सोलापूर व शिझियाझाँग शहरामध्ये भगिनी शहरे करार
तब्बल दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सोलापूर महापालिका व चीनमधील शिझियाझाँग या दोन शहरामध्ये भगिनी शहरे करारावर शिक्कामोर्तब झाले. महापौर शोभा बनशेट्टी व शिझियाझाँग शहराचे महापौर डेन पेरीयन यांनी करारावर स्वाक्षरी केली.
सोलापूर आणि शिझियाझुयँग या दोन शहरामध्ये २००५ साली भगिनी शहर करार संमत झालेला आहे. तथापि, यामध्ये फारशी प्रगती झालेली नव्हती. शिझियाझुयँग या शहरात १६ मे २०१८ रोजी चीन व भारत या देशामध्ये करार झाला.
येथील महापौरांनी सोलापूरातून वौद्यकीय व इतर शिक्षण घेण्यासाठी आपल्या शहरातून विद्यार्थी पाठवा, आम्ही त्यांना शिक्षण देऊ तसेच औद्योगिक विकासासाठी वस्त्रोद्योग यंत्रसामुग्री व टेक्नॉलॉजी देणे आणि सोलापूरात त्यांच्या खर्चातून एखादे हॉस्पिटल दत्तक घेऊन त्याचा विकास करुन सेवा देता येईल याबद्दल परवानगी मागितली.
एक महान चिकित्सक डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्यामुळे या दोन शहरांचे बंध जुळले आहेत. डॉ. कोटणीस यांनी त्यांचे जीवन मानवतेच्या सेवेसाठी वाहिले आहे. तथापि, त्यांनी केलेले कार्य आजही चीनमधील लोकांमध्ये जिवंत आहे आणि चीनमधील लोक आणि चीन सरकारला डॉ. कोटणीस यांच्या मानवतावादी कार्याबद्दल नितांत आदर आहे.
अकाल तख्त कडून ‘शीख फिल्म सेन्सॉर बोर्ड’ची स्थापना
अकाल तख्त साहिब संस्थेकडून ‘शीख फिल्म सेन्सॉर बोर्ड (SFCB)’ याची स्थापना करण्यात आली आहे. हे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंग आणि जत्थेदार ज्ञानी गुरबचन सिंग यांच्या अध्यक्षतेत एकूण २१ सदस्यांचे मंडळ आहे.
चित्रपट आणि नाटकांमध्ये प्रदर्शित होऊ शकणार्या शीख इतिहास, वारसा आणि मानमर्यादा यासंबंधी संभाव्य आक्षेपार्ह बाबींना टाळण्यासाठी फिल्म सेंसर बोर्डच्या समांतर असे हे मंडळ तयार करण्यात आले आहे. इतिहासात प्रथमच एखाद्या धार्मिक सर्वोच्च संस्थेनी या प्रकारच्या मंडळाची रचना केली आहे.
केरळमधील रॉक थीम पार्कमध्ये पक्ष्याचे जगातले सर्वात मोठे शिल्प
केरळमध्ये ६५ एकर परिसरात ‘जटायू अर्थ सेंटर’ या नावाने एकमेव असे ‘रॉक थीम पार्क’ (शिळा उद्यान) उभारले जात आहे आणि या उद्यानात गरूड पक्ष्याला साकारलेले जगातले सर्वात मोठे शिल्प ठेवले गेले आहे.
हे शिल्प जटायू या रामायणातील पौराणिक पात्राला धरून तयार केले गेले असल्याने केरळ पर्यटनाने या केंद्राचा प्रचार ‘जटायू अर्थ सेंटर’ या नावाखाली करण्याचा निर्णय घेतला आहे, जे की एक आंतरराष्ट्रीय पर्यटन सांस्कृतिक केंद्र म्हणून ब्रॅंड असेल.
ODA क्षेत्रात उद्भवणाऱ्या विविध आकस्मिक प्रसंगांना तोंड देण्यासाठी एक मानकीकृत संचालन प्रक्रियेची पूर्तता करण्यासाठी नौदल, हवाई दल, तटरक्षक, ONGC, पोर्ट ट्रस्ट, कस्टम, राज्य मत्स्यपालन विभाग आणि मरीन पोलीस या सर्व सागरी भागधारकांना एकत्र आणणे हा या सरावाचा उद्देश आहे.
एच. डी. कुमारस्वामी कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री
एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि पदाचा कार्यभार सांभाळला आहे. कुमारस्वामी कॉंग्रेस पक्षाचे नेता आहेत.
शिवाय, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष जी. परमेश्वर यांनी कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपा नेता बी. एस. येदियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर कॉंग्रेस आणि जनता दल (निधर्मी) यांच्या युतीने कर्नाटकात नवे सरकार स्थापन केले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीनंतर कर्नाटकात त्रिशंकू विधानसभेची स्थिती समोर आली. कर्नाटक राज्य विधानसभेच्या २२४ जागांपैकी कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी किमान ११३ जागा मिळवणे आवश्यक असते. या निवडणूकीत भाजपाला १०४ जागा, काँग्रेसला ७८ जागा आणि काँग्रेस-जेडी(एस) पक्षाला ३७ जागा मिळाल्या.
पोलंडची लेखिका ओल्गा टोकरकझ्यूक ह्यांना मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार
पोलंडची लेखिका ओल्गा टोकरकझ्यूक ह्यांना फिक्शन श्रेणीत प्रतिष्ठित मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार २०१८ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. टोकरकझ्यूक ह्यांना हा सन्मान त्यांच्या ‘फ्लाइट्स’ शीर्षकाच्या कादंबरीसाठी देण्यात आला आहे.
यासोबतच, ओल्गा टोकरकझ्यूक ह्या ५० वर्षांच्या इतिहासात मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार प्राप्त करणारी पोलंडची पहिली लेखिका ठरली आहे. ५०००० पाउंडची बक्षिसाची रक्कम लेखिका आणि त्यांचे अनुवादक जेनिफर क्रॉफ्ट यांच्यामध्ये विभाजित केली जाणार.
मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार (Man Booker International Prize) हा ब्रिटनकडून दिला जाणारा आंतरराष्ट्रीय साहित्यिक पुरस्कार आहे आणि जून २००४ मध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.

‘जटायू’ नावाने हे पक्ष्याला साकारलेले जगातले सर्वात मोठे शिल्प आहे. चित्रपट निर्माते राजीव अंचल यांनी ही शिल्पाकृती तयार केलेली आहे. या शिल्पाने १५००० चौरस फुट क्षेत्रफळ एवढे क्षेत्र व्यापलेले असून त्याची लांबी २०० फूट, रुंदी १५० फूट आणि ऊंची ७० फूट आहे.
हे शिल्प जटायू या रामायणातील पौराणिक पात्राला धरून तयार केले गेले असल्याने केरळ पर्यटनाने या केंद्राचा प्रचार ‘जटायू अर्थ सेंटर’ या नावाखाली करण्याचा निर्णय घेतला आहे, जे की एक आंतरराष्ट्रीय पर्यटन सांस्कृतिक केंद्र म्हणून ब्रॅंड असेल.
हे केंद्र म्हणजे बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर (BOT) पद्धतीअंतर्गत राज्यात सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उभारण्यात आलेला पहिला पर्यटन उपक्रम आहे.
भारतीय नौदलाचा ‘प्रस्थान’ सुरक्षा सराव
२२ मे २०१८ पासून मुंबईच्या किनारपट्टीपासून दूर सागरी विकास क्षेत्रात (ODA) भारतीय नौदलाच्या ‘प्रस्थान’ नावाच्या एका सुरक्षा सरावाला सुरुवात झाली आहे. या सरावाचे आयोजन हेडक्वार्टर्स वेस्टर्न नेव्हल कमांडयांच्याकडून करण्यात आला आहे. हा सराव दर सहा महिन्यानंतर आयोजित केला जातो.
२२ मे २०१८ पासून मुंबईच्या किनारपट्टीपासून दूर सागरी विकास क्षेत्रात (ODA) भारतीय नौदलाच्या ‘प्रस्थान’ नावाच्या एका सुरक्षा सरावाला सुरुवात झाली आहे. या सरावाचे आयोजन हेडक्वार्टर्स वेस्टर्न नेव्हल कमांडयांच्याकडून करण्यात आला आहे. हा सराव दर सहा महिन्यानंतर आयोजित केला जातो.
ODA क्षेत्रात उद्भवणाऱ्या विविध आकस्मिक प्रसंगांना तोंड देण्यासाठी एक मानकीकृत संचालन प्रक्रियेची पूर्तता करण्यासाठी नौदल, हवाई दल, तटरक्षक, ONGC, पोर्ट ट्रस्ट, कस्टम, राज्य मत्स्यपालन विभाग आणि मरीन पोलीस या सर्व सागरी भागधारकांना एकत्र आणणे हा या सरावाचा उद्देश आहे.
एच. डी. कुमारस्वामी कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री
एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि पदाचा कार्यभार सांभाळला आहे. कुमारस्वामी कॉंग्रेस पक्षाचे नेता आहेत.
शिवाय, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष जी. परमेश्वर यांनी कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपा नेता बी. एस. येदियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर कॉंग्रेस आणि जनता दल (निधर्मी) यांच्या युतीने कर्नाटकात नवे सरकार स्थापन केले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीनंतर कर्नाटकात त्रिशंकू विधानसभेची स्थिती समोर आली. कर्नाटक राज्य विधानसभेच्या २२४ जागांपैकी कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी किमान ११३ जागा मिळवणे आवश्यक असते. या निवडणूकीत भाजपाला १०४ जागा, काँग्रेसला ७८ जागा आणि काँग्रेस-जेडी(एस) पक्षाला ३७ जागा मिळाल्या.
पोलंडची लेखिका ओल्गा टोकरकझ्यूक ह्यांना मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार
पोलंडची लेखिका ओल्गा टोकरकझ्यूक ह्यांना फिक्शन श्रेणीत प्रतिष्ठित मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार २०१८ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. टोकरकझ्यूक ह्यांना हा सन्मान त्यांच्या ‘फ्लाइट्स’ शीर्षकाच्या कादंबरीसाठी देण्यात आला आहे.
यासोबतच, ओल्गा टोकरकझ्यूक ह्या ५० वर्षांच्या इतिहासात मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार प्राप्त करणारी पोलंडची पहिली लेखिका ठरली आहे. ५०००० पाउंडची बक्षिसाची रक्कम लेखिका आणि त्यांचे अनुवादक जेनिफर क्रॉफ्ट यांच्यामध्ये विभाजित केली जाणार.
मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार (Man Booker International Prize) हा ब्रिटनकडून दिला जाणारा आंतरराष्ट्रीय साहित्यिक पुरस्कार आहे आणि जून २००४ मध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
हा सन्मान इंग्रजी भाषेतील कादंबरीसाठी मॅन बुकर पुरस्काराच्या समकक्ष आहे आणि इंग्रजीमध्ये भाषांतरित कोणत्याही भाषेतील पुस्तकांसाठी देखील दिला जातो. विजेत्याला ५०००० पाउंडची बक्षिसाची रक्कम दिली जाते.