चालू घडामोडी २५ मे २०१८

चालू घडामोडी २५ मे २०१८

“#स्टार्टअपलिंक”: भारत आणि नेदरलँड्स यांचा स्टार्टअप पुढाकार 
स्टार्टअप क्षेत्रात अभिनवता व उद्योजकता यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने इन्‍वेस्‍ट इंडिया (वाणिज्‍य व उद्योग मंत्रालयांतर्गत स्‍टार्टअप इंडियाचे यजमान) आणि नेदरलँड्स सरकार २५ मे २०१८ रोजी बेंगळूरूमध्ये “#स्टार्टअपलिंक” (#StartUpLink) या नव्या स्टार्टअप पुढाकाराचा शुभारंभ करणार आहेत.


त्यापूर्वी, या पुढाकाराच्या ‘क्‍लीन एयर’ इंडिया रिंग या महत्त्वाच्या घटकाचा शुभारंभ २४ मे २०१८ रोजी नवी दिल्लीत करण्यात आला आहे.


नेदरलँड्सचे (डच) पंतप्रधान मार्क रूट यांच्या आगामी भारत दौर्‍यादरम्यान या पुढाकाराचे उद्घाटन केले जात आहे. दोन्ही देशांमध्ये सर्व क्षेत्रात संबंधांना वाढविण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मार्क रूट यांच्या नेतृत्वात २२० जणांचे एक व्‍यापार प्रतिनिधी मंडळ देखील येणार आहे, जे की भारतात आतापर्यंतची सर्वात मोठा व्‍यापार मोहीम ठरणार.

नेदरलँड्स हा पश्चिम युरोप खंडातला एक देश आहे. ‎अ‍ॅमस्टरडॅम हे राजधानी शहर आहे. डच ही देशाची अधिकृत भाषा ‎आहे. युरो हे राष्ट्रीय चलन आहे



पोलाद व अॅल्युमिनियमच्या दरांबाबत अमेरिकाच्या विरोधात भारताची WTO कडे तक्रार 
अमेरिकाने देशातील पोलाद व अॅल्युमिनियम उत्पादनांच्या आयातीवर लादलेल्या अतिरिक्त शुल्काच्या प्रकरणाबाबत भारताने जागतिक व्यापार संघटना (WTO) याच्या तंटा निवारण समितीकडे अमेरिकेच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

अमेरिकाकडून शुल्क आकारणे जागतिक व्यापार नियमांच्या अनुकूल नाहीत. त्यामुळे हा वाद सोडविण्यासाठी WTO ची मध्यस्थी होणे भाग आहे. अमेरिकाने मार्च-१८ मध्ये पोलाद व अॅल्युमिनियम उत्पादनांच्या आयातीवर लादलेल्या अनुक्रमे २५% आणि १०% शुल्कामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून भारत, चीन, रशिया, जपान, टर्की आणि युरोपीय संघ वार्षिक USD ३.५ दशलक्षचा एकत्र दावा केला आहे.

जागतिक व्यापार संघटना (WTO) ही आंतरशासकीय संघटना आहे, जी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करते. याचे मुख्यालय जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे आणि याचे १६४ देश सभासद आहेत. 

१९४८ साली लागू झालेल्या दर व व्यापार संदर्भात सर्वसाधारण करार (General Agreement on Tariffs and Trade -GATT) याला बदली करून १५ एप्रिल १९९४ रोजी १२३ राष्ट्रांनी स्वीकारलेल्या मार्राकेश करारांतर्गत WTO अधिकृतपणे १ जानेवारी १९९५ रोजी कार्यरत झाले.



दक्षिण आफ्रिकेच्या एबी डीव्हिलियर्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती 
दक्षिण आफ्रिकेचा नामांकित फलंदाज एबी डीव्हिलियर्स ह्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे.

३४ वर्षीय अब्राहम बेंजामिन डीव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११४ कसोटी, २२८ एकदिवसीय आणि ७८ टी-२० सामने खेळलेली आहेत. 

त्याच्या नावे सर्वकालीन एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक (१६ चेंडू), सर्वात जलद शतक (३१ चेंडू) व सर्वात जलद दीडशतक (६४ चेंडू) असे तीनही विक्रम आहेत.


आरोग्य सेवा उपलब्धता दर्जात देशाची घसरण 
आरोग्यसेवेचा दर्जा व लोकांना असलेली त्याची उपलब्धता यात १९५ देशांत भारताचा १४५ वा क्रमांक लागला आहे. चीन, बांगलादेश, श्रीलंका, भूतान या शेजारी देशांच्याही भारत मागे आहे, असे लॅन्सेटच्या अहवालात म्हटले आहे.

दी ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजेस या अभ्यास अहवालात दिलेल्या माहितीनुसार १९९० पासून भारतात आरोग्य सेवांमध्ये सुधारणा होत आहेत. 

२०१६ मध्ये भारताचा आरोग्य सेवा उपलब्धता व दर्जा गुणांक ४१.२ झाला आहे. तो १९९० मध्ये २४.७ होता. एचएक्यू निर्देशांक २००० ते २०१६ दरम्यान सुधारला असला तरी उच्चतम व नीचतम गुणांक हे यातील फरक १९९० मध्ये २३.४ तर २०१६ मध्ये ३०.८ होता.

गोवा व केरळ यांचा २०१६ मधील गुणांक ६० पेक्षा अधिक होता तर उत्तर प्रदेश व आसामचा गुणांक ४० च्या खाली होता.

भारत (१४५), चीन (४८), श्रीलंका (७१), बांगलादेश (१३३), भूतान (१३४) यांच्यापेक्षा मागे आहे तर नेपाळ (१४९), पाकिस्तान (१५४), अफगाणिस्तान (१९१) यांच्यापेक्षा पुढे आहे.

तसेच ज्या पाच देशांनी आघाडी घेतली आहे, त्यात २०१६ च्या आकडेवारीनुसार आइसलँड (९७.१), नॉर्वे (९६.६), नेदरलँडस (९६.१) लक्झेमबर्ग (९६), फिनलँड व ऑस्ट्रेलिया (९५.९) यांचा समावेश आहे.



अतुल गोतसुर्वे हे उत्तर कोरियातील भारताचे राजदूत 
उत्तर कोरिया हुकूमशहा किम जाँग ऊन यांचे तुघलकी फर्मान, क्षेपणास्त्र चाचणी आणि आण्विक कार्यक्रम यामुळे हा देश नेहमीच चर्चेत असतो. अशा या देशात भारताच्या राजदूतपदाची धूरा आता एका मराठी माणसाकडे सोपवण्यात आली आहे.

अतुल गोतसुर्वे हे भारताचे उत्तर कोरियातील राजदूत असतील. गोतसुर्वे यांनी कार्यभार स्वीकारताच परराष्ट्र राज्यमंत्री व्ही के सिंह यांनी गेल्या आठवड्यात दोन दिवसांचा उत्तर कोरियाचा दौरादेखील केला आहे. या ऐतिहासिक दौऱ्याचे श्रेय सिंह यांच्यासह गोतसुर्वे यांना देखील दिले जात आहे.

५ मे रोजी गोतसुर्वे यांनी उत्तर कोरियात भारतीय राजदूत पदाची धूरा सांभाळली. यानंतर जवळपास नऊ दिवसांनी त्यांना किम याँग नाम यांनी भेटीसाठी निमंत्रित केले. हुकूमशहा किम जाँग ऊन यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांचा समावेश आहे.

तसेच या भेटीच्या दुसऱ्याच दिवसी व्ही.के. सिंह हे उत्तर कोरियात पोहोचले. सिंह आणि गोतसुर्वे या दोघांनीही हा दौरा यशस्वी व्हावा यासाठी अथक मेहनत घेतली आणि याचा परिणाम म्हणजे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या दिशेने भारताने एक पाऊल पुढे टाकले.



दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेचा ‘२०१८ रिम ऑफ द पॅसिफिक’ सराव 
दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेने ‘२०१८ रिम ऑफ द पॅसिफिक (RIMPAC)’ हा नौदलाचा जगातला सर्वात मोठा सामरीक सराव आयोजित केला आहे.

यावेळी मात्र दक्षिण चीन समुद्रावर चीनच्या वाढत्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने चीनच्या नौदलाला या सरावात भाग घेण्यास आमंत्रित केलेले नाही. 

रिम ऑफ द पॅसिफिक (RIMPAC) सराव हा जगातला सर्वात मोठा सागरी सामरीक सराव आहे, जो जून आणि जुलै या कालावधीत हवाईमध्ये दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो. १९७१ साली पहिल्यांदा हा सामरीक सराव आयोजित करण्यात आला होता.
Scroll to Top