चालू घडामोडी ११ जानेवारी २०१९

“वेब-वंडर वुमेन” मोहीमेचा शुभारंभभारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने “#www: वेब-वंडर वुमेन” नावाची एक ऑनलाइन मोहीम सुरू केली आहे.


सामाजिक माध्यमाद्वारे सामाजिक बदलासाठी सकारात्मक कार्य करणार्‍या स्त्रियांच्या अपवादात्मक यशाचा शोध घेणे आणि त्यांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने ही मोहीम चालवली जात आहे.

आरोग्य, माध्यम, साहित्य, कला, क्रिडा, पर्यावरण, फॅशन अश्या विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या स्त्रियांना आणि देशभरामधील स्त्रियांना प्रोत्साहन देण्यासाठी ही मोहीम चालवली जात आहे



मेघालयाच्या पहिल्या स्वदेश दर्शन प्रकल्पाचे उद्घाटनमेघालयमध्ये भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन योजनेच्या अंतर्गत पूर्ण करण्यात आलेल्या राज्यामधील पहिल्या प्रकल्पाचे ९ जानेवारी २०१९ रोजी उद्घाटन करण्यात आले आहे.

“ईशान्य परिक्रमाचा विकास: उमियाम (सरोवराचे दृश्य) – यू लुम सोहपेटबिनेंग – माउदिआंगडियांग – ऑर्चिड लेक रिसॉर्ट” प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. हा प्रकल्प ९९.१३ कोटी रुपये खर्चून पूर्ण करण्यात आला आहे.

भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रसाद (Pilgrimage Rejuvenation and Spiritual Augmentation Drive -PRASAD) आणि स्वदेश दर्शन योजना २०१४-१५ मध्ये सुरू केली. 

देशात विषय आधारित पर्यटन परिक्रमा प्रकल्प विकसित करण्याच्या उद्देशाने ‘स्वदेश दर्शन’ योजना सुरू केली गेली आहे. या योजनेच्या अंतर्गत विकासासाठी १३ पर्यटन परिक्रमांची ओळख पटविण्यात आलेली आहे.

ते आहेत – बुद्धीष्ट परिक्रमा, ईशान्य भारत परिक्रमा, सागरकिनारा परिक्रमा, हिमालय परिक्रमा, कृष्ण परिक्रमा, वाळवंट परिक्रमा, पर्यावरणीय परिक्रमा, वन्यजीव परिक्रमा, आदिवासी परिक्रमा, ग्रामीण परिक्रमा, धार्मिक परिक्रमा, रामायण परिक्रमा आणि वारसा परिक्रमा.

आतापर्यंत मंत्रालयाने 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 73 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.



इक्वाइन इन्फेक्षीयस ऍनिमिया या पशुरोगासाठी रिकॉम्बिनंट ‘ELISA’ तपासणी किट सादर
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून ‘इक्वाइन इन्फेक्षीयस ऍनिमिया’ या रोगासाठी रिकॉम्बिनंट ‘ELISA (Enzyme-linked immune sorbent assay)’ तपासणी किट सादर करण्यात आली आहे.

ग्लॅंडर्स (घोडा, गाढव यासारखा पशूंना होणारा आजार) आणि इक्वाइन संक्रामक ऍनिमिया (घोड्याला होणारा आजार) या दोन रोगांसाठी ही किट आहे

नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्वाइन्स (NRCE) ने ही तपासणी किट तयार केली आहे. भारतात लक्षणीय प्रमाणात आढळून येणार्‍या या रोगांचे नियंत्रण आणि उन्मूलन करण्यासाठी विशेष निदान आवश्यक आहे.

ग्लॅंडर्स रोग बुर्खोल्डराय मलाई या जीवाणूमुळे होतो. त्यासाठीची रिकॉम्बिनंट Hcp1 अॅंटीजेन ‘ELISA’ ही पूरक-निर्धारण तपासणी (CTF) याला पर्यायी तपासणी सुविधा आहे. तर इक्वाइन इन्फेक्षीयस अॅनिमीया (EIA) साठीची तपासणी तंत्र ‘कॉजिन्स तपासणी चाचणी’ ला पर्याय आहे.



RBIने डिजिटल देयकांना प्रोत्साहन देण्यासाठी समिती नेमली
भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) देशात डिजिटल देयकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यासंबंधी उपाययोजना करण्याविषयी शिफारसी देण्यासाठी एक उच्च-स्तरीय समिती नेमली आहे.

ही समिती नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली आहे. पाच सदस्यांची ही समिती दुसर्‍या देशांमधील प्रभावी योजनांचे आकलन करून डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित होण्यास उपाययोजना सुचविणार.

गेल्या काही वर्षांपासून डेबिट आणि क्रेडिट कार्ड, मोबाइल वॉलेट्स, रीअल-टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS), नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) आणि युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) या सर्व इलेक्ट्रॉनिक पद्धतींच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 

2016 साली कार्यरत करण्यात आलेली युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI), जी डिजिटल देयकांची नवीन पद्धत आहे, या पद्धतीमार्फत गेल्या वर्षीच्या व्यवहारांच्या संख्येत 300% ने वाढ नोंदविली आहे.



‘2019 आफ्रिका कप ऑफ नेशन्स’ स्पर्धा इजिप्तमध्ये खेळली जाणार
इजिप्तमध्ये यावर्षीची म्हणजेच ‘2019 आफ्रिका कप ऑफ नेशन्स’ ही फूटबॉल स्पर्धा खेळली जाणार आहे.

आफ्रिका कप ऑफ नेशन्स (आफ्रिकी देशांचा चषक) ही आफ्रिका खंडात आयोजित केली जाणारी एक फुटबॉल स्पर्धा आहे. ह्यातील विजेत्याला आफ्रिकाचा विजेता हे पद मिळते, तसेच फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेत आमंत्रण मिळते.

सन 1957 साली ही स्पर्धा पहिल्यांदा खेळवली गेली व 1968 सालापासून दर दोन वर्षांनी खेळली जाते. ही स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी आफ्रिक्री फुटबॉल महासंघ (CAF) कडे आहे
Scroll to Top