टॉप 10 शक्तीशाली व्यक्तींच्या यादीमध्ये पंतप्रधान मोदी
जगभरातील सर्वात शक्तीशाली अशा व्यक्तींची नावे असलेली यादी ‘फोर्ब्स’ने जारी केली आहे. या जारी केलेल्या नव्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगातील सर्वांत शक्तीशाली नेत्यांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे.
‘फोर्ब्स’च्या यादीत मोदींनी पहिल्या दहा नेत्यांच्या क्रमवारीत नववे स्थान प्राप्त केले आहे. तसेच या यादीमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग पहिल्या क्रमांकावर आहेत.
‘फोर्ब्स’कडून अशा प्रकारची यादी जारी करण्यात येते. ज्या लोकांनी देशासह जगाला बदलण्याचा प्रयत्न केला आणि विशेष कामगिरी केली, अशा लोकांना या यादीत स्थान दिले जाते. या यादीमध्ये पंतप्रधान मोदींनाही स्थान देण्यात आले आहे.
तसेच यातील विशेष बाब म्हणजे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग (13 वा क्रमांक), ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे (14 वा) आणि अॅपलचे सीइओ टीम कूक (24 वा क्रमांक) असून, त्यांच्यापेक्षाही पुढे पंतप्रधान मोदी आहेत.
महाराष्ट्रात एलईडी मासेमारीला बंदी
देशाच्या सागरी किनारपट्टी भागात केंद्राने प्रकाशझोतातील (एलइडी) मासेमारीस बंदी घातली आहे. आता या पाठोपाठ राज्यानेही राज्याच्या 12 सागरी मैल या राज्याच्या हद्दीत प्रकाशझोताचा वापर करून मासेमारीस तसेच बुलट्रॉलिंग व पेअर पद्धतीच्या मासेमारीस बंदी घातली आहे.
राज्याने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 याच्या कलम 3 नुसार गठित करण्यात आलेल्या सल्लागार समित्यांशी विचार विनिमय करून राज्याच्या सागरी जलधि क्षेत्रात म्हणजेच 12 सागरी मैल क्षेत्रात ट्रॉलिंग किंवा पर्ससीन किंवा गिलनेट किंवा डोलनेट यांचा वापर करणाऱ्या यांत्रिक तसेच यंत्रचलित मासेमारी नौकांना जनरेटरवर अथवा जनरेटर शिवाय चालणारे बुडीत, पाण्याखाली अथवा
पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगते कृत्रिम एलईडी लाइट, दिवे, माशांना आकर्षित करणारे दिवे किंवा कोणतीही इतर प्रकाश उत्सर्जित करणारी कृत्रिम उपकरणे यांचा वापर करणे किंवा ती बसविणे याला प्रतिबंध घातला आहे.
सचिन बंसल आणि बिन्नी बंसल या माजी IIT विद्यार्थ्यांनी 2007 साली फ्लिपकार्टची स्थापना केली होती. या सौद्याआधी जपानी ग्रुप सॉफ्टबँक 20.8%च्या भागीदारीने फ्लिपकार्टमधील सर्वात मोठा भागीदार होता आणि सॉफ्टबँकेकडे होता.
वायू प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी चीनने ‘गाओफेन-5’ उपग्रह अवकाशात सोडला
चीनने पृथ्वीच्या वातावरणाच्या व्यापक निरीक्षणासाठी ‘गाओफेन-5’ नावाचा ‘हायपर स्पेक्ट्रल इमेजिंग’ उपग्रह अवकाशात पाठवला आहे. चीनचे मुख्य प्रक्षेपक ‘लॉन्गमार्च’ याच्या सहाय्याने हा उपग्रह पाठवण्यात आला.
‘गाओफेन-5’ हा वायू प्रदुषणावर देखरेख ठेवू शकणारा पहिला चीनी उपग्रह आहे. वातावरण आणि भूमीचे व्यापक अवलोकन करण्यासाठी तयार करण्यात आलेला हा जगातला पहिला फूल-स्पेक्ट्रम हायपरस्पेक्ट्रल उपग्रह आहे.
हा वायू प्रदुषण, हरितगृह वायू आणि एरोसोल तसेच अतिनील किरणांपासून दीर्घ-तरंगी अवरक्त (IR) किरणांपर्यंत वर्णक्रमानुसार माहिती प्राप्त करण्यास सक्षम आहे.
जगातली दुसरी सर्वात जुनी शिळा ओडिशामध्ये
जगातली दुसरी सर्वात जुनी शिळा ओडिशामध्ये आढळून आलेली आहे. अंदाजानुसार ही शिळा जवळजवळ 4240 दशलक्ष वर्षे जुनी असावी.
कलकत्ता विद्यापीठ आणि मलेशियाचे कर्टिन विद्यापीठ आणि बीजिंगमधील चायनिज अकॅडेमी ऑफ जिओलॉजिकल सायन्स येथील संशोधकांनी भारतात केलेल्या भूशास्त्र संशोधनात जवळजवळ आठ वर्षांपूर्वी ओडिशाच्या केंदूझार जिल्ह्यामधील चंपुआ गावात ही शिळा आढळून आली होती.
पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या जॅक हिल या प्रदेशात 4,400 दशलक्ष वर्षे जुनी शिळा आढळून आलेली आहे, जी सर्वात जुनी आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मासेमारी नौका व त्यांना साहाय्य करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्यात येईल अशी अधिसूचना राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने जारी केली आहे.
राज्याने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 याच्या कलम 3 नुसार गठित करण्यात आलेल्या सल्लागार समित्यांशी विचार विनिमय करून राज्याच्या सागरी जलधि क्षेत्रात म्हणजेच 12 सागरी मैल क्षेत्रात ट्रॉलिंग किंवा पर्ससीन किंवा गिलनेट किंवा डोलनेट यांचा वापर करणाऱ्या यांत्रिक तसेच यंत्रचलित मासेमारी नौकांना जनरेटरवर अथवा जनरेटर शिवाय चालणारे बुडीत, पाण्याखाली अथवा
पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगते कृत्रिम एलईडी लाइट, दिवे, माशांना आकर्षित करणारे दिवे किंवा कोणतीही इतर प्रकाश उत्सर्जित करणारी कृत्रिम उपकरणे यांचा वापर करणे किंवा ती बसविणे याला प्रतिबंध घातला आहे.
वॉलमार्टने भारतीय फ्लिपकार्टमधील 77% भागभांडवल खरेदी केले; ई-वाणिज्य क्षेत्रातला सर्वांत मोठा सौदा
अमेरिकेची वॉलमार्ट या किरकोळ विक्रेता कंपनीने फ्लिपकार्ट या भारतीय ई-वाणिज्य कंपनीचे 77% भागभांडवल जवळजवळ $16 अब्जमध्ये (म्हणजेच 1,05,360 कोटी रुपये) खरेदी केले आहे. वॉलमार्टचा तसेच ई-वाणिज्य उद्योग क्षेत्रातला जगातला हा सर्वांत मोठा सौदा आहे.