Development Banks

भारतातील विकास बँका

भारतातील विकास बँका

जगातील पहिली विकास बँक – सोसायटी जनरल द बेल्जीक, बेल्जियम (१९२२)
आशियातील पहिली विकास बँक – इंडस्ट्रियल बँक ऑफ जपान , १९०२
भारतातील पहिली विकास बँक – टाटा औद्योगिक बँक १९१७
कोलकाता औद्योगिक बँकेची स्थापना १९१९ मध्ये करण्यात आली.

भारतीय औद्योगिक पतपुरवठा महामंडळ (IFCI)

या महामंडळाची स्थापना १ जुलै१९४८ ला करण्यात आली. ही स्वातंत्र्योत्तर काळातील पहिली विकास बँक होय.
· औद्योगिक पतपुरवठा महामंडळाची प्रमुख कार्ये –१) औद्योगिक क्षेत्रात उत्पादन संस्थांना मध्यम व दिर्घ मुदतीची कर्ज देणे.२)औद्योगिक क्षेत्रात नवीन प्रकल्प स्थापन करणे.
· १ जुलै १९९३ रोजी IFCI चे रुपांतर सार्वजनिक मर्यादित कंपनीत करण्यात आले असे रुपांतर झालेली ही वित्तीय क्षेत्रातील पहिली संस्था ठरली.
· आयएफसीआय ही वित्त संस्था पंजाब नॅशनल बँकेत विलीन करण्याचे प्रस्तावित.

भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ

Industrial Credit & Investment Corporation of India / ICICI
स्थापना – ५ जानेवारी १९५५, मुख्यालय – मुंबई
उद्देश – खाजगी क्षेत्रातील उद्योगपतींना मदत करणे.
भांडवल उभारणीत सहभाग – जागतिक बँक (IBRD), अमेरिकन उद्योगपती, इंग्लंड, जर्मनी उद्योगपती व संस्था, भारतीय बँका, विमा कंपन्या यांचा सहभाग होता.
१९९३ मध्ये जॉइन्ट स्टॉक कंपनीमध्ये (संयुक्त भांडवली कंपनी) रुपांतर करण्यात आले.
१९९८ मध्ये विकास बँकांनी सर्वव्यापी बँकिंग व्यवसाय सुरु करावा अशी शिफारस श्री. एस. एच. खान यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगटाने केली. देशातील पहिली वैश्विक बँक म्हणून ICICI ने १ एप्रिल २००२ पासून कार्य सुरु केले आहे. ICICI ही देशातील SBI, HDFC खालोखाल तिसरी मोठी व्यापारी बँक आहे.

भारतीय औद्योगिक विकास बँक

(Industrial Development Bank of India / IDBI
१ जुलै १९६४ रोजी औद्योगिक विकास बँकिंग क्षेत्रातील शिखर संस्था म्हणून IDBI ची स्थापना केली. १९७५ ला RBI कडून मालकी केंद्र सरकारकडे हस्तांतरीत झाली.
१६ फेब्रुवारी १९७६ ला स्वायत्त संस्था म्हणून स्थान देण्यात आले.
या बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
उद्दिष्ट – भारताच्या औद्योगिक विकास बँकिंगमधील सर्वोच्च शिखर संस्था म्हणून IDBI कार्य करते.
आयडीबीआय या वित्त संस्थेने २००४ मध्ये बँकेत रुपांतर करण्यात आले. तिचे नाव आता IDBI लि. असून ती देशातील२८ वी सार्वजनिक क्षेत्रातील बँक ठरली.
IDBI शिखर संस्था म्हणून विविध बँकांना पुर्नवित्ताच्या सोयी उपलब्ध करुन देते.
उद्योग व्यवसायांना प्रत्यक्ष पत पुरवठा तसेच इतर कार्यही करते.
आयडीबीआय चा संचालक मंडळात रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर हा अध्यक्ष असतो. तर डेप्युटी गव्हर्नर हा उपाध्यक्ष असतो.
उद्योगांच्या आधुनिकीकरणासाठी १९७६ मध्ये आयडीबीआयने सुरु केलेली योजना – सॉफ्ट लोन स्कीम

युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया / भारतीय घटक प्रन्यास (UTI)

सामान्य जनतेची बचत औद्योगिक क्षेत्राकडे वळविण्यासाठी युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाच्या
स्थापनेची कल्पना नेहरुंकडे मांडणारे तात्कालीन संरक्षण – टी. टी. कृष्णम्माचारी
मध्यमवर्गीय व अल्प उत्पन्न गटाच्या बचती एकत्र करुन या संघटीतरित्या भांडवल बाजारात गुंतवून मध्यमवर्गीयांना औद्योगिक प्रगतीचे लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने १९६३ च्या युनिट ट्रस्ट कायद्याने १ फेब्रुवारी १९६४ रोजी युटीआयची स्थापना केली. देशातील म्युच्युअल फंड सुरु करणारी ही पहिली संस्था ठरली.
युटीआय ही गुंतवणूकीची मध्यस्थ संस्था म्हणून कार्य करते.
युटीआय सामान्य नागरिकांना युनिट विक्री करुन बचती एकत्र करुन पैसा भांडवल बाजारात गुंतविते. गुंतवणूकीवर मिळणारा लाभ युनिटधारकांमध्ये वाटण्यात येतो.
साधारणतः प्रत्येक युनिटची किंमत १० रु. किंवा त्याच्या पटीत असते.
युटीआयची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली योजना म्हणजे – मास्टर गेन ( Master Gain १९९२)
२००१ साली झालेल्या केतन पारेख घोटाळ्यामुळे युटीआय अडचणीत आली. (US-६४)
सन १९८७ नंतर भारतातील व्यापारी बँकांना म्युचुअल फंड क्षेत्रात प्रवेश केला. भारतीय स्टेट बँक आणि कॅनरा बँक या दोन बँकांनी प्रथम म्युच्युअल फंड सुरु केले.
युटीआय देशातील सर्वात मोठा असलेल्या म्युच्युअल फंडाचे विभाजन करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने ३१ ऑगस्ट २००२ ला घेतला. सध्या युटीआय चे युटीआय– १ व युटीआय – २ असे विभाजन झाले आहे.
वाघूळ समिती – म्युच्युअल फंड स्किम संदर्भात
नाडकर्णी समिती – सार्वजनिक क्षेत्रातील प्रतिभूती संदर्भात
३१ मार्च २००९ पर्यंत देशात ४३ म्युच्युअल फंड होते. त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात ४० म्युच्युअल फंड नोंदणीकृत आहेत.
म्युच्युअल फंड क्षेत्रात १९८७ मध्ये सार्वजनिक बॅंकाना व १९९२ मध्ये कंपन्यांना प्रवेश देण्यात आला.

भारतीय लघू उद्योग विकास बँक

(Small Industries Development Bank of India -SIDBI)
स्थापना – २ एप्रिल १९९० मुख्यायल – लखनौ.
SIDBI ही IDBI च्या संपुर्ण मालकीची संलग्न संस्था म्हणून स्थापन झाली. सप्टेंबर २००० मध्ये SIDBI ला IDBI पासून विभक्त केले व IDBI कडील ५१% शेअर्स सार्वजनिक बँका LIC, GIC व इतर संस्थाना देण्यात आले.
कार्ये:- लघू उद्योगांना कर्ज पुरवठा करणा-या वित्तीय संस्थांच्या कार्य पध्दतीत सुसुत्रीकरण करणे.

राज्य वित्तीय महामंडळ (State Financial Corporation)

देशात सर्वत्र पसरलेल्या लघुउद्योग छोट्या उद्योगांच्या विकासासाठी व त्यांची वित्तीय गरज पुर्ण करण्यासाठी संसदेने राज्य वित्तीय महामंडळ कायदा १९५१ साली केला. या कायद्यानुसार प्रत्येक राज्यातील लघु व छोट्या उद्योगांना वित्त पुरवठा करण्यासाठी SFC स्थापना करावी अशी तरतुद करण्यात आली.
या कायद्यानुसार २५ सप्टेंबर १९५३ ला भारतातील पहीले राज्य वित्तीय मंडळ पंजाब सरकारने स्थापन केले.
सध्या भारतात १८ राज्य वित्तीय महामंडळ कार्यरत आहे.
मार्च १९४९ मध्ये राज्य पातळीवरील पहीले महामंडळ मद्रास राज्यात स्थापन झाले, त्याचे नाव तमिळनाडू औद्योगिक गूंतवणूक महामंडळ असे होते.

आयात निर्यात बँक (EXIM Bank of India)

१ जानेवारी १९८२ ला भारतीय आयात निर्यात बँकेची स्थापना झाली, या बँकेच्या स्थापनेची शिफारस डी. एस जोशी समितीने केली होती.( कार्य सुरु १ मार्च १९८२)
उद्दीष्टये:- आयात निर्यातदारांना पत पुरवठा करणारी सर्वोच्च संस्था म्हणून कार्य करणे. भारतीय औद्योगिक विकास बँकेच्या आंतरराष्ट्रीय पत पुरवठा विभागाची आयात निर्यात क्षेत्राला होणा-या पत पुरवठ्याची जबाबदारी स्वीकारणे. परराष्ट्र व्यापारातील सर्वोच्च संस्था म्हणुन ही बँक कार्य करते.
एक्झिम बँकेचे मुख्यालय – मुंबई
निर्यातीची जोखीम कमी करण्यासाठी निर्यात पत व हमी महामंडळाची स्थापना केली- १९६४

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LlC)

जनतेची बचत राष्ट्र उभारणीच्या कार्यास लावण्यासाठी सरकारने २४५ खाजगी विमा कंपन्या ताब्यात६ घेवून १ सप्टेंबर१९५६ रोजी भारतीय आयुर्विमा महामंडळ स्थापन केले.
या महामंडळाचे मुख्यालय मुंबईला आहे.
LlC चे सात प्रादेशिक कार्यालये – मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद, भोपाळ व कानपूर येथे आहेत.
भारतातील पहिली विमा कंपनी – ओरिएंटल सोसायटी (१८१८)

साधारण विमा महामंडळ –

१९७२ ला १०७ विमा कंपन्यांचे एकत्रिकरण करुन साधारण विमा महामंडळ स्थापन करण्यात आले.
या महामंडळाच्या कार्यालयाची संख्या – १९७२ ला ७९९ होती.
३१ मार्च १९९८ ला ४२०८ इतकी होती.
शाखा – १) नॅशनल इन्शुरंन्स कंपनी ली. (कोलकाता) २) न्यु इंडिया इन्शुरंन्स कंपनी ली. (मुंबई) ३) ओरिएंटल इंडिया कंपने ली. (दिल्ली) ४) युनायटेड इंडिया इन्शुरंन्स कंपनी ली. (मद्रास)
NHB -(National Housing Bank) – स्थापना -जुलै १९८८
गृहबांधणी विकास वित्त महामंडळ ( HDFC – Housing Development Finance Corporation Ltd. ) स्थापना – १९७७
कनिष्ठ व मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती, सहकारी संस्था यांना घर बांधणी / प्लॉट खरेदीसाठी दिर्घ मुदतीचे कर्ज देणे.
भारतीय पर्यटन वित्त निगमाची स्थापना – १९८९

भारतीय औद्योगिक गुंतवणुक बॅंक Industrial Investment Bank of India

आयआरसीआय – स्थापना – १९७१, आयआयबीआय मध्ये रुपांतर – मार्च१९९७
२० मार्च १९८५ मध्ये IRCI चे रुपांतर IRBI (Industrial Reconstrucation Bank of India) मध्ये करण्यात आले. २७ मार्च १९९७ मध्ये IRBI चे रुपांतर Industrial Investment Bank of India Ltd. मध्ये करण्यात आले.
राज्य वित्त महामंडळांना वित्त पुरवठा करणे, बँका आणि वित्तीय संस्थांना, आजारी उद्योगांना सहाय्य करण्यासाठी मदत करणे.

Scroll to Top