तेलुगू भाषा दिन 29 ऑगस्ट
भारतात दरवर्षी 29 ऑगस्ट या दिवशी ‘तेलुगू भाषा दिन’ साजरा केला जातो.
प्रसिद्ध तेलुगू लेखक गिडीगु वेंकट राममूर्ती यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. राममूर्ती यांचा जन्म 29 ऑगस्ट 1963 रोजी झाला होता आणि ते ब्रिटीश भारतातल्या नामांकित भाषातज्ञांपैकी एक होते.
राष्ट्रीय क्रिडा दिन 29 ऑगस्ट
29 ऑगस्ट हा दिवस ख्यातनाम हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतीत ‘राष्ट्रीय क्रिडा दिन’ म्हणून देशभरात साजरा केला जातो.
क्रिडा दिनानिमित्त, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय क्रिडा आणि साहस पुरस्कार 2020’ यांचे आभासी पद्धतीने वाटप करण्यात आले.
चार वर्षे क्रिडा क्षेत्रातल्या नेत्रदीपक आणि सर्वाधिक उत्कृष्ट कामगिरीबद्दल राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार दिला जातो.
चार वर्षे सातत्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला अर्जुन पुरस्कार दिला जातो.
प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय क्रिडा स्पर्धांमध्ये पदक विजेते खेळाडू तयार करणाऱ्या प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो.
क्रिडा विकासासाठी आजीवन योगदानासाठी ध्यानचंद पुरस्कार आणि राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार व्यवसायिक संस्थाना (खासगी आणि सार्वजनिक क्षेत्र अशा दोन्ही) आणि क्रिडा प्रोत्साहन व विकासाच्या क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय भूमिका बजावली आहे अशांना दिला जातो.
आंतर-विद्यापीठ स्पर्धेत एकूणच सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद करंडक दिला जातो.
साहसी क्रिडा प्रकारात टेनझिंग नॉरगे राष्ट्रीय साहसी पुरस्कार दिला जातो.
मारिएक लुकास रिसनेवेल्ड यांनी ‘आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2020’ जिंकला
2020 वर्षासाठीचा ‘आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक’ नेदरलॅंडच्या लेखिका आलेल्या 29 वर्षीय मारिएक लुकास रिसनेवेल्ड यांना दिला जाण्याचे जाहीर झाले आहे. बुकर पारितोषिक मिळवणाऱ्या त्या सर्वात कमी वयाच्या लेखक ठरल्या आहेत.
नेदरलॅंडमधल्या ग्रामीण भागातल्या एका धार्मिक शेतकरी कुंटुबाच्या कहाणीवर आधारित “द डिसकंफर्ट ऑफ ईवनिंग’ या पुस्तकासाठी त्यांना हा पारितोषिक दिला गेला आहे. पारितोषिकाची 50 हजार पौंड रक्कम लेखिका आणि अनुवादक मिशेल हचिंसन यांच्यात विभागून दिली जाणार आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) संस्थेचे 7 नवीन क्षेत्र
भारत सरकारच्या संस्कृति मंत्रालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) या संस्थेच्या 7 नवीन क्षेत्रांची नावे जाहीर केली. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
त्रिची (तामिळनाडू), रायगंज (पश्चिम बंगाल), राजकोट (गुजरात), जबलपूर (मध्यप्रदेश), झांसी (उत्तरप्रदेश), मेरठ (उत्तरप्रदेश), हम्पी शहर (कर्नाटक).
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ही एक भारतीय सरकारी संस्था आहे जी संस्कृति मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. पुरातत्व संशोधनात्मक कार्य तसेच देशातल्या सांस्कृतिक स्मारकांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी ही संस्था जबाबदार आहे.
त्याची स्थापना 1861 साली अलेक्झांडर कनिंघम या ब्रिटिश अधिकाऱ्याने केली होती. संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली या शहरात आहे.
आफ्रिका पोलिओमुक्त झाला
आफ्रिका खंड पोलिओमु्क्त झाला असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेकडून 25 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आली.
खंडात नायजेरिया हा शेवटचा देशही पोलिओमु्क्त जाहीर करण्यात आला.
जगात आता फक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये पोलिओ आढळला जात आहे.
भारताला 2011 साली पोलिओमुक्त देश जाहीर करण्यात आले होते.
जागतिक आरोग्य संघटना (WHO), संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) आणि रोटरी इंटरनॅशनल या संस्था जगभरात पोलिओ निर्मूलन कार्यक्रम राबवितात.
‘राष्ट्रीय तृतीयपंथी परिषद’ची स्थापना
भारत सरकारने ‘राष्ट्रीय तृतीयपंथी परिषद’ (National Council for Transgender Persons) याची स्थापना 21 ऑगस्ट 2020 रोजी केली आणि त्यासाठी एक अध्यादेश लागू करण्यात आला आहे.
परिषदेची स्थापना ‘तृतीयपंथी (अधिकारांचे रक्षण) अधिनियम-2019’ या कायद्याच्या ‘कलम 16’ अन्वये झाली आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय व सबळीकरण मंत्री परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असणार.
केंद्रीय सामाजिक न्याय व सबळीकरण राज्यमंत्री परिषदेचे पदसिद्ध उपाध्यक्ष असणार.
परिषदेत इतर सदस्यांमध्ये विविध मंत्रालये/विभागांचे प्रतिनिधी, तृतीयपंथी समुदायाचे पाच प्रतिनिधी, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग (NHRC) आणि राष्ट्रीय महिला आयोग (NCW) याचे प्रतिनिधी, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असणार.
पदसिद्ध सदस्यांव्यतिरिक्त राष्ट्रीय परिषदेचे सदस्य नामनिर्देशित झाल्यापासून तीन वर्षांच्या मुदतीसाठी पदावर राहू शकतात.
परिषदेची कार्ये
तृतीयपंथीयांसाठी धोरण, कार्यक्रम, कायदे आणि प्रकल्प तयार करण्याबाबत केंद्र सरकारला सल्ला देणे.
समानतेसाठी आणि तृतीयपंथीयांच्या पूर्ण सहभागासाठी तयार केलेल्या धोरणांचे आणि कार्यक्रमांच्या प्रभावाचे परीक्षण आणि मूल्यांकन करणे.
तृतीयपंथीयांशी संबंधित असलेल्या सर्व सरकारी व गैरसरकारी संस्थांच्या सर्व विभागांच्या कामकाजाचे पुनरावलोकन करणे आणि समन्वय साधणे.
तृतीयपंथीयांच्या तक्रारींचे निवारण करणे.
केंद्र सरकारने तृतीयपंथीयांच्या हितार्थ नेमून दिलेली इतर कार्ये पार पाडणे.
गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटी भागाला जोडणाऱ्या सर्वाधिक लांबीच्या रोपवे सेवेचे उद्घाटन
आसाम राज्यात ब्रम्हपुत्र नदीच्या पात्राला पार करणाऱ्या देशातल्या सर्वाधिक लांबीच्या रोपवे सेवेचे उद्घाटन करण्यात आली आहे.
ती सेवा गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटी या दोन भागांना जोडते.
तो 1.8 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे.
ती सेवा गुवाहाटीचे कचरी घाट आणि उत्तर गुवाहाटीचे डोल गोविंदा मंदिर या ठिकाणांदरम्यान कार्यरत आहे.
इस्रायलकडून आणखी दोन ‘फाल्कन’ (एवॅक्स) विकत घेण्याचा निर्णय
चीन आणि पाकिस्तानपासून वाढता धोका लक्षात घेऊन भारताने अखेर इस्रायलकडून आणखी दोन ‘फाल्कन’ एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम (एवॅक्स) विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
एवॅक्स सिस्टिमला आकाशातील भारताचे नेत्र म्हटले जाते.
ही इस्रायली एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम रशियन बनावटीच्या इल्यूसीन-76 विमानावर बसवण्यात येणार आहे.
आंतरमंत्रालयीन समितीत झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर इस्रायलबरोबर एवॅक्स सिस्टिमचा करार करण्यासाठी सुरक्षासंबंधातील मंत्रिमंडळ समितीची मंजुरी मिळणार आहे.
इशांत शर्मा आणि दिप्ती शर्माचीही अर्जुन पुरस्कारासाठी निवड:
भारतीय कसोटी संघाचा प्रमुख गोलंदाज इशांत शर्माची यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
31 वर्षीय इशांत शर्मा सध्या आयपीएलच्या निमीत्ताने युएईत आहे.
गेल्या 13 वर्षांच्या अथक मेहनतीचं फळ मला अर्जुन पुरस्काराच्या माध्यमातून मिळालं असल्याचं इशांत म्हणाला.
इशांतसोबत भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू दिप्ती शर्माचीही अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
महात्मा गांधी यांचा चष्मा अडीच कोटी मध्ये विकला
इंग्लंडमध्ये असताना महात्मा गांधींनी वापरलेल्या सोन्याच्या कडा असलेल्या दोन चष्म्यांचा युकेमध्ये शुक्रवारी लिलाव झाला.
या लिलावात या चष्म्यांना तब्बल अडीच कोटी रुपये (2,60.000 पौंड) इतकी किंमत मिळली.
युकेतील ब्रिस्टॉल येथे पार पडलेल्या या लिलाव प्रक्रियेत केवळ सहा मिनिटांमध्ये हे चष्मे तब्बल अडीच कोटी रुपयांना विकले गेले.
एका अमेरिकन व्यक्तीने ज्याला जुन्या वस्तू जमवण्याचा छंद आहे, त्याने हे चष्मे विकत घेतले आहेत.