राजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेरराजकीय पक्ष माहिती अधिकार कायद्याच्या (आरटीआय) कक्षेत असल्याचा निर्णय केंद्रीय माहिती आयोगाने पाच वर्षांपूर्वी दिला असताना निवडणूक आयोगाने मात्र विसंगत भूमिका घेतली आहे.
राजकीय पक्ष ‘आरटीआय’ कक्षेत येत नसल्याचा दावा निवडणूक आयोगाने माहिती अधिकाराखालील अर्जावर निर्णय देताना केला. यामुळे माहिती आयोग आणि निवडणूक आयोग आमने-सामने आले असून, नवा वाद निर्माण होण्याचे संकेत आहेत.
भाजप, कॉंग्रेस, बसप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, माकप आणि समाजवादी पक्ष या सहा राष्ट्रीय पक्षांना निवडणूक रोख्यांद्वारे किती देणगी मिळाली, अशी विचारणा करणारा अर्ज पुण्यातील विहार दुर्वे यांनी माहिती अधिकाराखाली केला होता. त्यास उत्तर देताना निवडणूक आयोगाने ही भूमिका घेतली.
‘माहिती अधिकार अर्जाद्वारे मागवलेली माहिती निवडणूक आयोगाकडे उपलब्ध नाही. ही माहिती राजकीय पक्षांशी संबंधित असून, हे पक्ष आरटीआयच्या कक्षेत नाहीत.
अक्षय कुमारकडून दुहेरी टाक्यांचे शौचालय तंत्रज्ञानासाठी प्रचार मोहीमेचा शुभारंभअभिनेता अक्षय कुमार यांनी दिल्लीत २०१४ मध्ये सुरुवात करण्यात आलेले स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) यासाठी एक प्रचार मोहिम सुरू केली आहे. ही मोहीम पेयजल व स्वच्छता मंत्रालयाकडून चालवल्या जात आहे.
या मोहिमेंतर्गत ग्रामीण भारतात दुहेरी टाक्यांचे शौचालय या तंत्रज्ञानाचा प्रचार करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. अक्षय कुमार यांच्यासोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर याही साथ देणार आहेत.
दिल्ली मेट्रोच्या मॅजेन्टा लाइनचे उदघाटनदिल्ली मेट्रोच्या २४.८२ किलोमीटर लांब मॅजेन्टा लाइनचे उद्घाटन करण्यात आले आहे. हा मार्ग जनकपुरी वेस्ट आणि कल्काजी मंदिर या ठिकाणांना आपापसात जोडते.
या मार्गाला ‘नॉलेज कॉरीडॉर’ म्हणून देखील ओळखले जाते आहे कारण यामुळे दिल्ली-राष्ट्रीय राजधानी प्रदेश (NCR) क्षेत्रातली चार प्रमुख विद्यापीठे जोडली गेली आहेत. ते आहेत – जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, IIT, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ आणि अमिटी युनिव्हर्सिटी.
हा विधेयक ‘सिंध हिंदू विवाह अधिनियम-२०१६’ या कायद्यात बदल करणार आहे. पतीचा मृत्यू झाल्यानंतर सहा महिन्यांनी हिंदू स्त्रियांना विवाह करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिवाय स्त्रियांना त्यांची विवाहगाठी तोडण्यासाठी याचिका दाखल करण्यास परवानगी दिली गेली आहे.
पाकिस्तान हा दक्षिण आशियामधील एक देश आहे. पाकिस्तान हे केंद्रीय घटनात्मक प्रजासत्ताक असून देशात चार सुभे (परगणा) आणि चार केंद्रशासित प्रदेश आहेत. इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आहे. पाकिस्तानी रुपया हे राष्ट्रीय चलन आहे.
चेन्नई सुपरकिंग्ज तिसऱ्यांदा आयपीएल विजेता संघमुंबईच्या वानखेडे मैदानावर हजारो प्रेक्षकांच्या साथीने, चेन्नई सुपरकिंग्जने आपण आयपीएलमधले सर्वात प्रसिद्ध संघ का आहोत याची जाणीव सर्वांना करुन दिली आहे.
सलामीवीर शेन वॉटसनचे नाबाद आक्रमक शतक आणि त्याला चेन्नईच्या इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर, अंतिम सामन्यात चेन्नईने हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला.
तसेच हैदराबादने विजयासाठी दिलेले १७९ धावांचे आव्हान चेन्नईने अवघ्या २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. आयपीएल सीझनच्या अकरावा आणि आता पर्यंत तिसर्यांदा विजेता संघ ठरले.
भारतात ‘ग्रीन’ क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी BCCI आणि UNEP मध्ये करारभारतात ‘ग्रीन’ क्रिकेट संकल्पनेखाली खेळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) आणि संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) यांच्यात एक करार झाला आहे.
देशासमोर असलेल्या प्रमुख पर्यावरणीय आव्हानांबद्दल जागरुकता वाढविण्याच्या उद्देशाने हरित उपक्रमांमध्ये क्रिकेटपटू व चाहत्यांना पर्यावरणीय प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यास प्रोत्साहन दिले जाईल, ज्यामधून खेळादरम्यान मैदानावर दर्शकांकडून होणार्या प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी त्याच्या पुनर्वापरावर जोर दिला जाईल.
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) ची तामिळनाडू सोसायटी नोंदणी कायद्याच्या अंतर्गत डिसेंबर १९२८ मध्ये स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) हा ५ जून १९७२ रोजी स्थापन करण्यात आलेला संयुक्त राष्ट्रसंघाचा एक विभाग आहे, जे पर्यावरणविषयक धोरणे आणि पद्धती यांच्या अंमलबजावणीमध्ये मदत करते. याचे मुख्यालय नैरोबी (केनिया) येथे आहे.
जगातल्या पहिल्या पाच सर्वात स्वस्त हवाई सेवांमध्ये इंडिगो आणि एयर इंडियाचा समावेशग्लोबल फ्लाइट प्राइसिंग अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या जगातल्या सर्वात स्वस्त आंतरराष्ट्रीय हवाई सेवाप्रदात्या कंपन्यांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये एयर इंडिया एक्सप्रेस (दूसरा) आणि इंडिगो इंडिया (पाचवा) या भारतीय कंपन्यांनी जागा मिळवलेली आहे.
एयर एशिया एक्स ही प्रती किलोमीटर USD 0.07 या दरासह जगातली सर्वात स्वस्त आंतरराष्ट्रीय हवाई सेवाप्रदाता कंपनी ठरली आहे. तर इंडोनेशियाची एयर एशिया आणि प्रायमेरा एयर हे अनुक्रमे तिसर्या व चौथ्या स्थानी आहेत.
एयर इंडिया एक्सप्रेस ही एयर इंडियाची संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे. शिवाय या बाबतीत जेट एयरवेज १२व्या तर एयर इंडिया १३व्या क्रमांकावर आहेत.

२०१७-१८ या आर्थिक वर्षांत निवडणूक रोख्यांद्वारे मिळालेल्या देणगीचा तपशील हे पक्ष ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत सादर करू शकतील’, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
अक्षय कुमारकडून दुहेरी टाक्यांचे शौचालय तंत्रज्ञानासाठी प्रचार मोहीमेचा शुभारंभअभिनेता अक्षय कुमार यांनी दिल्लीत २०१४ मध्ये सुरुवात करण्यात आलेले स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) यासाठी एक प्रचार मोहिम सुरू केली आहे. ही मोहीम पेयजल व स्वच्छता मंत्रालयाकडून चालवल्या जात आहे.
या मोहिमेंतर्गत ग्रामीण भारतात दुहेरी टाक्यांचे शौचालय या तंत्रज्ञानाचा प्रचार करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. अक्षय कुमार यांच्यासोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर याही साथ देणार आहेत.
दुहेरी टाक्यांचे शौचालय तंत्रज्ञान विशेषत: ग्रामीण भागासाठी म्हणून भारतामध्ये विकसित करण्यात आले आहे आणि याची भारत सरकार तसेच जागतिक आरोग्य संघटनेकडून शिफारस केली जात आहे.
यापासून ग्रामीण कुटुंबाला १ वर्षात विघटित कचर्यापासून NPK (नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम) पोषक घटकांनी भरपूर असे खत मिळू शकते.
दिल्ली मेट्रोच्या मॅजेन्टा लाइनचे उदघाटनदिल्ली मेट्रोच्या २४.८२ किलोमीटर लांब मॅजेन्टा लाइनचे उद्घाटन करण्यात आले आहे. हा मार्ग जनकपुरी वेस्ट आणि कल्काजी मंदिर या ठिकाणांना आपापसात जोडते.
या मार्गाला ‘नॉलेज कॉरीडॉर’ म्हणून देखील ओळखले जाते आहे कारण यामुळे दिल्ली-राष्ट्रीय राजधानी प्रदेश (NCR) क्षेत्रातली चार प्रमुख विद्यापीठे जोडली गेली आहेत. ते आहेत – जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, IIT, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ आणि अमिटी युनिव्हर्सिटी.
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात हिंदू समुदायाच्या विधवेला पुनर्विवाह करण्याची परवानगीहिंदू समुदायाच्या विधवा स्त्रीला पुनर्विवाह करण्याची अनुमती देणारा एक ऐतिहासिक विधेयक पाकिस्तानातल्यासिंध प्रांताच्या विधानसभेने मंजूर केला आहे.