाने मुलाखतीसाठी एक एप्रिलनंतरची तारीख पूर्वीच दिली असेल, त्यांना पत्र पाठवून नवे ठिकाण कळविले जाईल, असे अमेरिकी दूतावासातर्फे सांगण्यात आले आहे.
स्पेस एक्सचे फाल्कन-९ अग्निबाण १० उपग्रहांसह प्रक्षेपित
उद्योजक एलन मस्क यांची खाजगी कंपनी ‘स्पेस एक्स’ ने पुनर्वापरायोग्य तयार केलेले ‘फाल्कन-९’ अग्निबाण (प्रक्षेपक) १० दळणवळण उपग्रहांसोबत पृथ्वीच्या कक्षेत पाठविण्यात आले आहे.
अंतराळ संशोधन क्षेत्रात NASA ने एखाद्या उद्योजकासाठी पहिल्यांदाच व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
‘फाल्कन-९’ सोबत कंपनीचे ‘ड्रॅगन’ नामक यान आणि इरिडियम कम्युनिकेशन्सचे १० इरिडियम-नेक्सट उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात आले आहेत.
NASA मंगळाचा खोलवर अभ्यास करण्यासाठी आपली पहिली मोहीम पाठविणार
अमेरिकेच्या NASA ने मंगळ ग्रहाच्या आंतरिक बाजूचा अभ्यास चालविण्यासाठी आपली पहिली मोहीम पाठविण्याची योजना तयार केली आहे.
NASA ५ मे २०१८ रोजी ‘इनसाइट (InSight)’ मोहीम पाठविणार आहे. यामार्फत ग्रहावरील भूकंपाचे मापन करण्याकरिता सिस्मोमीटर उपकरण प्रस्थापित केले जाणार. याच्या माध्यमातून ४.५ अब्ज वर्षांपूर्वी मंगळ ग्रहाच्या जन्माबाबत माहिती प्राप्त केली जाणार आहे.