भारताचा ‘लष्कर दिन’: 15 जानेवारी
भारतीय लष्कराचा स्थापना दिवस म्हणून देशात दरवर्षी 15 जानेवारीला ‘लष्कर दिन’ पाळला जातो. यावर्षी 71 वा लष्कर दिन पाळला गेला.
स्थावर मालमत्ता क्षेत्राला GST अंतर्गत आणण्यासाठी नितीन पटेल समितीची नेमणूक
स्थावर मालमत्ता (real state) क्षेत्राला वस्तू व सेवा कर (GST) प्रणालीच्या अंतर्गत आणण्यासाठी गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या नेतृत्वात एक मंत्रीमंडळ समिती नेमण्यात आली आहे.
कोचीमध्ये भारतातले सर्वात मोठे स्टार्टअप इनक्यूबेटर (संगोपन केंद्र) उघडले
केरळ राज्याच्या कोची शहरात तंत्रज्ञान नाविन्यता क्षेत्र (TIZ) येथे 1.8 लक्ष चौ. फूट क्षेत्रफळाच्या परिसरात भारतामधील सर्वात मोठे स्टार्टअप इनक्यूबेटर (संगोपन केंद्र) उभारण्यात आले आहे.
भारतीय लष्कराचा स्थापना दिवस म्हणून देशात दरवर्षी 15 जानेवारीला ‘लष्कर दिन’ पाळला जातो. यावर्षी 71 वा लष्कर दिन पाळला गेला.
‘लष्कर दिन’ हा देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या वीरांना श्रद्धांजली अर्पित करण्याच्या हेतूने पाळतात.
15 जानेवारी 1949 पासूनच भारताचे लष्कर ब्रिटिश लष्करापासून पुर्णपणे वेगळे आणि मुक्त झाले. या दिनाच्या स्मृतीत दरवर्षी ‘लष्कर दिन’ साजरा केला जातो. त्यावेळी के. एम. करिअप्पा यांना भारतीय लष्कराचे ‘कमांडर-इन-चीफ’ बनविण्यात आले होते आणि ते स्वतंत्र प्रजासत्ताक भारताचे प्रथम लष्कर प्रमुख होते.
केरळमधील कोलेम बायपास रस्ता राष्ट्राला समर्पित
15 जानेवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केरळमधील राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 याचा भाग असलेल्या कोलेम बायपास रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.
15 जानेवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केरळमधील राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 याचा भाग असलेल्या कोलेम बायपास रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.
कोलेम बायपास हा 13 किलोमीटर लांबीचा दुपदरी रस्ता आहे. 352 कोटी रुपये खर्चून हा रस्ता बांधण्यात आला आहे. या मार्गात येणार्या ‘अष्टमुडी’ तलावावर तीन मोठे पुल बांधण्यात आले आहेत.
या मार्गामुळे अलप्पुझा आणि तिरुवनंतपुरम या शहरांच्या दरम्यानचा प्रवास वेळ कमी होतो. केरळ राज्यात आतापर्यंत एकूण 2280 किलोमीटरपेक्षा जास्त पट्ट्याचा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आला आहे.
स्थावर मालमत्ता क्षेत्राला GST अंतर्गत आणण्यासाठी नितीन पटेल समितीची नेमणूक
स्थावर मालमत्ता (real state) क्षेत्राला वस्तू व सेवा कर (GST) प्रणालीच्या अंतर्गत आणण्यासाठी गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या नेतृत्वात एक मंत्रीमंडळ समिती नेमण्यात आली आहे.
10 जानेवारीला झालेल्या GST परिषदेच्या बैठकीत 7 सदस्यांचा मंत्र्यांचा गट (Group of Ministers -GoM) गठित करण्याचा निर्णय घेतला गेला.
ही समिती GST प्रणालीच्या अंतर्गत स्थावर मालमत्ता क्षेत्रामध्ये तर्कसंगत दर ठरविण्यासाठी त्यासंबंधी संरचना ठरविण्यासाठी योजना तयार करणार आहे. तसेच समिती या क्षेत्रासाठी रचना योजनेचा (composition scheme) आराखडा तयार करणार आहे.
सध्या देशात GST अंतर्गत बांधकाम अवस्थेमधील मालमत्ता किंवा विक्रीच्या वेळी पूर्णत्व संबंधी प्रमाणपत्र मिळाले नसलेल्या तयार फ्लॅटसाठी 12% कर आकारले जाते.
GST पूर्वी अश्या मालमत्तेवर 15-18% कर लादला जात होता. विक्रीच्या वेळी पूर्णत्व संबंधी प्रमाणपत्र मिळाले असलेल्या स्थावर मालमत्तेवर खरेदीदारांसाठी सध्या GST लागू नाही.
कोचीमध्ये भारतातले सर्वात मोठे स्टार्टअप इनक्यूबेटर (संगोपन केंद्र) उघडले
केरळ राज्याच्या कोची शहरात तंत्रज्ञान नाविन्यता क्षेत्र (TIZ) येथे 1.8 लक्ष चौ. फूट क्षेत्रफळाच्या परिसरात भारतामधील सर्वात मोठे स्टार्टअप इनक्यूबेटर (संगोपन केंद्र) उभारण्यात आले आहे.
केरला स्टार्टअप मोहीम (KSUM) अंतर्गत हा परिसर उभारण्यात आला आहे. या संकुलात हार्डवेअर संबंधी स्टार्टअप कंपन्यांना प्रोत्साहन देणारी ‘मेकर व्हिलेज’ कंपनीची अत्याधुनिक सुविधा, वैद्यकीय तंत्रज्ञानांना प्रोत्साहन देणारी बायोनेस्ट कंपनी, हार्डवेअर संबंधी स्टार्टअप कंपन्यांसाठी भारताची प्रथम आंतरराष्ट्रीय प्रवेगक कंपनी अशी BRINC यसेच युनिटी सारख्या मोठ्या उद्योगांनी उभारलेले उत्कृष्टतेचे केंद्र आहे. याशिवाय विविध कंपन्यांचा समावेश आहे.
चीनच्या यू वेनशेंग या वकिलांनी ‘फ्रँको-जर्मन मानवी हक्क’ पुरस्कार जिंकला
बिजींग (चीन) येथील फ्रान्स आणि जर्मन देशाच्या राजदूतावासाकडून चीनच्या ‘यू वेनशेंग’ या वकिलाला यावर्षीचा ‘फ्रँको-जर्मन प्राइज फॉर ह्यूमन राइट्स अँड द रुल ऑफ लॉं’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यू वेनशेंग यांच्यासमवेत आणखी 14 जणांना हा पुरस्कार दिला गेला.

2012 साली राष्ट्रपती शी जिनपिंग पदावर आल्यानंतर चीनच्या नागरिक समाजावर अनेक निर्बंध लादण्यात आले. त्यांच्या भाष्यस्वातंत्र्यावरील मर्यादा कडक केल्या आणि शेकडो सामाजिक कार्यकर्ते आणि वकिलांना अटक केली.
यू वेनशेंग यांनी शहरात होणार्या अत्याधिक प्रदूषणाच्या परिस्थितीवरुन बिजींग सरकारच्या विरोधात खटला दाखल केला होता. त्यानंतर त्यांना 2018 साली जानेवारी महिन्यात अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर “राजकीय शक्तीचा विपर्यास रोखणे” याविषयीचा आरोप करण्यात आला.
यू वेनशेंग यांना अटक होण्याच्या आधी, त्यांनी राष्ट्रपती पदाची बहुपक्षीय निवडणूक व्हावी या मागणीसह चीनच्या संविधानात आणखी पाच दुरुस्त्या व्हाव्या यासाठी खुले पत्र पाठवले होते.
फील्ड पदक विजेता, ब्रिटिश गणितज्ञ मायकेल अटियाह यांचे निधन
11 जानेवारी 2019 रोजी जागतिक ख्यातीचे ब्रिटिश गणितज्ञ डॉ. मायकेल अटियाह यांचे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते.
गणित आणि भौतिकशास्त्राला आयझॅक न्यूटन यांच्या एकत्रित करण्याच्या पद्धतीनंतर, तेव्हापासून 1960च्या दशकात प्रथमच एखाद्याने ती पद्धत अवलंबली होती आणि ती व्यक्ती म्हणजे मायकेल अटियाह.
डॉ. अटियाह 1990 च्या दशकात लंडनमधील रॉयल सोसायटीचे अध्यक्ष होते. ते एडिनबर्ग विद्यापीठात स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्सचे मानद प्राध्यापक देखील होते. डॉ. अटियाह 20 व्या शतकातले एक सर्वात महत्त्वाचे गणितज्ञ म्हणून समजले जात होते.
ऑक्सफोर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांमध्ये असताना इसाडोर सिंगर यांच्या सहकार्याने त्यांनी स्ट्रिंग सिद्धांत आणि गेज सिद्धांत यासंदर्भात गणित आणि भौतिकशास्त्र या दोन क्षेत्रामधील एक अप्रत्यक्ष संबंध शोधून काढला.
त्यांनी के-सिद्धांत, अटियाह-सिंगर इंडेक्स प्रमेय, इंडेक्स सिद्धांत असे नवे सिद्धांत मांडले, जे भौतिकशास्त्रात महत्त्वपूर्ण ठरलेत.डॉ. अटियाह यांनी जगात शांती प्रस्थापित करण्यामध्ये देखील योगदान दिले होते.
ते सन 1997-2002 या काळात ‘विज्ञान आणि जागतिक कल्याण विषयक पगवाश परिषद’चे अध्यक्ष होते. त्या काळात त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अणुशक्तीवरून चाललेला वाद सोडविण्यामध्ये आणि मध्य-पूर्व क्षेत्रात तणाव कमी करण्यामध्ये मध्यस्थी घेतली होती.
त्यांना त्यांच्या कार्यासाठी गणित क्षेत्रातले दोन सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाले, ते म्हणजे – त्यांच्या शोधासाठी 1966 साली फील्ड पदक तर 2004 साली अॅबेल पारितोषिक. शिवाय बरेच सन्मान देखील प्राप्त झाले होते.