चालू घडामोडी २४ एप्रिल २०१८

चालू घडामोडी २४ एप्रिल २०१८

टीसीएस बनणार भारताची पहिली बिलियन डॉलर कंपनी 
भारताला लवकरच पहिली १०० बिलियन डॉलर कंपनी मिऴणार आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएस अर्थातच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडही आता पहिली १०० बिलियन डॉलर भारतीय कंपनी होणार आहे.कंपनीचे सध्याचे बाजारमूल्य सुमारे ६३४,१५५.६२ कोटी रुपये आहे.


टीसीएसही पहिली भारतीय कंपनी आता १०० बिलियन डॉलरच्या पंक्तीत येणार आहे. टीसीएसच्या शेअरच्या किंमतीत ६.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. एप्रिल २०१२ नंतरची ती सर्वात मोठी वाढ आहे.

तसेच टाटा समूहाच्या अत्यंत महत्वाच्या टीसीएसने एकास एक बोनस देण्याची घोषणा केली त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये यात गुंतवणूक करण्याचा उत्साह दिसून आला. सद्यस्थितीत टीसीएसचे बाजारमूल्य जवळपास ९९ बिलियन डॉलर्सच्या आसपास पोचले आहे.



पहिली भारतीय महिला फायर फायटर 
भारतीय विमान क्षेत्रातील पुरूषांचे वर्चस्व असलेच्या अखेरच्या क्षेत्रातही एका महिलेने आता प्रवेश केला आहे. एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) पहिल्यांदाच एका महिला फायर फायटरची नियुक्ती केली आहे.

तानिया सन्याल असे या पहिल्या महिला फायर फायटरचे नाव आहे. ती मुळची कोलकाताची असून लवकरच ती सेवेत रूजू होईल.

तानियाने वनस्पती शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तिला एएआयच्या पूर्व क्षेत्रातील विमानतळांसाठी नियुक्त करण्यात येणार आहे. यामध्ये कोलकाता, पाटणा, भुवनेश्वर, रायपूर, गया आणि रांचीचा समावेश आहे. कोलकाता प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यापैकी कोणत्याही एका विमानतळावर तिची नियुक्ती केली जाईल.



प्रसिद्ध तेलगू कवी बलांतरापू रजनिकांत राव यांचे निधन 
प्रसिद्ध तेलगू कवी आणि संगीतकार बलांतरापू रजनिकांत राव यांचे विजयवाडामध्ये निधन झाले आहे, ते ९८ वर्षांचे होते.

कवी बलांतरापू रजनिकांत राव यांनी अनेक दशक प्रसारभारतीच्या (AIR) विजयवाडा विभागाचे संचालक पद सांभाळलेले होते. त्यांनी 

‘आकाशवाणी’ची ओळख पट‍वून देणारी सुमधुर धून रचली. त्यांनी रचलेल्या पहिल्या तेलगू गीताचे प्रसारण १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री स्वतंत्र भारतात प्रसारित केले गेले होते.


गोल्फर राहिल गंगजी ह्यांनी पॅनासोनिक ओपन स्पर्धा जिंकली 
भारतीय गोल्फर राहिल गंगजी ह्यांनी जपानमध्ये खेळलेल्या ‘२०१८ पॅनासोनिक ओपन’ गोल्फ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

जपानच्या ओसाका शहराजवळील इबाराकी कंट्री क्लबच्या मैदानावर ‘पॅनासोनिक ओपन’ गोल्फ स्पर्धा जिंकून विजेत्याने १५० लक्ष येनचे (सुमारे $१.४ दशलक्ष) बक्षीस आणि विजेत्याचा निळा जॅकेट मिळवला.

‘पॅनासोनिक ओपन’ ही आशियाई टूरमधली एक गोल्फ स्पर्धा आहे. २०११ साली पहिल्यांदा ही स्पर्धा खेळली गेली होती.



इंग्रजी भाषा दिन २३ एप्रिल 
‘मल्टीलिंगुएलीजम अँड द यूएन’ या विषयाखाली २३ एप्रिल २०१८ ला जगभरात ‘इंग्रजी भाषा दिन’ आयोजित करण्यात आला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात दरवर्षी २३ एप्रिलला ‘इंग्रजी भाषा दिन’ पाळला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाची ६ भाषांना मान्यता आहे. या सहाही भाषांसाठी दरवर्षी एक दिन पाळला जातो. 

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा अधिकृत भाषा आहेत – फ्रेंच (२० मार्च), चीनी (२० एप्रिल), इंग्रजी (२३ एप्रिल), रशियन (६ जून), स्पॅनिश (२३ एप्रिल), अरबी (१८ डिसेंबर) 

२३ एप्रिल १६१६ रोजी प्रसिद्ध विल्यम शेक्सपियर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी २०१० साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सार्वजनिक माहिती विभागाने या दिनाची स्थापना केली.



इराणमध्ये सहावे ‘इंडियन ओशन नेव्हल सिम्पोझियम (IONS)’ आयोजित 
इराणची राजधानी तेहरानमध्ये २२ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत ‘इंडियन ओशन नेव्हल सिम्पोझियम (IONS) २०१८’ चे आयोजन करण्यात आले आहे.

इंडियन ओशन नेव्हल सिम्पोझियम (IONS) हिंद महासागर प्रदेशातील देशांतर्गत द्विवार्षिक बैठकीची एक शृंखला आहे. IONS मध्ये ३५ सदस्य राष्ट्र आणि ९ निरीक्षक देश आहेत. 

२०१८ मधील या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात इराणी नौदलाने दोन वर्षांसाठी IONS चे अध्यक्षपद स्वीकारले आहे.
Scroll to Top