अरवली पर्वतरांग
अरवल्ली पर्वतरांग ही पश्चिम भारतातील एक पर्वतरांग आहे. ही रांग मुख्यत्वे उत्तर गुजरात, राजस्थानच्या पूर्व भागात व मध्य प्रदेशाच्या पश्चिम भागात पसरली आहे.
• भूविज्ञान-जगातील सर्वात प्राचीन पर्वतांमध्ये अरावलीचा समावेश होतो त्यामुळे भूवैज्ञानिक दृष्ट्या पर्वत महत्त्वाचा आहे. अंदाजे ६० कोटी वर्षांपूर्वी या पर्वताची जडणघडण झाली. राजस्थान आणि गुजरातच्या सीमेवरील माउंट अबू (उंची १७२० मी) हे या पर्वतरांगेतील सर्वोच्च ठिकाण आहे व ते थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.
• पर्यावरण-हा पर्वत राजस्थान कडे वाहणारे मोसमी वारे अडवतो, त्यामुळे अरावली पर्वताच्या पूर्व भागात बऱ्यापैकी पाउस पडतो मात्र अरावलीच्या पर्ज्यन्यछायेतील पश्चिम राजस्थानात कमी पावसामुळे वाळवंट तयार झाले आहे. अरवल्ली पर्वतात अनेक जंगले आहेत, ही बहुतेक जंगले शुष्क प्रकारातील असून वन्य जीव वैविध्य व वन्यजीवांची संख्या लाक्षणीय आहे. रणथंभोर , सारिस्का ही काही प्रसिद्ध जंगले अरावली पर्वतात आहेत. राजस्थानातील काही प्रसिद्ध शहरे (उदा. उदयपूर , चित्तोडगढ , जयपूर , सवाई माधोपुर ) अरावली पर्वताच्या सानिध्यात येतात.
• अर्वाचीन साहित्यातील उल्लेख-महाभारतातील मत्स्य देश हा अरावली पर्वतरागांमध्ये असल्याचे मानले जाते.
अगस्त्यमलाई पर्वतरांग
अनामलाई पर्वतरांग
अनामलाई पर्वतरांग ही भारतातील तामिळनाडू व केरळ या राज्यांतील एक पर्वतरांग आहे. चिन्नार अभयारण्य याच पर्वतरांगेत आहे.
बैलाडीला पर्वतरांग
कामोर टेकड्या
हिमालय पर्वतातील पर्वत शिखरे
पर्वत | राज्य | उंची |
---|---|---|
कांचनगंगा | भारत-नेपाळ | ८५९७ मी. |
नंदादेवी | उत्तर प्रदेश | ७८१७ मी. |
कामेत | उत्तर प्रदेश | ७७५६ मी. |
सासेर कांग्री | जम्मू काश्मीर | ७६७२ मी. |
बद्रीनाथ | उत्तर प्रदेश | ७०४० मी. |
त्रिशुल | उत्तर प्रदेश | ६७०७ मी. |
पाऊहुन्दी | सिक्कीम | ७१२८ मी. |
कांग्टो | अरुणाचल प्रदेश | ७०९० मी. |
भारतातील महत्वाची पर्वतशिखरे
पर्वत | शिखरे | उंची |
---|---|---|
अरवली पर्वत | गुरुशिखर | १६२२ फुट |
पूर्वघाट | महेन्द्रगिरी | १५०५ फुट |
निलगिरी | दोडाबेट्टा | ३६३७ मी |
सह्याद्री | कळसुबाई | १६४६ मी |
सह्याद्री | महाबळेश्वर | १४३८ मी |
सह्याद्री | साल्हेर शिखर | १५६७ मी |
सह्याद्री | मुल्हेर शिखर | १३७८ मी |
सह्याद्री | तोरणमाळ | १२३५ मी |
सातपूडा | वैराट शिखर | ११८० मी |
पश्चिम घाट | अन्नाईमुडी | २६९५ मी |
हिमालय पर्वातातील प्रमुख शिखरे
शिखर उंची (फुट)
गंगोत्री – २१,७००
केदारनाथ – २२,७७०
बद्रीनाथ – २३,१९०
माना – २३,८३२
नंदादेवी – २५,६४५
अन्नपूर्णा – २६,४९२
धवलगिरी – २६,७९५
कांचनगंगा – २८,१४६भारतातील डोंगर रांगा
भारतातील थंड हवेची ठिकाणे
राज्य ठिकाण
उत्तरांचल – नैनीताल, मसुरी, राणीखेत, अल्मोडा
तामीळनाडु – कोडाई कॅनल, उटी कून्नूर, येलगिरी
जम्मू काश्मीर – श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम
हिमाचल प्रदेश – सिमला, डलहौसी, कुलू, कसौली, मनाली, सोलान चैल,
धर्मशाळा
उत्तर प्रदेश – कौसानी
राजस्थान – माऊंट अबू
मेघालय – शिलाँग, चेरापुंजी
मणिपूर – उखरुल
मध्य प्रदेश – पंचमढी
पश्चिम बंगाल – दार्जीलिंग, कॉलिमपॉग
कर्नाटक – केमांगगुड्डी, मडिकेरी
केरळ – पोनगुडी, मुन्नार