चालू घडामोडी २९ जुलै ते ४ ऑगस्ट २०१९

चालू घडामोडी २९ जुलै ते ४ ऑगस्ट २०१९

एसटीना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम बसविणार

  • महाराष्ट्रात पहिल्यांदा एसटी नगर-पुणे मार्गावर धावली. ७० वर्षात संपूर्ण महाराष्ट्र त्याचा विस्तार झाला.
  • सर्वप्रथम नाशिकमध्ये सिस्टम बसविणार
  • सर्व जिल्ह्यात रूट मॅपिंगचे कार्य सुरु

जयपाल रेड्डी यांचे निधन

  • १६ जानेवारी १९४२ रोजी तेलंगणातील मेहबूबनगर जिल्ह्यातील मुदगल येथे जन्म
  • १९६९ ते १९८४ आंध्र विधानसभा सदस्य
  • १९९८ मध्ये उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
  • १९९८ इंद्रकुमार गुजराल सरकारमध्ये सूचना व प्रसारण मंत्री
  • २००४ मनमोहनसिंग सरकारमध्ये पेट्रोलियम मंत्री, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री, शहरी विकास मंत्री
  • कृषी व औद्योगिक क्षेत्रावर “दहा विचारधारा: कृषी आणि औद्योगिकता यांच्यातील एक महान विषमता” हे पुस्तक

व्याघ्र गणना २०१८

  • जागतिक व्याघ्र दिन : २९ जुलै
  • देशातील वाघांची संख्या : २९६७
  • तामिळनाडूतील ‘सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प’ सर्वोत्कृष्ट
  • जगातील ३/४ वाघ भारतात
  • २००६ साली देशात १४११ वाघ, २०१० मध्ये १७०६, २०१४ मध्ये २२२६ तर २०१८ मध्ये २९६७ वाघ आहेत
  • सर्वात जास्त वाघ अनुक्रमे मध्य प्रदेश (५२६), कर्नाटक (५२४), उत्तराखंड (४४२) राज्यात आहेत
  • व्याघ्र संरक्षण प्रकल्पांची संख्या २०१४ च्या ६९३ वरून २०१८ साली ८६० झाली आहे. तर कम्युनिटी रिजर्व संख्या ४३ वरून १०० झाली आहे.
  • महाराष्ट्रात २०१८ साली ३१२ वाघ आहेत. २००६ मध्ये १०३, २०१० मध्ये १६९ तर २०१४ साली १९० वाघ होते.
  • ताडोबा प्रकल्पात ८६ ते ९० वाघ आहेत.
  • देशातील १८ राज्यात व्याघ्र गणना झाली
  • डेहराडूनच्या भारतीय वन्य जीव संस्थेने विकसित केलेल्या ट्रान्झिट मेथडने ही गणना करण्यात आली.
  • व्याघ्र गणनेविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा

प्रिया जैन यांना ब्रिटनचा ‘इंडियन वूमन ऑफ इन्फ्लुएन्स’ पुरस्कार

  • ब्रिटन संसद हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे पुरस्कार

भारत रशियाकडून ‘आर-२७’ क्षेपणास्त्रांची खरेदी करणार

  • १५०० कोटी रुपयांचा करार
  • क्षेपणास्त्राचे वजन : २५३ किलो
  • पल्ला : २५ किमी उंच व ६० किमी लांब
  • ही क्षेपणास्त्रे एसयु-३० एमकेआय विमानात बसविणार

तिहेरी तलाक कायदा मंजूर

  • २५ जुलै २०१९ रोजी लोकसभेत ३०३ विरुद्ध ८२ मतांनी पारित
  • ३० जुलै २०१९ रोजी राज्यसभेत ९९ विरुद्ध ८४ मतांनी पारित
  • १ ऑगस्ट २०१९ रोजी कायद्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी
  • १९ सप्टेंबर २०१८ पासून कायदा लागू
  • तिहेरी तलाकबद्दल वाचण्यासाठी क्लिक करा
  • अतनु चक्रवर्ती RBI च्या संचालक मंडळावर
  • सुभाष चंद्र गर्ग यांच्या जागेवर नियुक्ती
  • ते पूर्वी अर्थ मंत्रालयात आर्थिक व्यवहार विभागात सचिव होते
  • सुभाष चंद्र गर्ग यांची वीज मंत्रालयात नियुक्ती

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लघु वित्त बँकेच्या स्वरूपात रूपांतरित केली जाणार

  • ग्राहकांना छोट्या स्वरूपाचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा हेतू

नासाच्या उपग्रहाकडून तीन बाह्यग्रहांचा शोध

  • पृथ्वीपासून ७३ प्रकाशवर्षे दूर
  • टेस ऑब्जेक्ट ऑफ इंटरेस्ट (टी.ओ.आय. २७०) या तारकाप्रणाली भोवती हे ग्रह फिरत आहेत

RBI ने बँक ऑफ चायना या परदेशी बँकेला भारतात नियमित बँकिंग सेवा देण्याची परवानगी दिली

  • ही बँक ‘भारतीय रिजर्व बँक कायदा – १९३४’ याच्या द्वितीय अनुसूचित समाविष्ट
  • सर्व व्यावसायिक बँका द्वितीय अनुसूचित समाविष्ट
  • यात समाविष्ट बँकांना RBI च्या निकषांचे पालन करावे लागते

NDTV चे पत्रकार रवीश कुमार यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार

दिल्लीत २०० युनिटपर्यंत मोफत वीज

  • दिल्ली सरकारचा निर्णय
  • २०१ ते ४०० युनिट वीज वापरावर ५० टक्के अनुदान

२०१८ साली जागतिक अर्थव्यवस्थेत भारताची सातव्या स्थानी घसरण

  • जागतिक बँकेचा अहवाल “Global GDP Ranking for 2018”
  • भारतीय अर्थव्यवस्थेचे मूल्य २.७३ लक्ष कोटी डॉलर.
  • यापूर्वी पाचवे स्थान
    1. अमेरिका (२०.५ लक्ष कोटी डॉलर)
    2. चीन (१३.६ लक्ष कोटी डॉलर)
    3. जपान (४.९ लक्ष कोटी डॉलर)
    4. जर्मनी (३.९ लक्ष कोटी डॉलर)
    5. युनायटेड किंग्डम (२.८२ लक्ष कोटी डॉलर)
    6. फ्रांस (२.७७ लक्ष कोटी डॉलर)
    7. भारत (२.७३ लक्ष कोटी डॉलर)

भारतीय अंतराळवीरांना व्योमनॉट्स म्हणून ओळखले जाणार

  • इसरो २०२२ पर्यंत अंतराळवीर अवकाशात पाठविणार
  • या मोहिमेला ‘गगनयान’ असे नाव
  • अमेरिकेत अंतराळवीरांना ‘ऍस्ट्रोनॉट’ म्हणतात, रशियात ‘कॉस्मोनॉट’, चीनमध्ये ‘ताईकोनॉट’ असे म्हणतात.
Scroll to Top