SEBI

भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळ (SEBI)

भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळ (Securities and Exchange Board of India: SEBI)

स्थापना – १२ एप्रिल १९८८

वैद्यानिक दर्जा – ३१ मार्च १९९२

मुख्यालय –मुंबई

विभागीय कार्यालय– दिल्ली, कोलकात्ता, चेन्नई
शिफारस – जी. एस. पटेल समिती

स्थापना

भारतीय भांडवल बाजाराचे नियंत्रण करण्यासाठी भारत सरकारने दोन कायदे संमत केले होते.

  • कंपनी कायदा १९५६
  • प्रतिभूती करार (विनियमन) कायदा १९५६ (SCRA 1956)

तरीसुद्धा भांडवल बाजारात अनेक दोष/उणीवा होत्या. १९८० नंतर भांडवल बाजाराचा विस्तार लक्षणीय होता परंतु शिस्तबद्ध नव्हता. म्हणून सरकारला भारतीय भांडवल बाजाराचे नियंत्रण व विकास घडवून आणण्यासाठी एक स्वतंत्र संस्था असावी अशी गरज भासत होती. त्यासाठी सेबीची स्थापना करण्यात आली.

जी.एस. पटेल समितीच्या शिफारसीच्या आधारावर एक अवैधानिक संस्था म्हणून १२ एप्रिल १९८८ रोजी सेबी ची स्थापना करण्यात आली. ३१ जानेवारी १९९२ रोजी सेबीला वैधानिक दर्जा व विस्तृत अधिकार देण्यासाठी राष्ट्रपतीचा वटहुकूम प्रसिद्ध करण्यात आला. कालांतराने ‘सेबी बिल’ संसदेत संमत करण्यात येऊन ३१ मार्च १९९२ पासून सेबीला स्वायत्त व वैधानिक दर्जा देण्यात आला. एप्रिल १९९८ मध्ये भारत शासनाने सेबीला संपूर्ण भांडवली बाजाराचा नियंत्रक म्हणुन घोषित केलेले आहे .सेबीचे मुख्यालय मुंबईला असून कोलकाता, दिल्ली व चेन्नईला तिची विभागीय कार्यालये आहेत.

सेबीचे व्यवस्थापन सहा सदस्यीय संचालक मंडळामार्फत केले जाते.

निवृत्त पोलीस अधिकारी दत्तात्रेय शंकर सोमण हे सेबीचे काही काळ सल्लागार होते. आर्थिक गुन्हेगारी रोखण्यासाठी काय करता येईल याविषयी ‘सेबी’ला त्यांनी सल्लागाराच्या भूमिकेत मदत केली. यामुळे ‘सेबी’ बळकट झाली आणि गुंतवणूकदारांना दिलासा देण्यात यशस्वी झाली.अजय त्यागी हे सध्या सेबीचे चेअरमन आहेत

सेबीची उद्दिष्टे

  • कंपन्या / संस्था यांना आपल्या प्रतिभूतींच्या(शेअर्स,डिबेंचर्स इ.) विक्रीसाठी योग्य वातावरण निर्मिती करणे.
  • गुंतवणूकदारांचे हितसंरक्षण करणे.
  • सर्व रोखे बाजाराच्या व्यवस्थापनावर परिणामकारक नियंत्रण ठेवणे.
  • रोखे बाजारात व्यवहार करणाऱ्यांसाठी आवश्यक,योग्य व अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील राहणे. तसेच रोखे बाजारांचा कारभार स्पर्धात्मक व व्यावसायिक तत्त्वांवर चालण्यासाठी वातावरण निर्मिती करणे.

सेबीची कार्यपद्धती –

१) सेबी तीन घटकांसाठी काम करीत असते

अ) प्रतिभूती निर्गमक

ब) गुंतवणूकदार

क) बाजारातील मध्यस्थ आणि बाजार

सेबीची महत्वाची कार्ये

१) कार्यकारी प्रमुख म्हणून सेबी गैरव्यवहारांची तपासणी आणि त्यावर कारवाई करते.

२) कायदेपालक म्हणून नियंत्रणाचे सर्व कायदे करण्याचा सेबीला अधिकार देण्यात आला आहे.

३) न्यायालयीन प्रमुख म्हणुन घोषणा ,नियम,आदेश काढण्याचा सेबीला अधिकार आहे .

४) रोखे बाजार व इतर प्रतिभूती बाजारातील व्यवहारांचे नियमन, नियंत्रण करणे व त्यावर देखरेख ठेवणे.

५) दलाली नोंदणी, त्यांच्या व्यवसायाचे नियमन व नियंत्रण करणे.

६) रोखे बाजारातील गैर व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे.

७) गुंतवणूकदाराच्या हिताचे रक्षण करणे.

८) इनसायडर ट्रेडिंग वर लक्ष ठेवणे.

Scroll to Top