चालू घडामोडी २५ जानेवारी २०१९

चालू घडामोडी २५ जानेवारी २०१९

राष्ट्रीय कन्या दिन: 24 जानेवारी
राष्ट्रीय कन्या दिनाच्या निमित्ताने केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी या दिनाची ‘एंपॉवरिंग गर्ल्स फॉर ए ब्राइटर टुमॉरो’ ही संकल्पना आहे.


याप्रसंगी “इनोव्हेशन्स अन्डर BBBP” या शीर्षकाखाली एक पुस्तक अनावरीत केले गेले, ज्यात मंत्रालयाने देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये राबविलेल्या 38 नावीन्यपूर्ण उपक्रमांविषयी माहिती दिलेली आहे.

भारत सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ (BBBP) योजनेचा वर्धापन दिन म्हणून देशात दरवर्षी 24 जानेवारीला राष्ट्रीय कन्या दिन पाळतात. 2008 साली पहिल्यांदा राष्ट्रीय कन्या दिन पाळण्यात आला.



स्वायत्त ईशान्य परिषदांना बळकटी आणण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
केंद्रीय मंत्रिमंडळाने ईशान्य (उत्तर पूर्व) क्षेत्रात सहाव्या अनुसूचित क्षेत्रांमधील स्वायत्त परिषदांचे अधिकार वाढविण्याकरिता घटनेच्या अनुच्छेद क्र. 280 यामध्ये दुरूस्ती करण्यास मंजुरी दिली.

प्रस्तावित दुरुस्तीमधून आसाम, मेघालय, मिझोरम आणि त्रिपुरा यांच्या स्वायत्त जिल्हा परिषदांना अधिक अधिकार देईल.

आसाम, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा, कारबी आंगलोंग स्वायत्त प्रादेशिक परिषद आणि दिमा हसाओ स्वायत्त प्रादेशिक परिषद येथे ‘राज्य वित्त आयोग’ स्थापन केले जातील.वित्त आयोग सहाव्या अनुसूचित क्षेत्रांमधील दहा स्वायत्त जिल्हा परिषदा, ग्राम आणि नगरपालिकांना आर्थिक स्त्रोतांचे विकेंद्रीकरण करण्याची शिफारस करणार.

राज्य निवडणूक आयोग आसाम, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांमधील अनुसूचित भागात स्वायत्त परिषदा, ग्राम आणि नगरपालिका परिषदांच्या निवडणूका आयोजित करतील.ग्राम आणि नगरपालिकांमध्ये एका तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या जातील. सर्व स्वायत्त परिषदांमध्ये किमान दोन नामनिर्देशित सदस्य महिला असतील.



‘INS कोहासा’: अंडमान-निकोबार द्वीपसमूहाच्या दिगलीपूर येथे नौदलाचे नवीन हवाई तळ
भारतीय नौदलाचे प्रमुख ऍडमिरल सुनील लाम्बा यांच्या हस्ते अंडमान व निकोबार द्वीपसमूहामधील दिगलीपूर येथे ‘INS कोहासा’ या भारतीय नौदलाच्या नवीन हवाई तळाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

अंडमान व निकोबार द्वीपसमूहाच्या उत्तरेकडील भागात या हवाई तळाचा वापर संरक्षण व नागरी विमानांसाठी केला जाईल. या तळाचा वापर हेलीकॉप्टर आणि डोर्नियर सारख्या लहान विमानांचे संचालन करण्यासाठी केला जाणार.



ISROने ‘कलामसॅट’ हा जगातला सर्वात हलका उपग्रह प्रक्षेपीत केला 
24 जानेवारी 2019 रोजी विद्यार्थी संशोधनावर आधारीत ‘कलामसॅट’ या जगातील सर्वात लहान आणि हलक्या वजनाच्या उपग्रहाला प्रक्षेपीत करण्यात आले. 

याकरता ‘पोलर सॅटेलाईट लॉंच व्हीकल (PSLV) सी-44’ या प्रक्षेपकाच्या मदतीने ‘मायक्रोसॅट आर इमेजिंग’ हा संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) याने तयार केलेला उपग्रह देखील पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यात आला आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे उड्डाण घेतले गेले.

‘कलामसॅट’ हा उपग्रह चेन्नईतील विद्यार्थ्यांच्या गटाने बनवला आहे. माजी राष्ट्रपती आणि भारतीय रॉकेट शास्त्राचे जनक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव या उपग्रहाला देण्यात आले आहे. कलामसॅट इतके लहान आहे की त्याला ‘फेम्टो’ श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. मुळचा चेन्नईचा 18 वर्षीय रिफतने ‘कलामसॅट’ उपग्रह तयार केला.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ‘युवा शास्त्रज्ञ अभियान’ राबवणार आहे. भारतीय अवकाश संशोधनाकरिता शास्त्रज्ञांचा मोठा संघ तयार करण्याच्या उद्देशाने, प्रत्येक राज्यातून तीन विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यादृष्टीने थेट प्रशिक्षण दिले जाणार आहे.


वस्तू व सेवा कर तंटा न्यायाधीकरण (GSTAT) याचे राष्ट्रीय पीठ तयार करण्यास मान्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने वस्तू व सेवा कर तंटा न्यायाधीकरण (GSTAT) याचे राष्ट्रीय पीठ (National Bench of the Goods and Services Tax Appellate Tribunal) तयार करण्याची मान्यता दिली आहे.

निर्णयानुसार, वस्तू व सेवा कर तंटा न्यायाधीकरण (GSTAT) याचे राष्ट्रीय पीठ नवी दिल्लीत स्थापन करण्यात येणार. भारताचे राष्ट्रपती या पीठाचे अध्यक्ष असतील आणि त्यात एक तांत्रिक सदस्य (केंद्र) आणि एक तांत्रिक सदस्य (राज्य) यांचा समावेश असेल.

वस्तू व सेवा कर तंटा न्यायाधीकरण (GSTAT) GST कायद्यांमधील द्वितीय अपीलाचा मंच आहे तसेच केंद्र आणि राज्य यांच्यादरम्यान तंटा निवारणाचा पहिला सामान्य मंच आहे.



व्हेनेझुएलाने अमेरिकेशी आपले राजनैतिक संबंध तोडण्याची घोषणा केली
23 जानेवारी 2019 रोजी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस माडूरो यांनी अमेरिकेशी देशाचे राजनैतिक संबंध तोडण्यात येत असल्याची घोषणा केली.

मे 2018 मध्ये व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतीपदी निकोलस मदुरो यांची पुन्हा एकदा सहा वर्षांसाठी निवड झाली. मात्र त्यांची ही निवड अवैध आहे, असे देशाच्या संसदेने ठरविले. त्यानंतर विरोधी पक्षनेते जुआन ग्वेडो यांनी स्वत:ला देशाचे राष्ट्रपती घोषित केले. त्यामुळे देशात अस्थिरतेचे वातावरण तयार झाले आहे.

आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोधी पक्षनेते जुआन ग्वेडो यांना दक्षिण अमेरिकेच्या व्हेनेझुएला या देशाचे अंतरिम राष्ट्रपती म्हणून आपली मान्यता दिली. व्हेनेझुएलामधील माडूरो यांची सत्ता उलथवून लावण्याचा अमेरिकेच्या प्रयत्नामुळे अमेरिकेच्या सर्व राजनैतिक अधिकार्‍यांना देश सोडण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
Scroll to Top