चालू घडामोडी २८ एप्रिल २०१८

चालू घडामोडी २८ एप्रिल २०१८

आयआयटीव्दारे सर्वोत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती
तंत्रज्ञान आणि कल्पकता यामुळे संशोधनासाठी नावाजल्या जाणाऱ्या मुंबई येथील इंडियन इन्स्टिटय़ू ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) संस्थेच्या विद्यार्थ्यांनी ओएनजीसीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सौरचूल’स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट सौरचूल बनविण्याचा सन्मान मिळवला आहे. 


यासाठी संस्थेला दहा लाख रुपयांचे पारितोषिकही मिळाले आहे.
खेडोपाडी दिसणारी धुरांडी आणि पारंपरिक चुलींऐवजी आरोग्य व पर्यावरणपूरक साधने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचव्यात या उद्देशाने ओनजीसीच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर ‘सौरचूल’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशभरातील सुमारे दीड हजार अर्जाची नोंदणी झाली होती.

जानेवारी 2018 मध्ये झालेल्या छाननीमधून 13 अर्जाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. फेब्रुवारीमध्ये झालेल्या दुसऱ्या फेरीमध्ये प्रत्यक्ष प्रकल्पांची पाहणी करून सवरेत्कृष्ट प्रकल्प म्हणून मुंबईच्या आयआयटी संस्थेने सादर केलेल्या सौर चुलीची निवड करण्यात आली.

तसेच या प्रकल्पांची छाननी आणि निवड प्रक्रिया अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने केली.



CSIR ला राष्ट्रीय बौद्धिक संपदा (IP) पुरस्कार 2018 मिळाला 
वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) याला “शीर्ष संशोधन व विकास संस्था / पेटंट आणि व्यवसायीकरण संघटना” श्रेणीत ‘राष्ट्रीय बौद्धिक संपदा (IP) पुरस्कार 2018’ याने सन्मानित करण्यात आले आहे.

हा पुरस्कार 26 एप्रिलला जागतिक बौद्धिक संपदा दिन 2018 निमित्त आयोजित एका समारंभात भारतीय बौद्धिक संपदा कार्यालय आणि भारतीय चेंबर ऑफ कॉमर्स (CII) तर्फे दिला गेला.

जागतिक बौद्धिक संपदा दिन दरवर्षी 26 एप्रिल रोजी पाळला जातो. या दिनाची स्थापना सन 2000 मध्ये जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) (स्थापना: 26 एप्रिल 1970) यांनी केली. भारतीय बौद्धिक संपदा कार्यालयाकडूनदरवर्षी ‘राष्ट्रीय बौद्धिक संपदा (IP) पुरस्कार’ पेटंट, रचना, ट्रेडमार्क आणि भौगोलिक निर्देशक (GI) या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट शास्त्रज्ञ, संघटना आणि कंपन्यांना दिला जातो.

वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) ही भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे. याची स्थापना 26 सप्टेंबर 1942 रोजी करण्यात आली. या संस्थेमार्फत सहाय्यक प्राध्यापक तसेच कनिष्ठ संशोधन पाठ्यवृत्ती यासाठी ‘राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट)’ घेतली जाते. याच्या देशभरात 39 प्रयोगशाळा (ज्यात 5 क्षेत्रीय संशोधन प्रयोगशाळा) आणि 50 क्षेत्रीय केंद्रे आहेत.


NITI आयोगाचा ‘अटल न्यू इंडिया चॅलेंज’ उपक्रम 
राष्ट्रीय भारत पारिवर्तन संस्था (NITI) आयोगाच्या अटल अभिनवता अभियान (AIM) यांनी 26 एप्रिल 2018 रोजी ‘अटल न्यू इंडिया चॅलेंज’ नावाच्या उपक्रमाच्या घोषणा केली.

नागरिकांसाठी अभिनव आणि तंत्रज्ञान यांना पोषक वातावरण तयार करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमातून उत्पादनक्षम तंत्रज्ञानासाठी क्षमता, हेतू व संभाव्यता प्रदर्शित करणार्‍या अर्जदारांना एक कोटी रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार. 

सोबतच अतिरिक्त सल्ला, हाताळणी, संगोपन आणि व्यवसायिकीकरणाच्या विविध टप्प्यांमध्ये आवश्यक अन्य मदत देखील दिली जाईल. अटल न्यू इंडिया चॅलेंज पाच मंत्रालयाच्या सहकार्याने संचालित केले जाणार आहे, त्याअंतर्गत AIM 17 लक्ष्यित क्षेत्रात कार्य करणार.

देशात अभिनवता आणि उद्योजकता रुजविण्यासाठी NITI आयोगाने अटल अभिनवता अभियान (Atal Innovation Mission -AIM) सुरू केले आहे. या मोहीमेंतर्गत देशभरात आतापर्यंत 900 हून अधिक अटल टिंकरिंग लॅब स्थापन करण्यात आल्या आहेत. या प्रयोगशाळेमध्ये इयत्ता 6 वी ते 12 वी यामधील विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदान केले जात आहे.



“फेजर्वरया गोमेची” – गोव्यात आढळून आलेली नवीन बेडूक प्रजाती 
पश्चिम घाटाच्या गोव्यातील भागाच्या डोंगराळ प्रदेशामध्ये संशोधकांना बेडूकाची एक नवीन प्रजाती आढळून आली आहे. त्याला हे नाव दिले गेले – “फेजर्वरया गोमेची”. हे नाव गोव्याच्या (गोमेची) ऐतिहासिक नावावरून ठेवण्यात आले आहे.

ही प्रजाती गोव्याच्या लोनावित पठाराच्या उंच भागात, तात्पुरत्या पाणवठ्यामध्ये आणि धान्याच्या क्षेत्रात आढळली. दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियामधील बहुतेक “फेजर्वरया” प्रजातीचे बेडूक त्यांच्या केवळ आकृतिबंधांच्या आधारावर ओळखणे कठिण आहे
Scroll to Top