संगीत नाटक अकादमी – Sangeet Natak Akademi

संगीत नाटक अकादमी – Sangeet Natak Academy

संगीत नाटक अकादमी

संगीत नाटक अकादमी ही भारत सरकारने दिल्लीमध्ये स्थापन केलेली एक राष्ट्रीय स्तरावरील संगीत व नाट्य कलेची ॲकॅडमी आहे. या संस्थेची स्थापना ३१ मे १९५२ रोजी झाली. डॉ.पी.व्ही. राजमन्नार याचे पहिले अध्यक्ष होते. 
याद्वारे दिली जाणारी फेलोशिप व पुरस्कार अत्यंत प्रतिष्टीत मानले जातात.
संगीत, नृत्य आणि नाटक यांच्या माध्यमातून भारताच्या विशाल सांस्कृतिक वारसाचे जतन करणे हे या अकादमीचे प्रमुख कार्य आहे.
संगीत नाटक अकादमीद्वारे भारतातले ८ नृत्यप्रकारांना शास्त्रीय नृत्याचा दर्जा देण्यात आला आहे.
  1. भरतनाट्यम (तामिळनाडू)
  2. ओडिसी (ओडिशा)
  3. कुचिपुडी (आंध्र प्रदेश)
  4. मोहिनीअट्टम (केरळ)
  5. सत्त्रीया (आसाम)
  6. कथकली (केरळ)
  7. कथक (उत्तर भारत)
  8. मणिपुरी (मणिपूर)
अकादमीद्वारे दिले जाणारे पुरस्कारसंगीत नाटक अकादमी पुरस्कार हा पुरस्कार संगीत नाटक अकादमी या कलाक्षेत्रातील सरकारी संस्थेतर्फे देण्यात येणारा पुरस्कार आहे. विविध कलाक्षेत्रातील कलावंतांना देण्यात येणारा हा एक सर्वोच्च भारतीय सन्मान आहे.

या पुरस्काराचे स्वरूप १,००,००० रुपये रोख, एक मानपत्र, एक शाल व एक ताम्रपत्र असे आहे. संगीत,नृत्य अभिनय इतर पारंपरिक समूह नृत्य, आदिवासी नृत्य, संगीत, अभिनय व कठपुतळी यांतील योगदानांबद्दल हे पुरस्कार आहेत.

दरवर्षी ३३ जणांना हा पुरस्कार दिला जातो. आजपर्यंत १००० हुन अधिक जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
संगीत नाटक अकादमी फेलोशिप, रत्न सदस्यदरवर्षी अकादमी कला, संगीत, नृत्य आणि नाटक क्षेत्रात योगदानासाठी संगीत नाटक अकादमी फेलोशिप प्रदान करते.
प्रत्येकी ३ लक्ष रुपये व ताम्रपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सर्वप्रथम १९५४ साली फेलोशिप प्रदान करण्यात आली होती. आजपर्यंत १४४ प्रतिष्टीत व्यक्तींना फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे.

उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार

उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २००६ साली या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. ४० वर्षाखालील युवा कलाकारांना संगीत, नृत्य आणि नाटक क्षेत्रात प्रतिभेसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

टागोर रत्न व टागोर पुरस्कार

२०१२ साली रवींद्रनाथ टागोर यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. २५ एप्रिल २०१२ रोजी कोलकाता येथे संगीत नाटक अकादमी टागोर सम्मान आणि २५ मे २०१२ रोजी चेन्नई येथे संगीत नाटक अकादमी टागोर सम्मान या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

 

Scroll to Top