राष्ट्रीय संस्कृत संस्था ५ दत्तक गावांना संस्कृत शिकविणार
- राष्ट्रीय संस्कृत संस्था (RKS), लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (दिल्ली), राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (तिरुपती) या तीन केंद्रीय संस्था देशात संस्कृत प्रचाराचे काम पाहतात.
- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या संस्थांना संस्कृत शिकविण्यासाठी प्रत्येकी दोन गावे दत्तक घेण्याचे निर्देश दिले होते.
- राष्ट्रीय संस्कृत संस्थेने जुबार्ता (त्रिपुरा), मासोत (हिमाचल प्रदेश), चिट्टेबळी (कर्नाटक), अदात (केरळ) आणि बराइ (मध्य प्रदेश) ही पाच गावे दत्तक घेतली आहेत.
फिफा महिला फुटबॉल विश्वचषक
- विजेता – अमेरिका
- उपविजेता – नेदरलँड
- अमेरिकेच्या मेगन रॅपिनोने सर्वोत्कृष्ट खेळाडू, गोल्डन बॉल व गोल्डन बूट पुरस्कार जिंकले
- नेदरलँडच्या सारी वान विणेंडलने सर्वोत्कृष्ट गोलरक्षक व गोल्डन ग्लोव्ह पुरस्कार जिंकले
- फिफाबद्दल माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
रोहित शर्माचा एका विश्वचषकात पाच शतके झळकाविण्याचा विश्वविक्रम
- २०१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत त्याने दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड बांगलादेश व श्रीलंकेविरुद्ध शतक झळकाविले
- आयसीसीबद्दल माहितीसाठी येथे क्लिक करा
एस.जयशंकर ८ जुलै २०१९ रोजी राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी
- जयशंकर १९७७ सालच्या भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी
- २०१५ ते २०१८ या काळात भारताचे परराष्ट्र सचिव
- ३० मे २०१९ रोजी भारताचे परराष्ट्र मंत्री
बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेत उत्तराखंड सर्वोत्तम
- जन्मावेळी लिंग गुणोत्तरात उत्तराखंड सर्वोत्तम
- हे गुणोत्तर सरासरीने देशातील १६१ जिल्ह्यात वाढले आहे
- 2015-16 मधील ९०९ वरून २०१८-१९ साली ९१९ मुली इतके झाले आहे
- बेटी बचाओ बेटी पढाओ योजना वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तेजस रेल्वे भारतातील पहिली खाजगी रेल्वे ठरणार
- ही रेल्वे दिल्ली-लखनौ मार्गावर धावणार
राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) प्रमुख
- National Cricket Academy (NCA) बंगळुरू येथे आहे. २००० साली याची स्थापना करण्यात आली. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष राज सिंग डुंगरपूर यांच्या संकल्पनेतून NCA चा जन्म झाला.
- १९ वर्षाखालील गुणवान खेळाडूंना निवडून त्यांना तयार करण्याचे काम द्रवीड करणार आहे.
UNCCD परिषदेचे COP-14 सत्र प्रथमच भारतात
- UNCCD – संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण प्रतिबंधक परिषद
- COP-14 सत्र : ग्रेटर नोएडा (२ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०१९)
- आयोजक : पर्यावरण, वन व हवामान मंत्रालय
- सहभाग : १९५ देशांमधील ५००० प्रतिनिधी
- चर्चा : वाळवंटीकरण, दुष्काळ, जमीन नापीक होणे
- UNCCD बद्दल माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) पुरस्कार २०१८-१९
- सत्कृष्ट पुरुष खेळाडूर्वो : सुनील छेत्री (६ व्यांदा पुरस्कार) [भारतीय संघ व बंगळूर संघाचा कर्णधार]
- सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू : आशालता देवी [केरळ ब्लास्टर्स]
- उदयोन्मुख महिला खेळाडू : डांगमई ग्रेस (मणिपूर)
- उदयोन्मुख पुरुष खेळाडू : सहल अब्दुल समद (केरळ)
व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कार्यविषयक अटी विधेयक-२०१९ मंजूर
- १० जुलै २०१९ रोजी मंजुरी
- १३ केंद्रीय कामगार (श्रम) कायद्यांच्या संबंधित तरतुदींचे एकत्रीकरण करून नवीन नियमावली तयार करण्यात आली
जागतिक लोकसंख्या दिन – ११ जुलै
- UN द्वारे साजरा
- या दिनानिमित्ताने महिलांसाठी मेडरॉक्झीप्रोगेस्टेरॉन एसीटेट (MPA) नावाची नवीन गर्भनिरोधक पद्धत म्हणजे इंट्रामस्क्युलय इंजेक्शनद्वारे गर्भनिरोधकांची रिव्हर्सिबल मेथड उपयोगात आणणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले.
- जागतिक लोकसंख्या दिनाविषयी वाचण्यासाठी क्लिक करा
EXIM बँकेचा पापुआ न्यू गिनी व सेनेगलसोबत करार
- देशातील पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवा विषयक प्रकल्पांना वित्त पुरवठा करण्यासाठी कर्ज स्वरूपात एकूण १२४ दशलक्ष डॉलर (८५० कोटी रुपये) एवढा निधी देण्याच्या हेतूने आयात निर्यात बँकेचा पापुआ न्यू गिनी व सेनेगल देशासोबत करार झाला.
जीत थाइल यांची बुकर पारितोषिक निर्णय समितीमध्ये निवड
- आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिकाच्या पाच सदस्यांच्या निर्णय समितीमध्ये निवड
- २०२० च्या पारितोषिक निवडीसाठी पंच म्हणून कार्य करणार
- केरळमध्ये जन्म
- नार्कोपोलीस कादंबरीचे लेखक
- साहित्य अकादमी पुरस्काराचे विजेता
- आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराबद्दल माहितीसाठी क्लिक करा
जेरेमी लालरुनूंगाचा २०१९ राष्ट्रकुल भारोत्तोलन स्पर्धेत विश्वविक्रम
- सामोआ देशात स्पर्धा सुरु
- १६ वर्षीय जेरेमीने ६७ किलो वजन गटात स्नॅचमध्ये १३६ किलो वजन उचलण्याचा पराक्रम केला
- त्याने युवा विश्वविक्रम, आशियाई विश्वविक्रम, राष्ट्रकुल विश्वविक्रम असे तीन विश्वविक्रम मोडले.
- स्पर्धेचे आयोजन राष्ट्रकुल भारोत्तोलन महासंघ (CWF) करतो
- CWF ची स्थापना १९४७ साली करण्यात आली
- राष्ट्रकुलसंदर्भात माहिती वाचण्यासाठी क्लिक करा
अंशुला कांत जागतिक बँकेच्या MD व CFO पदी
- SBI च्या MD अंशुला कांत यांची जागतिक बँकेच्या वयवस्थापक संचालक पदी (MD) व मुख्य आर्थिक अधिकारीपदी (CFO) निवड
- या पदावर निवड होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी
- जागतिक बँकेविषयी माहिती वाचण्यासाठी क्लिक करा
विम्बल्डन स्पर्धा २०१९
- महिला विजेता -सिमोना हॅलेप (रोमानिया)
- महिला उपविजेता – सेरेना विल्यम्स (अमेरिका)
- सिमोनाचे पहिलेच उपविजेतेपद
- विम्बल्डन स्पर्धेविषयी वाचण्यासाठी क्लिक करा