ICC विश्वचषक २०१९ स्पर्धा
- विजेता – इंग्लड [प्रथमच विजेता]
- उपविजेता – न्यूझीलँड [सलग दुसऱ्यांदा उपविजेता]
- अंतिम सामना सामनावीर – बेन स्टोक्स [इंग्लंड]
- मालिकावीर – केन विल्यमसन [न्यूझीलँड]
- स्पर्धेचे ठिकाण इंग्लंड आणि वेल्स [अंतिम सामना : लॉर्ड्स मैदान]
- आयसीसी व विश्वचषकाविषयी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन राज्यपाल २० जुलै २०१९
- हिमाचल प्रदेश – कलराज मिश्र
- गुजरात – आचार्य देवव्रत [पूर्वी हिमाचलचे राज्यपाल]
- उत्तर प्रदेश – आनंदीबेन पटेल
- पश्चिम बंगाल – जगदीप धनखर
- मध्य प्रदेश – लालजी टंडन
- बिहार – फगू चौहान
- त्रिपुरा – रमेश बाईंस
- नागालँड – आर.एन. रवी
इंडियाज १०० लिडिंग ब्रँड्स २०१९
- इंग्लंडच्या ब्रँड फायनान्स या सल्लागार संस्थेची यादी
- टाटा ग्रुप १९.९५ अब्ज डॉलर
- एलआयसी ७.२ अब्ज डॉलर
- इन्फोसिस ६.५ अब्ज डॉलर
- एसबीआय
- महिंद्रा
- एचडीएफसी
- एअरटेल
- एचसीएल
- रिलायन्स
- विप्रो
संगीत नाटक अकादमी फेलोशिप
- ४ विजेते
- स्वरूप : प्रत्येकी ३ लक्ष रुपये व ताम्रपत्र
- तबलावादक जाकीर हुसेन,
- नृत्यांगना सोनल मानसिंग,
- नर्तक व नृत्यदिग्दर्शक जतीन गोस्वामी
- भरतनाट्यम नर्तक व शिक्षक के.कल्याणसुंदरम पिल्लई
अर्जुन पुरस्कार
- टेनिसपटू रोहन बोपण्णा व महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना यांना प्रदान
- क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
- अर्जुन पुरस्काराविषयी वाचण्यासाठी क्लिक करा
PATA Gold International Award 2019
- PATAR : Pacific Asia Travel Association
- विजेता : भारत सरकार पर्यटन मंत्रालयाचे “फाईंड द इनक्रेडिबल यु” अभियान
- मार्केटिंग – प्रायमरी गव्हर्नमेंट डेस्टिनेशन श्रेणीच्या अंतर्गत पुरस्कार
सागर मैत्री अभियान २
- १८ जुलै २०१९ रोजी कोची येथे दक्षिण नौदल आदेश (SNC) अंतर्गत असलेल्या साऊथ जेटी तळावर दोन महिने चालणाऱ्या ‘सागर मैत्री अभियान-२’ या कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला
- यात INS सागरध्वनी या जहाजाने भाग घेतला
- INS सागरध्वनी DRDO ने तयार केलेले सागरी संशोधन कामात उपयोगी जहाज आहे
- सहभाग : ओमान, मालदीव, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, म्यानमार
नीती आयोग आकांक्षित जिल्हा (Aspirational District) कार्यक्रम क्रमवारी जाहीर
- ५ जून २०१८ रोजी कार्यक्रम सुरु.
- यात १०० जिल्ह्यांचा समावेश
- आरोग्य व पोषण, शिक्षण, शेती आणि जलस्रोत, आर्थिक समावेशकता, कौशल्य विकास, पायाभूत सुविधा या ६ क्षेत्रातील प्रगती मोजली जाते
- क्रमवारी
- कोंडगाव (छत्तीसगड)
- फतेहपूर (उत्तर प्रदेश)
- पाकूर (झारखंड)
- धुलापूर (राजस्थान)
- चित्रकूट (उत्तर प्रदेश)
प्रितु गुप्ता भारताचा ६४ वा ग्रँडमास्टर
- पोर्तुगाल लीग २०१९ बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरीत लेव्ह यांकेलेवीच याला पराभूत करून दिल्लीचा प्रीत गुप्ता ग्रँड मास्टर बनला
- वयाच्या १५ वर्षे, ४ महिने, १० व्या दिवशी कामगिरी
- भारताचा पहिला ग्रँडमास्टर : विश्वनाथन आनंद
- भारताचा सर्वात तरुण ग्रँडमास्टर : डी गुकेश [१२ वर्षे ७ महिने १७ दिवस]
नाग क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
- भारतीय सेनेने पोखरण फायरिंग रेंजवर स्वदेशी तिसऱ्या पिढीतील अँटी टॅंक गायडेड मिसाईल ‘नागचे यशस्वी परीक्षण केले
- भारत डायनॅमिक्स लिमिटेड ही सरकारी कंपनी या क्षेपणास्त्राची निर्मिती करणार आहे
- भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाविषयी वाचण्यासाठी क्लिक करा
राष्ट्रकुल टेबल टेनिस महासंघ (CTTF) पदाधिकारी
- चेयरमन : विवेक कोहली
- महासचिव : ए.पी.सिंग
- प्रेसिडेंट: दुष्यन्त चौटाला
- २० जुलै रोजी भुवनेश्वर येथे हीनिवडणूक झाली
- राष्ट्रकुलविषयी वाचण्यासाठी क्लिक करा
हिमा दासचे ५ सुवर्ण
- मेटूजी ग्रा.प्रि. ऍथलेटिक्स स्पर्धेत हिमाने ४००मी. धावण्याच्या शर्यतीत ५२.०९ सेकंड वेळेत सुवर्ण पटकाविले. याच स्पर्धेत व्ही.के.विस्मया (५२.४८) हिने रौप्य, सरिताबेन गायकवाड (५३.४८) हिने कांस्यपदक पटकाविले
- हिमा दासने याआधी ४ सुवर्ण २०० मी. स्पर्धेत पटकाविले
- २०० मी. पुरुषात मोहम्मद अनस (२०.९५ सेकंड) याने रौप्य पटकाविले
‘चांद्रयान-२’ मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण
- ISRO ने २३ जुलै २०१९ रोजी GSLV-MK3 या अग्निबाणाच्या साहाय्याने चांद्रयान-२ पाठविले
- चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचण्यासाठी ४८ दिवस लागणार
- चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत एकमेव देश
- चंद्रावर जाणारे देश : भारत, युएसए, रशिया, चीन
- चांद्रयान १ मोहिमेबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा
- चांद्रयान २ मोहिमेबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मुकुंद नरवणे लष्कराचे नवीन उपप्रमुख
- यापदी नियुक्त झालेले पहिले मराठी अधिकारी
- नरवणे जून १९८० मध्ये लष्कराच्या ७ व्या शीख बटालियनमध्ये रुजु