चालू घडामोडी ३ एप्रिल २०१८

चालू घडामोडी ३ एप्रिल २०१८

मध्यप्रदेशातील ‘कडकनाथ’ कोंबडीला GI टॅग मिळाले 
चेन्नईच्या भौगोलिक संकेतांक नोंदणी कार्यालयाने ‘कडकनाथ’ कोंबडीसाठी भौगोलिक संकेतांक (Geographical Indication -GI) टॅग मध्यप्रदेशाला दिला आहे.


‘कडकनाथ’ ही एक वाण आहे, जी कोंबडीच्या वर्गात मोडते. ही कोंबडी पौष्टिकतेच्या दृष्टीने उत्तम असून त्यात २५-२७% प्रोटीन, जीवनसत्त्व ‘ब-१’, ‘ब-२’, ‘ब-६’, ‘ब-१२’, क, ई, नियासिन, कॅल्शियम, फॉस्फोरस आणि हिमोग्लोबिन यांचे प्रमाण भरपूर आहे. आता कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा सरकार या उत्पादनाच्या नावाचा अनाधिकृत वापर करू शकणार नाही.



विनीत जोशी राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे (NTA) पहिले महासंचालक 
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) चे माजी अध्यक्ष विनीत जोशी यांची राष्ट्रीय परीक्षा संस्था (National Testing Agency -NTA) चे पहिले महासंचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

उच्‍च शिक्षण संस्थांच्या प्रवेश परीक्षा आयोजित करण्यासाठी संस्था अधिनियम, १८६० अंतर्गत संस्थेच्या रूपात एक स्‍वायत्‍त आणि आत्‍मनिर्भर शीर्ष परीक्षा संघटना म्हणून ‘राष्‍ट्रीय परीक्षा संस्था (National Testing Agency -NTA)’ स्थापन केली जात आहे. 

NTA संरचनेत एक अध्‍यक्ष (मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे नियुक्ती), CEO, महानिदेशक पद आहे (भारत सरकार तर्फे नियुक्ती).

राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) CBSE, AICTE आणि अन्य संस्थांद्वारे उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्याकरिता प्रवेश परीक्षा आयोजित करणार. यामध्ये NET, CTET, NEET या परीक्षांचाही समावेश आहे. ही संस्था २०१९ सालापासून आपल्या कामकाजास सुरुवात करणार आहे.



मिझोरम राज्य शासनाने बंडखोर गटाबरोबर शांतता करार केला 
मिझोरम राज्य शासन आणि मणीपुरमधील हमार पीपल्स कन्व्हेन्शन (डेमोक्रॅटिक) यांच्यामध्ये २ एप्रिल २०१८ रोजी ऐझवालमध्ये शांतता करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

HPC (D) राज्यातील एकमेव सक्रिय बंडखोर गट आहे आणि आता शांतता कराराने या प्रदेशात कायमस्वरूपी शांतता आणता येऊ शकणार.



भारत – जगातला दुसरा सर्वात मोठा मोबाइल फोन उत्पादक देश 
मोबाइल उत्पादनाच्या बाबतीत भारत जगातला दुसर्‍या क्रमांकाचा देश बनला आहे.

चीनमध्ये सर्वाधिक मोबाइल हँडसेट उत्पादन घेतले जाते. या बाबतीत भारत व्हिएतनामला मागे टाकत दुसर्‍या स्थानी आला आहे.

२०१७ साली वैश्विक मोबाइल उत्पादनात भारताचा वाटा ११% होता, जो २०१४ साली ३% एवढाच होता. यामुळे देशात मोबाइल फोनच्या बाहेरून आयातीमध्ये देखील सन २०१७-१८ मध्ये अर्ध्याहून अधिक घट दिसून आली आहे. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत फास्ट ट्रॅक कार्यदलाने २०१९ सालापर्यंत हे उत्पादन ५० कोटीपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

केरळ फूटबॉल संघाने ‘संतोष करंडक २०१८’ जिंकला 
केरळ फूटबॉल संघाने कोलकातामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पश्चिम बंगालचा पराभव करत सहाव्यांदा संतोष करंडक आपल्या नावे करून घेतला आहे.

संतोष करंडक ही अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) अंतर्गत प्रादेशिक राज्य संघटना व शासकीय संस्थांद्वारा आयोजित केली जाणारी स्पर्धा आहे. १९४१ साली संतोष करंडक स्पर्धेची स्थापना करण्यात आली. संतोष करंडक ही देशांतर्गत खेळली जाणारी प्रमुख फूटबॉल स्पर्धा आहे.



अमेरिकेच्या रोझमेरी डीकार्लो पहिल्या महिला UN राजकीय प्रमुख 
अमेरिकेची राजदूत रोझमेरी डीकार्लो यांची संयुक्त राष्ट्रसंघांच्या राजकीय व्यवहार विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

यासोबतच, रोझमेरी डीकार्लो या संयुक्त राष्ट्रसंघांच्या राजकीय व्यवहारांचे प्रमुख झालेली जगातली पहिली स्त्री ठरली आहे. त्या जेफरी फेल्टमॅन यांच्याकडून पदभार स्वीकारतील. त्यांना लोक सेवा आणि शिक्षण क्षेत्रात ३५ वर्षांचा अनुभव आहे.

१९९२ साली स्थापित संयुक्त राष्ट्रसंघाचे राजकीय व्यवहार विभाग (UN Department of Political Affairs -DPA) हा संयुक्त राष्ट्रसंघ सचिवालयाचा एक विभाग आहे, जो जागतिक राजकारणाच्या विकासावर देखरेख ठेवण्यास आणि मूल्यांकन करण्यास जबाबदार आहे. 

तसेच UN चे सरचिटणीसांना आणि त्यांच्या दूतांना जगात शांती राखण्यास आणि संघर्ष टाळण्यास सल्ला पुरवते.



चीनची ‘तिएनगोंग-१’ अंतराळ प्रयोगशाळा भस्मसात 
‘तिएनगोंग-१’ नामक चीनची पहिली प्रायोगिक अंतराळ प्रयोगशाळा पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेशले असून दक्षिण प्रशांत महासागर क्षेत्रात त्याचे अवशेष बहुतेक कोसळणार आहे. मात्र वातावरणातील घर्षणाने उत्पन्न होणार्‍या उष्णतेमुळे हवेतच भस्मसात होण्याचे संकेत आहेत.

चीनच्या चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (CNSA) ने मे २०१७ मध्ये घोषणा केली होती की, ‘तिएनगोंग-१’ सोबत त्यांचा संपर्क मार्च २०१६ नंतर तुटला.

सप्टेंबर २०११ मध्ये ‘तिएनगोंग-१’ अंतराळात पाठविण्यात आले होते. ते पृथ्वीच्या कक्षेत ३५० किलोमीटर वरती प्रस्थापित केले गेले होते. सुमारे ९.४ टन वजनी, ३४ फुट लांबी व ११ फुट रुंदी असलेल्या या प्रयोगशाळेत दोन व्यक्ती राहू शकतील एवढी जागा होती. 



अंतराळात एक स्थायी अंतराळ केंद्र पाठविण्याच्या दृष्टीने ही एक यशस्वी मोहीम होती. रशियाने १९८६ साली अंतराळात पाठवलेले ‘मीर’ हे जगातले पहिले स्थायी अंतराळ स्थानक होते, जे २००१ साली निकामी झाली.
Scroll to Top