चालू घडामोडी २८ मे २०१८

चालू घडामोडी २८ मे २०१८

गृह मंत्रालयात महिला सुरक्षा विभागाची स्थापना 
नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्रालयाने स्त्रियांच्या सुरक्षेसंबंधी मुद्द्यांना हाताळण्यासाठी एका नव्या विभागाची स्थापना केली आहे.


महिला सुरक्षा विभाग संबंधित मंत्रालये, विभाग आणि राज्य शासनांच्या समन्वयाने स्त्रियांच्या सुरक्षेसंबंधी सर्व आयामांकडे म्हणजे सोयी-सुविधा, योजना, निर्भया कोष, धोरणे तसेच क्राइम अँड क्रिमिनल ट्रेकिंग अँड नेटवर्क सिस्टम (CCTNS) आणि राष्ट्रीय गुन्हे नोंद खाते (NCRB) यासारख्या बाबींकडे लक्ष देणार आहे. 



ईस्टर्न पेरीफेरल द्रुतगती मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘ईस्टर्न पेरिफेरल द्रुतगती मार्गा’चे उद्घाटन करण्यात आले आहे. हा मार्ग दिल्लीला गाझियाबाद, फरीदाबाद, ग्रेटर नोएडा आणि पलवल यांच्याशी जोडतो.

१३५ किलोमीटर लांबीच्या या सिग्नल फ्री मार्गावर ताशी १२० किलोमीटरच्या गतीने वाहन चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. विक्रमी ५०० दिवसात ११००० कोटी रुपयांच्या खर्चाने बांधण्यात आलेला सहा पदरी मार्ग सर्व अत्याधुनिक संनियंत्रण व देखरेख सुविधांनी सुसज्जित आहे. उत्तरप्रदेश ते हरियाणा या दरम्यान चालणारी वाहतूक आता दिल्लीच्या बाहेरून होणार.

शिवाय, दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गाच्या ९ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे देखील उद्घाटन करण्यात आले आहे



गीता कपूर यांचे निधन 
पाकिजा आणि रजिया सुलतान या सिनेमांमधून उल्लेखनीय काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री गीता कपूर यांचे मुंबईतील वृद्धाश्रमात वृद्धापकाळाने निधन झाले आहे.

गीता कपूर यांनी कमाल अमरोही यांच्या पाकीजा सिनेमात राजकुमार यांच्या दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारली होती.



अर्जुन वाजपेयी ८००० मीटरपेक्षा उंच सहा शिखरांना सर करणारा सर्वात तरुण व्यक्ती 
भारताचा युवा पर्वतारोही अर्जुन वाजपेयी (२४ वर्ष) हा ‘समिट सिक्स’ मध्ये ८००० मीटरपेक्षा उंच असलेल्या सहा पर्वतशिखरांना सर करणारा सर्वात तरुण व्यक्ती ठरला आहे.

मोहिमेमधील शेवटच्या जगातली तिसरी सर्वात उंच कांचनजंगा (८५८६ मीटर)च्या शिखरावर चढाई करत २४ वर्षीय वाजपेयीने नवा जागतिक विक्रम बनविलेला आहे.

‘समिट सिक्स’ मध्ये एव्हरेस्ट (८८४८ मी), ल्होत्से (८५१६ मी), मनास्लू (८१६३ मी), चोय (८२०१ मी), मकालू (८४८५ मी), कांचनजंगा (८५८६ मी) या पर्वतांवर चढाई केली जाते.


रिअल माद्रिदने चॅम्पियन्स लीग जिंकली 
स्पेनचा फुटबॉल संघ – रिअल माद्रिद – ने अंतिम सामन्यात इंग्लंडच्या लिव्हरपूल संघाचा पराभव करत UEFA चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकली आहे. किव्ह (युक्रेनची राजधानी) येथे हा सामना खेळला गेला.

रिअल माद्रिदचे हे चॅम्पियन्स लीगचे सलग तिसरे आणि पाच वर्षांतले चौथे विजेतेपद आहे. 

UEFA चॅम्पियन्स लीग ही यूनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA)कडून आयोजित केली जाणारी वार्षिक युरोप खंडातली क्लब फुटबॉल स्पर्धा आहे. १९५५ साली ही स्पर्धा पहिल्यांदा खेळली गेली होती.



कोलंबिया NATO मध्ये सहभागी होणारा लॅटिन अमेरिकेमधील पहिला देश 
कोलंबिया उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO) मध्ये औपचारिकपणे सामील झाले आहे आणि यासोबतच हा NATO मध्ये सामील होणारा लॅटिन अमेरिकेमधील पहिला देश ठरला आहे. 

अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इराक, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मंगोलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या देशांच्या श्रेणीत कोलंबिया सामील झाले आहे.

उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO) हे ४ एप्रिल १९४९ रोजी उत्तर अटलांटिक कराराच्या आधारावर उत्तर अमेरिकेतील व युरोपीय राज्यांनी स्थापन करण्यात आलेली आंतर-शासकीय सैन्य युती आहे. NATO चे मुख्यालय ब्रुसेल्स (बेल्जियम) मध्ये आहे.



जर्मनीत ‘२०१८ वैश्विक पवन शिखर परिषद’चे आयोजन 
जर्मनीच्या हॅम्बर्ग शहरामध्ये २५-२८ सप्टेंबर २०१८ या कालावधीत प्रथमच ‘वैश्विक पवन शिखर परिषद’ याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या चार दिवसीय कार्यक्रमात भारत, चीन, अमेरिका, स्पेन आणि डेन्मार्कसह १०० देशांमधून प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे.

पवन ऊर्जा उद्योग जगतातली ही जागतिक पातळीवरची सर्वात मोठी बैठक आहे. चीन, अमेरिका आणि जर्मनी या देशांनंतर प्रस्थापित ३३ GW क्षमतेसह पवन ऊर्जा निर्मिती क्षमतेत भारत चौथ्या क्रमांकाचा देश आहे.
Scroll to Top