चालू घडामोडी ६ जानेवारी २०१९

चालू घडामोडी ६ जानेवारी २०१९

भारतीय विज्ञान कॉंग्रेस संमेनल

सौरऊर्जेवर चालणारे पीक काढणारे यंत्र, वापरलेल्या खाद्यतेलापासून साबण, अपंगांना मदत करणारा यंत्रमानव अशा बालवैज्ञानिकांच्या आविष्कारांनी भारतीय विज्ञान काँग्रेसमधील ‘किशोर वैज्ञानिक संमेलन’ सजले आहे. या संमेलनाचे उद्घाटन नोबेल विजेत्या संशोधकांच्या हस्ते ४ जानेवारी रोजी करण्यात आले.  

आंध्र प्रदेश येथील विद्यार्थ्यांनी पिकांची काढणी करणारे यंत्र तयार केले आहे. हे यंत्र सौरऊर्जेवर चालते. अपंग, रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण यांना मदत करणारा यंत्रमानव दिल्ली येथील विद्यार्थ्यांनी साकारला आहे.
जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थिनीने वापरलेल्या खाद्यतेलापासून तयार केलेला साबण लक्षवेधी ठरला आहे. राजस्थानमधील विद्यार्थ्यांने नदी, तलाव स्वच्छ करणारी, रिमोटवरील नाव तयार केली आहे. जलपर्णी, पडलेल्या वस्तू, धातूच्या वस्तू ही नाव गोळा करू शकते.

‘भारतात संशोधन होत आहे. त्यासाठीची गुणवत्ताही येथे आहे. मात्र या देशात संशोधनासाठी अधिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे,’ असे मत नोबेल पुरस्कार विजेते संशोधक डंकन हॅल्डेन यांनी व्यक्त केले.



लोकसभेत ‘नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र विधेयक’ संमत 
नवीन आंतरराष्ट्रीय वाद प्रकरणामधील तंटा सोडविण्यासाठी, ४ जानेवारी २०१९ रोजी लोकसभेत ‘नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र विधेयक-२०१८’ संमत करण्यात आले आहे.

या विधेयकामार्फत नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय तंटा निवारण केंद्र (International Arbitration Centre) याची स्थापना करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. भारत सरकारने देशाला तंटा निवारण प्रक्रियेबाबत एक केंद्र बनविण्याचा उद्देश्य ठेवला आहे.

भारत देशात संस्थात्मक तंटा निवारणासाठी तसेच आंतरराष्ट्रीय पर्यायी तंटा निवारण केंद्र (International Centre for Alternative Dispute Resolution -ICADR) याच्या उपक्रमांच्या संपादन आणि हस्तांतरणासाठी एका स्वतंत्र आणि स्वायत्त जागतिक दर्जाच्या न्यायधिकरणाची स्थापना करण्याचा प्रयत्न करीत आहे.

आंतरराष्ट्रीय पर्यायी तंटा निवारण केंद्र (ICADR) सर्वोच्च न्यायालयाच्या अधीनतेखाली कार्य करीत आहे, ज्याची १९९५ मध्ये स्थापना करण्यात आली. भारताचे मुख्य न्यायाधीश या केंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आहेत.

हे केंद्र तंटा निवारण प्रक्रियेच्या वातावरणामध्ये सक्रियपणे कार्य करीत नाही आहे. त्यामुळे नवे केंद्र ICADRच्या उपक्रमांची जबाबदारी आपल्याकडे घेणार.


पत्रकारितेच्या क्षेत्रातला प्रतिष्ठित ‘रामनाथ गोयंका’ पुरस्कारांचे वितरण 
४ जानेवारी २०१९ रोजी पत्रकारिता क्षेत्रात दिले जाणारे प्रतिष्ठित ‘रामनाथ गोयंका’ पुरस्कारांचे वाटप करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते नवी दिल्लीत एका समारंभात हे पुरस्कार दिले गेलेत.

यावर्षी विविध श्रेणींमध्ये भारतभरातील २९ पत्रकारांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यातीलच काही पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत

बेस्ट ऑफ द स्पॉट रिपोर्टिंग/ब्रॉडकास्टिंग श्रेणी – जगविंदर पटियाल (एबीपी)

पॉलिटिकल रिपोर्टिंग श्रेणी – ब्रजेश राजपूत (एबीपी) आणि सुशांत कुमार सिंग (इंडियन एक्सप्रेस) 

अंडरकवरिंग इंडिया इंव्हिजिबल रिपोर्टिंग/ब्रॉडकास्टिंग श्रेणी – प्रतिमा मिश्रा (एबीपी न्यू) 

हिंदी स्टोरी/जनर्लिजम श्रेणी – अभिसार शर्मा (एबीपी न्यू) 

इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टिंग/ब्रॉडकास्टिंग श्रेणी – आनंद कुमार पटेल (इंडिया टुडे) 

रिजनल लॅंगवेज श्रेणी – एम. गुनासेकरन (न्यूज 18 तामिळनाडू), निशांत दत्ताराम सरवंकार आणि संदीप अशोक आचार्य (लोकसत्ता) 

एनवायरनमेंट श्रेणी – सुशील चंद्र बहुगुना (NDTV), संध्या रवीशंकर (द वायर)

पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी दरवर्षी रामनाथ गोयंका मेमोरियल फाउंडेशनतर्फे प्रतिष्ठित ‘रामनाथ गोयंका’ पुरस्कार दिला जातो. प्रथम २००६ साली हा पुरस्कार दिला गेला.



पाकिस्तानी लष्कराने स्वदेशी ‘ए-१००’ अग्निबाण विकसित केले 
पाकिस्तानी लष्करात मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीम (MLRS) मध्ये देशातच विकसित ‘ए-१००’ अग्निबाण सामील करण्यात आले आहे.

‘ए-१००’ अग्निबाण १०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर मारा करण्याची क्षमता ठेवते.



युक्रेनच्या ऑर्थोडॉक्स चर्चला रशियाच्या ऑर्थोडॉक्स चर्चकडून स्वातंत्र्य मिळाले
युक्रेनच्या ऑर्थोडॉक्स चर्चने ५ जानेवारी २०१९ रोजी अधिकृतपणे स्वातंत्र्य मिळविले. युक्रेनच्या विभाजनामुळे रशियाच्या ऑर्थोडॉक्स चर्चच्या १५० दशलक्ष सदस्यांपैकी ३०-४०% कमी होऊ शकणार.

रशिया आणि युक्रेन हे देश सोव्हिएत संघाच्या विभाजनामधून तयार झालेली आहेत. शतकानुशतके बांधील असलेल्या रशियाच्या ऑर्थोडॉक्स चर्चपासून विभाजनासाठी इस्तंबूलमध्ये एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

युक्रेन हा पूर्व युरोपातला एक देश आहे. किव हे देशाचे राजधानी शहर आहे आणि युक्रेनियन रिव्निया हे देशाचे अधिकृत चलन आहे.
Scroll to Top