जागतिक व्यापार संघटना
वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन –WTOस्थापना – १ जानेवारी १९९५ मुख्यालय – जिनिव्हा (स्वित्झर्लंड)
WTO ची सध्या सदस्य संख्या १५३ आहे. टोंगा हा देश १५१ वा सदस्य युक्रेन १५२, व केप वर्दे १५३ वा सदस्य देश ठरला.
उद्देश
१. जागतिक व्यापार अधिकाधिक खुला व मार्गदर्शक करणे.
२. सदस्य राष्ट्रामधील लोकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे.
३. पूर्ण रोजगाराने परिणामकारक मागणीमध्ये वाढ घडवून आणणे.
दर २ वर्षांनी भरणारी मंत्री परिषद व वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सर्वोच्च अंग आहे.
मंत्री परिषदा
१) सिंगापूर – ९ ते १३ डिसेंबर १९९६
२) जिनेव्हा – १८ ते २० मे १९९८
३) सिएटल – ३० नोव्हे ते ३ डिसे १९९९ (एनजीओच्या निदर्शनामुळे अयशस्वी)
४) दोहा (कतार ) – ९ ते १४ नोव्हे २००१ ( व्यापाराशी संबंधित वाटाघाटीवर मतभेद)
५) कॅनकुन (मॅक्सिको) – सप्टेंबर २००३ (अयशस्वी)
६) हाँगकाँग – डिसेंबर २००५
७) जिनेव्हा – २००९
WTO हा GATT खालीलबाबतीत वेगळा आहे.
WTO ची व्याप्ती भौगोलिक दृष्ट्या विस्तृत आहे. यात सध्या १५३ देशांचा समावेश होतो.
WTO मध्ये शेतमाल, सेवा, पेटेंट हक्क इ. चा समावेश आहे तर GATT मध्ये प्रामुख्याने आयात निर्यातीचा संबंध होता.
WTO संपुर्ण जागतिक स्वरुपाची संघटना आहे तर GATT हा परस्पर संमत करार होता.
WTO च्या तरतुदी व अटी सर्व सभासदांना बंधनकारक आहे तर GATT हा करारअसल्याने त्याच्या अटींची पुर्तता करणे केवळ सभासदापुरतेच मर्यादीत आहे.
WTO हे कायद्याने स्थापन झाल्याने त्यांच्याकडे अधिक अधिकार आहे तर GATT हा करार असल्याने अधिकारावर मर्यादा होत्या.