झारखंडमध्ये AIIMS उभारण्यास मंजूरी
झारखंड राज्यातल्या देवघर शहरात नवीन अखिल भारतीय वैद्यकीयशास्त्र संस्था (AIIMS) उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने आपली मंजूरी दिली आहे.
भारत सरकारच्या प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेंतर्गत हे AIIMS उभारण्यात येणार असून त्यासाठी 1103 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. 750 खाटाची क्षमता असलेले रुग्णालय, 100 विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय महाविद्यालय, परिचारिका महाविद्यालय आणि आयुष विभाग व अन्य सुविधा यामध्ये असणार.
‘पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजना’ देशात विविध भागांमध्ये आरोग्य सुविधांना सर्वांसाठी समरूपता उपलब्ध करून देण्यासाठीच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. योजनेंतर्गत देशातल्या मागास राज्यांमध्ये वैद्यकीय शिक्षणास गुणवत्तापूर्ण करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.
अखिल भारतीय वैद्यकीयशास्त्र संस्था (All India Institutes of Medical Sciences -AIIMS) हा उच्च शिक्षणासाठी स्वायत्त सार्वजनिक वैद्यकीय महाविद्यालयांचा एक समूह आहे.
आंध्रप्रदेशात केंद्रीय विद्यापीठांची स्थापना करण्यास मंजूरी
आंध्रप्रदेशामध्ये अनंतपुर जिल्ह्यात जनथालुरू इथे केंद्रीय विद्यापीठ स्थापना करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने तत्वतः मान्यता दिली आहे.
‘आंध्रप्रदेश केंद्रीय विद्यापीठ’ या विद्यापीठाच्या उभारणीच्या पहिल्या टप्प्याच्या खर्चासाठी 450 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आंध्रप्रदेश पुनर्गठन कायदा 2014 च्या प्रभावी अंमलबजावणीला यामुळे मदत होणार आहे.
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागांतर्गत संस्था नोंदणी कायदा-1860 अंतर्गत याची स्थापना करण्यात येणार. पहिल्या तीन वर्षात या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 179.54 कोटी रुपये इतका आहे.
12 अभ्यासक्रमांचे शिक्षण, मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींचे पुनर्वसन करणे, मानसिक आरोग्य पुनर्वसन क्षेत्रात क्षमता विकास, धोरण आखणे आणि मानसिक आरोग्य पुनर्वसनात प्रगत संशोधनाला प्रोत्साहन देणे या उद्देशाने ही संस्था असेल.
पंतप्रधानांनी जोजिला बोगद्याच्या बांधकामासाठी कोणशीला ठेवली
19 मे 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू-काश्मीरमध्ये जोजिला बोगद्याच्या बांधकामासाठी कोणशीला ठेवली जाणार आहे. याचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्या. (NHIDCL) करणार आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दू-पदरी दोन्ही बाजूने वाहतुकीस सक्षम असा 14.15 किलोमीटर लांबीचा ‘जोजिला बोगदा’ तयार करण्यात येणार आहे.

या योजनेला मार्च 2006 मध्ये मंजूरी दिली गेली. योजनेंतर्गत आतापर्यंत भुवनेश्वर, भोपाल, रायपुर, जोधपुर, ऋषिकेश आणि पटना या ठिकाणी AIIMS स्थापित केले गेले आहे.
अखिल भारतीय वैद्यकीयशास्त्र संस्था (All India Institutes of Medical Sciences -AIIMS) हा उच्च शिक्षणासाठी स्वायत्त सार्वजनिक वैद्यकीय महाविद्यालयांचा एक समूह आहे.
AIIMSला संसदीय कायद्याखाली ‘राष्ट्रीय महत्त्व असलेल्या संस्था’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. सर्वप्रथम AIIMS दिल्लीची 1956 साली स्थापना झाली.
आंध्रप्रदेशात केंद्रीय विद्यापीठांची स्थापना करण्यास मंजूरी
आंध्रप्रदेशामध्ये अनंतपुर जिल्ह्यात जनथालुरू इथे केंद्रीय विद्यापीठ स्थापना करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने तत्वतः मान्यता दिली आहे.
‘आंध्रप्रदेश केंद्रीय विद्यापीठ’ या विद्यापीठाच्या उभारणीच्या पहिल्या टप्प्याच्या खर्चासाठी 450 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आंध्रप्रदेश पुनर्गठन कायदा 2014 च्या प्रभावी अंमलबजावणीला यामुळे मदत होणार आहे.
भोपाळमध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्था स्थापन करण्यास मंजूरी
केंद्रीय मंत्रिमंडळाने भोपाळमध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्था स्थापन करण्यास मंजूरी दिली आहे. मानसिक आरोग्य पुनर्वसन क्षेत्रात ही देशातली पहिली राष्ट्रीय संस्था असेल.
केंद्रीय मंत्रिमंडळाने भोपाळमध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्था स्थापन करण्यास मंजूरी दिली आहे. मानसिक आरोग्य पुनर्वसन क्षेत्रात ही देशातली पहिली राष्ट्रीय संस्था असेल.
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागांतर्गत संस्था नोंदणी कायदा-1860 अंतर्गत याची स्थापना करण्यात येणार. पहिल्या तीन वर्षात या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 179.54 कोटी रुपये इतका आहे.
12 अभ्यासक्रमांचे शिक्षण, मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींचे पुनर्वसन करणे, मानसिक आरोग्य पुनर्वसन क्षेत्रात क्षमता विकास, धोरण आखणे आणि मानसिक आरोग्य पुनर्वसनात प्रगत संशोधनाला प्रोत्साहन देणे या उद्देशाने ही संस्था असेल.
पंतप्रधानांनी जोजिला बोगद्याच्या बांधकामासाठी कोणशीला ठेवली
19 मे 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू-काश्मीरमध्ये जोजिला बोगद्याच्या बांधकामासाठी कोणशीला ठेवली जाणार आहे. याचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्या. (NHIDCL) करणार आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दू-पदरी दोन्ही बाजूने वाहतुकीस सक्षम असा 14.15 किलोमीटर लांबीचा ‘जोजिला बोगदा’ तयार करण्यात येणार आहे.
एकूण 6,809 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे जोजिला भूप्रदेशातला प्रवास 3.5 तासाच्या जागी फक्त 15 मिनटात होऊ शकणार आणि हा जगातला सर्वात लांब बोगदा असणार. यामुळे श्रीनगर, कारगिल आणि लेह यामध्ये सर्वकाळ संपर्क सुविधा असेल.
जोजिला भूप्रदेश श्रीनगर-कारगिल-लेह राष्ट्रीय महामार्गावर 11,578 फुट उंचीवर आहे. हिवाळ्यात (डिसेंबर-एप्रिल) हिमवर्षावामुळे भारताच्या काश्मीर घाटी आणि लद्दाख दरम्यानच्या भागातील संपर्क तुटतो. त्यामुळे सर्वकाळ संपर्क सुविधा उपलब्ध करण्याच्या हेतूने हा बोगदा खणला जाणार आहे.