‘2019 खेलो इंडिया खेळ’ याची सांगता झाली; महाराष्ट्र अव्वल ठरले
दि. 9 ते 13 जानेवारी या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या पुणे शहरात खेळल्या गेलेल्या ‘2019 खेलो इंडिया खेळ’ या क्रिडा महोत्सवाची सांगता झाली.
खो-खोमध्ये महाराष्ट्राने मुलांच्या 17 व 21 वषार्खालील गटात विजय मिळविला.
ब्रह्म दत्त: यस बॅंकेचे नवे अध्यक्ष
माजी IAS अधिकारी ब्रह्म दत्त यांची यस बँकेच्या (Yes Bank) अंशकालिक गैर-कार्यकारी अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली आहे. ही नियुक्ती दि. 4 जुलै 2020 पर्यंत प्रभावी करण्यात आली आहे.
सिक्किम राज्य सरकारची ‘एक कुटुंब एक नोकरी’ योजनासिक्किम राज्य सरकारने दि. 12 जानेवारी 2019 रोजी राज्यात ‘एक कुटुंब एक नोकरी’ (One Family One Job) योजना लागू केली आहे.
प्रिमीयर बॅडमिंटन लीग ही सांघिक स्पर्धा आहे, जी भारतीय बॅडमिंटन महामंडळ (IBL) द्वारे व्यवस्थापित केली जाते आणि व्यवसायिक स्वरुपात IBL च्या मालकीची आहे. 2013 साली ‘इंडियन बॅडमिंटन लीग’ (IBL) या नावाने ही स्पर्धा सुरू करण्यात आली.
दि. 9 ते 13 जानेवारी या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या पुणे शहरात खेळल्या गेलेल्या ‘2019 खेलो इंडिया खेळ’ या क्रिडा महोत्सवाची सांगता झाली.
स्पर्धेअंती,पदकतालिकेत अग्रस्थानी महाराष्ट्र राहले. महाराष्ट्र राज्याने 56 सुवर्ण, 44 रौप्य आणि 56 कांस्यपदकांची कमाई करीत पहिल्या क्रमांकावर स्पर्धा संपवली. महाराष्ट्राच्या पाठोपाठ दिल्ली (42 सुवर्ण, 27 रौप्य आणि 38 कांस्य) आणि हरियाणा (33 सुवर्ण, 34 रौप्य आणि 36 कांस्य) यांचा क्रमांक लागला.
खो-खोमध्ये महाराष्ट्राने मुलांच्या 17 व 21 वषार्खालील गटात विजय मिळविला.
पश्चिम बंगालच्या मेहुली घोष या आंतरराष्ट्रीय खेळाडूने 10 वर्षीय खेळाडू अभिनव शॉ याच्या साथीत 10 मीटर एयर रायफल मिश्रदुहेरी विभागात सुवर्णपदक पटकाविले. 10 वर्षांच्या खेळाडूने सुवर्णपदक मिळवण्याची ही पहिलीच कामगिरी आहे.
या क्रिडा महोत्सवात 18 क्रिडाप्रकारांचा समावेश करण्यात आला होता. तिरंदाजी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, लॉन टेनिस, टेबल टेनिस जिम्नॅस्टिक्स, ज्युदो, नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस, हॉकी, वेटलिफ्टिंग, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, व्हॉलीबॉल असे 18 खेळ होते
ब्रह्म दत्त: यस बॅंकेचे नवे अध्यक्ष
माजी IAS अधिकारी ब्रह्म दत्त यांची यस बँकेच्या (Yes Bank) अंशकालिक गैर-कार्यकारी अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली आहे. ही नियुक्ती दि. 4 जुलै 2020 पर्यंत प्रभावी करण्यात आली आहे.
भारतातली चौथ्या क्रमांकाची खासगी क्षेत्रातली बँक असलेल्या यस बँकेला भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून ‘बँकिंग नियमन अधिनियम-1949’ अन्वये परवानगी प्राप्त झाली आहे.
ब्रह्म दत्त जुलै 2013 पासून स्वतंत्र संचालक म्हणून यस बँकेच्या संचालक मंडळावर कार्यरत आहेत. शिवाय ते ‘नामनिर्देशन आणि वेतन समिती’चे अध्यक्षही आहेत.
त्यांनी आपल्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत कर्नाटक सरकार तसेच केंद्र सरकारमध्ये अनेक जबाबदार्या सांभाळलेल्या आहेत. त्यांनी पूर्वी मंत्रिमंडळ सचिवालयात तसेच रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सचिव म्हणून कार्य पाहिले होते.
सिक्किम राज्य सरकारची ‘एक कुटुंब एक नोकरी’ योजनासिक्किम राज्य सरकारने दि. 12 जानेवारी 2019 रोजी राज्यात ‘एक कुटुंब एक नोकरी’ (One Family One Job) योजना लागू केली आहे.
मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांच्या नेतृत्वात राज्य सरकार राज्यातल्या प्रत्येक कुटुंबामधील एका सदस्याला एकतरी सरकारी नोकरी मिळावी या उद्देशाने ही योजना राबवित आहे. अश्या प्रकारचा खास कार्यक्रम चालविणारे हे देशातले पहिलेच राज्य ठरले आहे.
या अनुषंगाने 12 जानेवारीला गंगटोकमध्ये आयोजित रोजगार मेळाव्यात 12,000 हून अधिक बेरोजगार तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. सुरूवातीला फक्त त्या कुटुंबांच्या सदस्यांना नियुक्ती पत्र दिले गेलेत, जे सध्या सरकारी नोकरीमध्ये नाहीत. यापूर्वीच 25,000 पेक्षा अधिकांना नोकर्या दिल्या गेल्या.
केवळ 6.4 लक्ष लोकसंख्या असलेल्या या राज्यात वर्तमानात 1 लक्ष नियमित सरकारी कर्मचारी आहेत. शिवाय सिक्किम हे देशातले एकमेव राज्य आहे, जे सरकारी कर्मचार्यांना सर्वाधिक वेतन देते.
UAE आणि सौदी अरब या देशांनी कृषी उत्पन्नासाठी भारताची निवड केली
संयुक्त अरब अमिरात (UAE) आणि सौदी अरब या दोन आखाती देशांमधील अन्न सुरक्षेसंबंधी समस्येचे निराकरण करण्यासाठी भारताचा आधार घेण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे.
संयुक्त अरब अमिरात (UAE) आणि सौदी अरब या दोन आखाती देशांमधील अन्न सुरक्षेसंबंधी समस्येचे निराकरण करण्यासाठी भारताचा आधार घेण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे.
मुंबईत झालेल्या भारतीय उद्योग संघ (CII) याच्या 25व्या ‘भागीदारी शिखर परिषद’मध्ये याबाबत घोषणा करण्यात आली.
भारताच्या निर्यात धोरणाला चालना देणारा हा निर्णय पहिल्यांदाच कृषीमाल तसेच दुग्ध, फलोत्पादन आणि मत्स्यपालन अश्या शेती-पूरक यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळविण्यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे.
त्यासाठी आखण्यात आलेला भारत सरकारचा ‘फार्म-टू-पोर्ट’ प्रकल्प हा विशेष आर्थिक क्षेत्राच्या संरचनेप्रमाणेच आहे, परंतु यात कॉरपोरेट पद्धतीने शेती करण्याची शैली वापरात आणली जाणार जेथे आखाती देशांच्या बाजारपेठेने ठरवून दिलेल्या मानदंडाप्रमाणे पीक घेतले जाईल.
भारताची ही संकल्पना दोन्ही आखाती देशांच्या सरकारांनी स्वीकारलेली आहे. त्यादृष्टीने संयुक्त अरब अमिरात (UAE) भारतात सेंद्रीय आणि अन्न-प्रक्रिया उद्योगांमध्ये गुंतवणूक करू इच्छित आहे.
बेंगळूरू रॅप्टर्स: 2019 प्रिमीयर लीग सांघिक बॅडमिंटन स्पर्धेचा विजेता
बेंगळूरू येथे खेळल्या गेलेल्या ‘2019 प्रिमीयर लीग’ सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत बेंगळूरू रॅप्टर्सने अंतिम सामन्यात मुंबई राँकेटस् यांचा पराभव करीत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे.
बेंगळूरू येथे खेळल्या गेलेल्या ‘2019 प्रिमीयर लीग’ सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत बेंगळूरू रॅप्टर्सने अंतिम सामन्यात मुंबई राँकेटस् यांचा पराभव करीत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे.
या विजयासह बेंगळूरू रॅप्टर्सने त्यांचे पहिले प्रिमीयर बॅडमिंटन लीग जिंकले आहे. बेंगळूर रॅप्टर्स या संघात किडांबी श्रीकांत, वु जी त्रांग तसेच मोहम्मद अहसान आणि हेंदरा सतीयावान यांच्या पुरुष दुहेरी जोडीने आपापले सामने बेंगळूरूसाठी जिंकले आहेत.
प्रिमीयर बॅडमिंटन लीग ही सांघिक स्पर्धा आहे, जी भारतीय बॅडमिंटन महामंडळ (IBL) द्वारे व्यवस्थापित केली जाते आणि व्यवसायिक स्वरुपात IBL च्या मालकीची आहे. 2013 साली ‘इंडियन बॅडमिंटन लीग’ (IBL) या नावाने ही स्पर्धा सुरू करण्यात आली.
स्पर्धेत सहा संघ भाग घेतात. प्रत्येक संघात 11 खेळाडू असतात, ज्यात जास्तीतजास्त पाच परदेशी खेळाडू आणि कमीतकमी तीन महिला खेळाडू असतात आणि प्रत्येक संघाला किमान 2.12 कोटी रुपयांपर्यंत रक्कम खर्च करण्याची आवश्यकता असते.