Brain MPSC

मेंदू (Brain)

मध्यवर्ती चेतासंस्था ही मेंदू (Brain) व मेरुरज्जुने बनलेली अतिशय नाजूक संरचना आहे.

मेंदूला कर्पार म्हणजे कवटीच्या हाडांचे व मेरुरज्जुला कशेरुस्तभाचे म्हणजेच पाठीच्या कण्याचे सरंक्षण मिळते.

मेंदू व मेरुरज्जू यावर तीन आवरणे असतात त्यांना मस्तिष्कावरणे म्हणतात.

वराशिका (Dura Matter)

हे आवरण बाहेरील धक्क्यापासून  मेंदुचे संरक्षण करते .

निराशिका (Arachnoid Matter)

मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या यात असतात.

वराशिका व निराशिका मधील पोकळीला म्हणतात.

चिनांशुका (Pia Matter)

मेंदूवरील हे तिसरे आवरण असतात.

मेंदूच्या विविध भागात असणाऱ्या पोकळयांना मस्तिष्क निलये(Ventrides)  म्हणतात.

तर मेरुरज्जुमधील लांब पोकळीला मध्यनाल(Central Canal) म्हणतात.

मस्तिष्क निलये, मध्यनाल, मस्तिष्क आवरणामध्ये प्रमस्तिष्क मेरूद्रव्य (Cerebrospinal Fluid) CFS असतो .

प्रमस्तिष्क मेरूद्रव्य मध्यवर्ती चेतासंस्थेस पोषकद्रव्ये पुरवतो व आघात शोषून सरंक्षण करते.

मेंदूची रचना

मेंदूचे तीन भाग पडतात .

प्रमस्तिष्क (Cerebrum)

हा मेंदूचा सर्वात मोठा भाग असून त्याचा बाहेरील पृष्ठभाग अनियमित वळ्या व खाचाचा बनलेला असतो.त्यास संवली म्हणतात.

संवली मधील खोलगट  भाघाना सीता म्हणतात.

सीतामुळे प्रमस्तिष्क गोलार्धाचे चार भाग पडतात .

ललाट

वाणीवर नियंत्रण ठेवणारी व ऐच्छिक हालचालीवर नियंत्रण ठेवणारी प्रेरक क्षेत्रे या पालीत असतात.

पार्श्ववाली

उष्णता ,दाब ,प्रकाश, स्पर्श व थंडी या संवेदनाची क्षेत्रे या पालीत असतात.

ही क्षेत्रे संवेदना ग्रहण करतात.

शंखपाली

ध्वनी संवेदन श्रवण क्षेत्रे शंखपालीत असते.

पश्कचरोटी

दृष्टी क्षेत्र पश्कचरोटी पालीत असते.

कार्य – संरक्षणक्षमता, मनाची  एकाग्रता ,नियोजन ,जाणीव विचारशक्ती ,तर्कशक्ती ,निर्णयक्षमता,माहितीचे साठवण  इ.

तसेच दृष्टी, श्रवण, वास, दु:ख, दडपण इ .चे आकलन

ऐच्छिक स्नायूंच्या आकुंचनाचे नियंत्रण .

अनुमस्तिष्क

यास लहान मेंदू असे म्हणतात .

स्नांयुच्या कार्याचे नियमन.

ऐच्छिक हालचालीमधये सुसूत्रता आणणे.

वस्तू हाताळण्याची क्रिया, चालणे, धावणे, व शरीराचा तोल सांभाळणे इ .कार्यावर नियंत्रण केले जाते .

मस्तिष्कपुच्छ

हा मेंदूचा सर्वात पुच्छबाजूंचा भाग असून तो मज्जारज्जूशी जोडलेला असतो .

हदयाचे ठोके, श्वसन क्रिया, रक्ताभिसरण क्रिया, अन्न मार्गावर ताबा, गिळण्याची क्रिया, शिंकणे, खोकणे यासारख्या  अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण करते.

लंबमज्जा

अनुमस्तिष्क सेतू व मेरुरज्जू  यांना जोडतो .

श्र्वसन आणि अभिसरण या जैविक प्रक्रियेचे केंद्रे लंबमज्जेत असतात म्हणून या भागाला इजा झाल्यास मनुष्याचा तात्काळ मृत्यू होतो .

मेंदूकडे येणारे व मेंदूकडून जाणारे चेतातंतू या भागात एकमेकांना ओलांडून विरुद्ध दिशेने जातात म्हणून डावा प्रमस्तिष्क गोलार्ध शरीराच्या उजव्या भागचे व उजवा गोलार्ध डाव्या भागाचे नियंत्रण करते .

मज्जारज्जू

मसितष्क पृच्छ पुढे निमूळते हो त जाऊन पुढे मजारज्जू सुरु होतो .

मज्जारज्जू पुढे पाठीच्या कण्यात स्थिर होतो .

तो परिघीय चेतासंस्थेला मेंदूशी जोडतो आणि त्याचे द्वारे त्वचा कान या सारख्या ज्ञानेंद्रियाकडून संवेदनेचे वहन मेंदूकडे करून मेंदूकडून स्नायू व ग्रंथीकडे आवेग वाहून नेण्याचे कार्य करते.

प्रतिक्षिप्त क्रिया घडवून आणण्याचे समन्वयक केंद्र म्हणून तो कार्य करतो. मेंदूच्या नकळत हे कार्य घडते.

इतर माहिती 

मेंदूचे वजन १३०० ते १४०० ग्राम असते.

मेंदूच्या पृष्ठभागावरील चेतापेशींची संख्या १०००० दशलक्ष असते.

तात्पुरती स्मृती ३० सेकंद राहते

मेंदूच्या डाव्या गोलार्धात उजव्या गोलार्धापेक्षा १८६० लाख चेतापेशी जास्त असतात.

मेंदुमधून दर मिनिटाला ७५० मिली ते १००० मिली इतके रक्त वाहते.

मेंदू (Brain) ऑक्सिजनशिवाय ४ ते ६ मिनिटे जिवंत राहू शकतो.

 

 

Scroll to Top