नैसर्गिक भाषा व भाषांतरं विषयक राष्ट्रीय मोहीम
- इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार
- ३ वर्षांसाठी ४५० कोटी रुपयांचा प्रस्ताव
- पंतप्रधान विज्ञान व तंत्रज्ञान अभिनवता सल्लागार परिषद (PM-STIC) यांकडून मान्यता
- उद्दिष्ट : लोकांना इंग्रजी तसेच स्थानिक भाषांमध्ये शैक्षणिक व संशोधन सामग्री उपलब्ध व्हावी व त्यांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राबाबत माहिती मिळावी
- मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग यांच्याबरोबरीने माहिती तंत्रज्ञान मंत्रालय ही मोहीम राबविणार आहे
RBI चा नवीन नियम
- यानुसार RTGS व NEFT या ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर यंत्रणेवर १ जुलै पासून कोणतेही शुल्क आकारणार नाही
- RTGS – Real Time Gross Settlement System
- NEFT – National Electronic Fund Transfer
रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची रशियासोबत २०० कोटींचा करार
- एमआय-३५ या लढाऊ हेलीकॉप्टरसाठी रशियाकडून ही रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे (स्ट्रम अटाका) खरेदी करणार.
- आपत्कालीन अधिकार नियमांतर्गत खरेदी
- यासोबतच रशियाकडडून इंगला-एस एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी करणार
विश्वचषकात एका सामन्यात पाच बळी घेणारा शमी सहावा गोलंदाज
- यापूर्वी आशिष नेहरा, व्यंकटेश प्रसाद, युवराज सिंग, कपिल देव, रॉबिन सिंग यांनी हा पराक्रम केला.
UGC ने STRIDE उपक्रम मंजूर केला
- विद्यापीठ अनुदान आयोगाने STRIDE (Scheme for Trans Disciplinary Research for India’s Developing Economy) उपक्रम मंजूर केला.
- उद्दिष्ट : भारताच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी भारतात संशोधनात्मक वृत्ती रुजविणे
नागालँडमध्ये राज्याच्या स्थानिक रहिवाशांची नोंद होणार
- आसाममध्ये NRC नंतर आता नागालँडने RIIN (Register for Indigenous Inhabitants of Nagaland) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
- १० जुलै २०१९ पासून नोंदणी
- ६० दिवसांची मुदत
- राज्यात आणीबाणी घोषित व केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे नागालँड अस्थिर राज्य घोषित
- इनर लाईन परमिट (ILP) च्या रूपात अंमलबजावणी
- ब्रिटिशांची ILP प्रक्रिया ‘बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन्स-१८७३’ अंतर्गत सादर व १८७३ सालीच लागू केली होती.
- सध्या ही प्रक्रिया अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि नागालँडमध्ये कार्यरत
अमेरिकेकडून भारताला नाटो देशांच्यासमान दर्जा
- यामुळे आता संरक्षण क्षेत्रनिगडित व्यवहारामध्ये अमेरिका भारताबरोबर इस्रायल व दक्षिण कोरियाप्रमाणे व्यवहार करेल
- सिनेटर जॉन कॉर्निन व मार्क वोनर यांनी अमेरिकेत संसदेत हे विधेयक सादर केले होते.
साकिब अल हसनचा विश्वविक्रम
- साकिब अल हसन क्रिकेट विश्वचषकात ५०० धावा आणि १० बळी घेणारा पहिला व सध्याचा एकमेव खेळाडू
- यासोबतच त्याने विश्वचषकात एकाच सामन्यात शतक व ५ बळी घेण्याची कामगिरी केली. युवराजसिंगनंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू
सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आता प्रादेशिक भाषेतही
- न्यायालय एका सॉफ्टवेयरचे अनावरण करत असून जे गुगल भाषांतरण एप प्रमाणे असेल
- याद्वारे SC चे निकाल देशभरातील मराठीसह ७ प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतरित केले जाणार आहे. [हिंदी, तमिळ, कन्नड, तेलुगू, बंगाली, आसामी, मराठी]
- पहिल्या दिवशी ११३ निकाल भाषांतरित. त्यातील १४ मराठीत.
पश्चिम बंगाल राज्याचे नाव बदलण्यास केंद्राचा नकार
- २९ ऑगस्ट २०१६ रोजी पश्चिम बंगाल विधानसभेत राज्याचे नाव बदलण्याचा निर्णय [बंगालमध्ये बांग्ला, इंग्रजीत बेंगाल, हिंदीत बंगाल]
- त्यावेळी काँग्रेस व भाजपच्या विरोधामुळे नाकारले
- त्यानंतर २६ जुलै २०१८ रोजी पश्चिम बंगाल विधानसभेत राज्याचे नाव ‘बांग्ला’ करण्याचा प्रस्ताव मंजूर
- मात्र यावेळी देखील तो नाकारण्यात आला
दिल्ली व विजयवाडा येथे UIDAI चे पाहिले आधार सेवा केंद्र (ASK) उघडले
- डिसेंबर २०१९ पर्यंत असे ११४ केंद्र उभारणीचे लक्ष्य
- पासपोर्ट सेवा केंद्रासारखी संकल्पना
पवन ऊर्जेबाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकाचा देश
- ब्लूमबर्ग एनइएफ व पॉवर टेक्नॉलॉजी या संस्थांकडून अहवाल प्रकाशित
- चीन (२२१ GW), अमेरिका (९६.४ GW), जर्मनी (५९.३ GW) यानंतर भारताचा (३५ GW) क्रमांक
- जगात सर्वात मोठे किनारपट्टीलगतचे पवनऊर्जा प्रकल्प
- चीन ७९६५ MW प्रकल्प. सर्वात लोकप्रिय प्रकल्प
- अल्ट्रा विंड सेंटर – कॅलिफोर्निया (अमेरिका) १५४८ MW
- मुपाण्डल – तामिळनाडू (भारत) १५०० MW
- जैसलमेर – राजस्थान (भारत) १०६४ MW
विभागीय ग्रामीण बँकेच्या परीक्षा आता प्रादेशिक भाषांमध्ये देखील
- यापूर्वी केवळ हिंदी व इंग्रजी भाषेत
- आता मराठीसह इतर १३ प्रादेशिक भाषेत घेतल्या जाणार [मराठी, उर्दू, तेलुगू, तमिळ, पंजाबी, ओडिया मणिपुरी, मल्याळम, कोंकणी, कन्नड, गुजराती, बंगाली, असामी]
शोएब मलिकची निवृत्ती
- पाकिस्तानच्या शोएब मलिकने ५ जुलै २०१९ रोजी आपल्या २० वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली
- त्याने २८७ एकदिवसीय सामन्यात ७५३४ धावा व १५८ बळी घेतले. त्यात ९ शतके व ४४ अर्धशतकांचा समावेश
२० रुपयांचे नाणेदेखील चलनात येणार
- पंतप्रधानांच्या हस्ते ७ मार्च २०१९ रोजी या नाण्याचे अनावरण
संरक्षण खात्याच्या तरतुदीत ८ टक्के वाढ
- मागील वर्षीच्या २.९७ लाख कोटीवरून यावर्षी ३.१८ लाख कोटी रुपये इतकी तरतूद
- या व्यतिरिक्त निवृत्तीवेतनासाठी १.१२ लाख कोटी रुपये स्वतंत्र राखीव
- निवृत्ती वेतन धरून संरक्षण खात्याची एकूण तरतूद ४.३१ लाख कोटी रुपये. २०१९-२० च्या भांडवली खर्चाच्या तुलनेत १५.४७%
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतक विक्रम शाकिब अल हसनच्या नावे
- यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. [२००३ साली दक्षिण आफ्रिकेत ११ डावांत ७ अर्धशतक]
- २०१९ साली शाकिबचे ८ डावात ७ अर्धशतक
कर विवादांच्या निवारणासाठी अभय योजना
- विविध १७ प्रकारचे कर १ जुलै २०१७ पासून GST मध्ये समाविष्ट
- मात्र GST पूर्वी या करांबाबत न्यायालयात ३.७५ लाख कोटी रुपयांचा विवाद सुरु होता.
- हा महसूल तंटामुक्त करण्यासाठी अर्थसंकल्पात सरकारने ‘सबका विश्वास लीगसी डिस्प्युट रिजॉल्युशन स्कीम २०१९’ या नावाने ‘अभय योजना‘ प्रस्तावित केली.
- यात करदात्याने स्वेच्छेने थकीत कराची घोषणा केल्यास करात ४० ते ७०% सवलत अभय योजनेमार्फ़त देण्यात येणार आहे.
जयपूर शहराला युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा
- ६ जुलैला अझरबैजानमधील बेकू येथे UNESCO च्या जागतिक वारसा स्थळसंबंधीच्या ४३ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
- ‘शहर नियोजन आणि स्थापत्याचा सुरेख संगम आणि कल्पनांच्या आदान प्रदानातून मध्ययुगाच्या अखेरीचे अनुकरणीय उदाहरण‘ म्हणून जयपूर बाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता
- सवाई जयसिंह दुसरे यांनी १७२७ साली जयपूर शहराची स्थापना केली होती
- जागतिक वारसा स्थळाबाबत माहिती वाचण्यासाठी क्लिक करा
- UNESCO बाबत माहिती वाचण्यासाठी क्लिक करा
जसप्रीत बुमराह एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान १०० बळी टिपणारा दुसरा गोलंदाज
- त्याने ५७ सामन्यात हा विक्रम केला
- अफगाणिस्तानचा रशीद खान ४४ सामन्यात १०० बळी टिपून पहिल्या क्रमांकावर आहे