पद्म पुरस्कार २०१९
पद्म पुरस्कार ‘भारतरत्न’ नंतर भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत. पद्म पुरस्कारांची सुरुवात १९५४ सालापासून करण्यात आली. पण १९७८ ते १९७९ आणि १९९३ ते १९९६ या कालखंडात यामध्ये खंड पडला. या सहा वर्षात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले नाहीत.
२०१९ साली एकूण ११२ पद्म पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले आहे. त्यापैकी ४ पद्म विभूषण, १४ पद्मभूषण तर ९४ पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदा पुरस्कार विजेत्यांमध्ये २१ महिला व १ ट्रान्सजेंडर आहेत.
पद्मविभूषण
नाव | क्षेत्र | राज्य |
---|---|---|
श्रीमती तिजन बाई | कला (संगीत-लोकसंगीत) | छत्तीसगड |
श्री इस्माईल ओमर गुएल्लाह (विदेशी) | सार्वजनिक सेवा | डीजीबौती |
श्री अनिलकुमार मणिभाई नाईक | उद्योग व व्यापार (पायाभूत) | महाराष्ट्र |
श्री बळवंत मोरेश्वर पुरंदरे | कला (अभिनय-नाट्यक्षेत्र) | महाराष्ट्र |
पद्मभूषण
नाव | क्षेत्र | राज्य |
---|---|---|
श्री जॉन चेंबर्स (विदेशी) | उद्योग व व्यापार (तंत्रज्ञान) | यूएसए |
श्री सुखदेव सिंग धिंडसा | सार्वजनिक सेवा | पंजाब |
श्री प्रवीण गोर्धन (विदेशी) | सार्वजनिक सेवा | दक्षिण आफ्रिका |
श्री महाशय धरमपाल गुलाटी | उद्योग व व्यापार (अन्न प्रक्रिया) | दिल्ली |
श्री दर्शन लाल जैन | सामाजिक सेवा | हरियाणा |
श्री अशोक लक्ष्मणराव कुकडे | वैद्यकीय (स्वस्त आरोग्यसेवा) | महाराष्ट्र |
श्री करिया मुंडा | सार्वजनिक सेवा | झारखंड |
श्री बुधादित्य मुखर्जी | कला (संगीत-सितार) | पश्चिम बंगाल |
श्री मोहनलाल विश्वनाथन नायर | कला (अभिनय-चित्रपट) | केरळ |
श्री एस नंबी नारायण | विज्ञान व अभियांत्रिकी (अवकाश) | केरळ |
श्री कुलदीप नय्यर (मरणोत्तर) | साहित्य व शिक्षण (पत्रकारिता) | दिल्ली |
श्रीमती बचेंद्री पाल | क्रीडा (गिर्यारोहण) | उत्तराखंड |
श्री व्ही के शुंगलू | नागरी सेवा | दिल्ली |
श्री हुकूमदेव नारायण यादव | सार्वजनिक सेवा | बिहार |
पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणीत पद्म पुरस्कार विभागलेला आहे. पद्म पुरस्कार कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक जीवन, विज्ञान व तंत्रज्ञान, उद्योग व व्यापार, वैद्यकीय सेवा, साहित्य व शिक्षण, नागरी सेवा, क्रीडा या प्रमुख ९ व इतर काही क्षेत्रातून निवडक लोकांना प्रदान केले जातात.
प्रत्येक राज्यातील सरकार, केंद्रीय मंत्री, पूर्वी भारतरत्न व पद्म पुरस्कार प्राप्त झालेल्या व्यक्ती, राज्यांचे मुख्यमत्री व राज्यपाल इत्यादी व्यक्ती पद्म पुरस्कारासाठी समितीकडे कोणत्याही व्यक्तीची शिफारस करू शकतात. पद्म पुरस्कार समिती दरवर्षी पंतप्रधानाकडून ठरविली जाते. सामान्य नागरिकालाही ऑनलाईन पद्धतीने शिफारस करण्याचा अधिकार देण्यात आला होता.
प्रत्येक वर्षी १ मे ते १५ सप्टेंबर दरम्यान या शिफारसी स्वीकारल्या जातात. ‘पद्मपुरस्कार समिती’ नंतर या नावातून काही जणांची शिफारस पंतप्रधान व राष्ट्रपतींकडे करते. एका वर्षात पद्म पुरस्कार प्रदान केल्या जाणाऱ्या व्यक्तींची संख्या १२० पेक्षा जास्त असू नये. (विदेशी नागरिक व मरणोत्तर पुरस्कार वगळता).
प्रत्येक विजेत्याला एक पदकाची प्रतिकृती दिली जाते. विजेते ती प्रतिकृती कोणत्याही समारोहात किंवा शासकीय समारंभात परिधान करू शकतात. पण या पुरस्काराचा वापर विजेत्याला कोठेही म्हणजेच लेटरहेड, इन्विटेशन कार्ड, पोस्टर पुस्तके यावर करता येत नाही. पदकाचा कोणत्याही पद्धतीने गैरवापर केल्यास पुरस्कार जप्त करण्यात येऊ शकतो.
२०१८ साली एकूण ८५ व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले होते. त्यापैकी ०३ व्यक्तीना पद्म विभूषण, ०९ व्यक्तींना पद्मभूषण तर ७५ व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.त्यावेळी पुरस्कार विजेत्यांमध्ये १४ महिला होत्या.