टाटा सन्सच्या प्रमुखपदी एस. जयशंकर
टाटा सन्सच्या वैश्विक आणि कार्पोरेट विभागाच्या अध्यक्षपदी माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
टाटाच्या जागतिक कार्पोरेट कामकाजाच्या जबाबदारीसह टाटाची जागतिक धोरणं ठरवण्याची जबाबदारीही जयशंकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
जयशंकर हे जानेवारी 2015 ते जानेवारी 2018 दरम्यान देशाच्या परराष्ट्र सचिवपदी होते. आता ते नवी जबाबदारी पार पाडणार आहेत.
टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून जयशंकर यांना टाटाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांना रिपोर्ट द्यावा लागणार आहे.
मनी ट्रान्स्फरमध्ये भारत आघाडीवर
नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशांमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम प्राप्त करण्यात भारत आघाडीवर आहे.
जागतिक बँकेने सोमवारी जाहीर केलेल्या एका आकडेवारीनुसार परदेशांत स्थायिक झालेल्या भारतीयांनी 2017मध्ये 69 अब्ज डॉलर (4 हजार 485 अब्ज रुपये) भारतात पाठविल्याचे समोर आले आहे. ही रक्कम 2016मध्ये देशात पाठविलेल्या रकमेच्या तुलनेत 9.9 टक्के अधिक आहे.
जागतिक बँकेच्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे युरोप, रशिया आणि अमेरिकेतून पाठविण्यात येणाऱ्या रकमेचे प्रमाण वाढले आहे.
जगभरातील गरीब देशांना अशापद्धतीने पाठवण्यात येणाऱ्या रकमेचा मोठा आधार असतो. अहवालात नमूद केल्याप्रमाणे कच्च्या तेलाचे वाढलेले दर, तसेच युरो आणि रुबल मजबूत झाल्यामुळे पाठविण्यात येणाऱ्या रकमेचे प्रमाण वाढले आहे.
परदेशीयांना विना-परवानगी नागालँड, मिझोरम, मणीपूरमध्ये प्रवेश
परदेशी नागरिकांना भारतात नागालँड, मिझोरम, मणीपूर या तीन ईशान्य राज्यात प्रवास करण्यास परवानगी घेण्याची गरज नाही, असा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे.
या क्षेत्रात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सहा दशकांपासून लागू असलेली प्रतिबंधित क्षेत्र परवाना व्यवस्था पाकिस्तान, चीन आणि अफगाणिस्तान या देशांना वगळता इतर देशांमधून आलेल्या परदेशी पर्यटकांसाठी पुढील पाच वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे.
कामगार मंत्रालयाने या योजनेचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाला सादर केला होता. देशभरातील सुमारे 50 कोटी कामगार, मजुरांना या योजनेचा लाभ होईल. एका सरकारी उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयाचे मंत्री व सचिवांची नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत कामगार मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या योजनेचे सादरीकरण केले. यानंतर पंतप्रधान कार्यालयाने या योजनेला हिरवा कंदील दाखविला.
या योजनेचा लाभ प्रामुख्याने शेतमजुरांना होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी मिळाल्याने कामगार व अर्थ मंत्रालय या योजनेची तपशीलवार आखणी करणार आहेत.
शाहझार रिझवीने चँगवॉन ISSF विश्वचषक स्पर्धेत भारताला पहिले पदक दिले
चँगवॉन (दक्षिण कोरिया) येथे खेळल्या जात असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (ISSF) विश्वचषक 2018 स्पर्धेत शाहझार रिझवी ह्याने भारताला पहिले पदक कमावून दिले आहे.
शाहझार रिझवी ह्याने पुरुषांच्या 10 मीटर एयर पिस्तूल प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेचे सुवर्णपदक रशियाच्या आर्टेम चेर्नोउसोव ह्या नेमबाजाने जिंकले.
1986 साली आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (ISSF) कडून ऑलंपिक स्पर्धांमध्ये पात्रता सिद्ध करण्यासाठी एक एकसंध प्रणाली म्हणून ISSF विश्वचषक स्पर्धेची स्थापना करण्यात आली.
UNASUR मधील सहा देशांनी आपले सभासदत्व रद्द केले
सहा सदस्य देशांनी ‘दक्षिण अमेरिका राष्ट्र संघ (Union of South American Nations -UNASUR)’ या प्रादेशिक गटामधील आपले सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्जेंटिना, ब्राझील, चिली, कोलंबिया, पराग्वे आणि पेरू यांनी तात्पुरत्या स्वरूपात आपले सभासदत्व मागे घेतले आहे. त्यांच्यात UNASURचे नेतृत्व कोणत्या देशाकडे असावे याबाबत मतभेद निर्माण झाले आहेत.
‘दक्षिण अमेरिका राष्ट्र संघ (Union of South American Nations -UNASUR)’ हा दक्षिण अमेरिका उप-खंडातल्या देशांचा एक गट आहे. यामध्ये बोलिव्हिया, इक्वेडोर, गयाना, सुरिनाम, उरुग्वे, व्हेनेझुएला, अर्जेंटिना, ब्राझील, चिली, कोलंबिया, पराग्वे आणि पेरू या देशांचा समावेश होतो. व्हेनेझुएलाचे दिवंगत राष्ट्रपती हुगो चावेझ यांच्या नेतृत्वात 23 मे 2008 रोजी UNASURच्या संहितेवर स्वाक्षर्या करण्यात आल्या आणि या गटाची स्थापना झाली.

पूर्वी ‘परदेशी नागरिक (संरक्षित क्षेत्रे) आदेश-1958’ अंतर्गत या क्षेत्रात प्रवासास विशेष परवानगी घ्यावी लागत होती.
महत्त्वाकांक्षी योजनेला पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी
देशभरातील कामगार व मजुरांना सामाजिक सुरक्षेचे कवच देणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजनेला पंतप्रधान कार्यालयाने मंजुरी दिली आहे.
देशभरातील कामगार व मजुरांना सामाजिक सुरक्षेचे कवच देणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजनेला पंतप्रधान कार्यालयाने मंजुरी दिली आहे.
कामगार मंत्रालयाने या योजनेचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाला सादर केला होता. देशभरातील सुमारे 50 कोटी कामगार, मजुरांना या योजनेचा लाभ होईल. एका सरकारी उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयाचे मंत्री व सचिवांची नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत कामगार मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या योजनेचे सादरीकरण केले. यानंतर पंतप्रधान कार्यालयाने या योजनेला हिरवा कंदील दाखविला.
या योजनेचा लाभ प्रामुख्याने शेतमजुरांना होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी मिळाल्याने कामगार व अर्थ मंत्रालय या योजनेची तपशीलवार आखणी करणार आहेत.
शाहझार रिझवीने चँगवॉन ISSF विश्वचषक स्पर्धेत भारताला पहिले पदक दिले
चँगवॉन (दक्षिण कोरिया) येथे खेळल्या जात असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (ISSF) विश्वचषक 2018 स्पर्धेत शाहझार रिझवी ह्याने भारताला पहिले पदक कमावून दिले आहे.
शाहझार रिझवी ह्याने पुरुषांच्या 10 मीटर एयर पिस्तूल प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेचे सुवर्णपदक रशियाच्या आर्टेम चेर्नोउसोव ह्या नेमबाजाने जिंकले.
1986 साली आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (ISSF) कडून ऑलंपिक स्पर्धांमध्ये पात्रता सिद्ध करण्यासाठी एक एकसंध प्रणाली म्हणून ISSF विश्वचषक स्पर्धेची स्थापना करण्यात आली.
दरवर्षी चार स्पर्धां घेतल्या जातात. सर्वोत्तम नेमबाजांसाठी 1988 सालापासून विश्वचषक अंतिम आयोजित करण्यात येत आहे. 1907 साली ISSF ची स्थापना करण्यात आली.