पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळ दौर्यावर
मागचे दहा दिवस कर्नाटकात जोरदार प्रचार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय नेपाळ दौऱ्याला सुरुवात झाली आहे. नेपाळमध्ये दाखल झाल्यानंतर मोदींनी भारत-नेपाळ बस सेवेचे उद्धाटन केले.
नेपाळमधले जनकपूर हे सीतेचे जन्मगाव ते उत्तर प्रदेशातील अयोध्या या मार्गावर बससेवेचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या उपस्थितीत झाले.
रामायण सर्किट या नावानं ओळखल्या जाणाऱ्या स्थळांना जोडणारी धार्मिक पर्यटन अशी ही कल्पना असून तिचं उद्घाटन मोदींनी केलं आहे. अयोध्या, नंदीग्राम, श्रींगवेरपूर आणि चित्रकूटसारख्या 15 ऐतिहासिक स्थळांचा समावेश या रामायण सर्किटमध्ये असेल अशी माहिती आहे.
दोन दिवसीय दौऱ्यात मोदी तीन तीर्थस्थळांना भेटी देणार आहेत. मोदी त्यांच्या दौऱ्यात एका प्रकल्पाचे भूमिपूजनही करणार असून दोन्ही देशांमध्ये महत्वाचे करारही होतील. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या निमंत्रणावरुन मोदी नेपाळला गेले आहेत.
भारतासाठी नेपाळ अत्यंत महत्वाचा देश आहे. चार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नेपाळच्या दौऱ्यावर गेले आहेत त्यातून ही गोष्ट लक्षात येते. नेपाळमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर भारताकडून प्रथमच हा उच्च स्तरीय दौरा होत आहे. मोदींच्या या दौऱ्यातून शेजारी देशांना प्रथम प्राधान्य देण्याच्या धोरणाबद्दल असलेली कटिबद्धता दिसून येते.
काठमांडूमध्ये दूरस्थ प्रणालीद्वारे ‘अरुण-III’ जलविद्युत प्रकल्पाची कोनशिला ठेवली आहे. हा प्रकल्प एका भारतीय कंपनीकडून चालविल्या जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन: 12 मे
दरवर्षी 12 मे हा दिवस ‘जागतिक परिचारिका दिन’ म्हणून पाळला जातो. यावर्षी हा दिन ‘नर्सेस ए वॉइस टू लीड – हेल्थ इज ए ह्यूमन राइट’ या विषयाखाली पाळला गेला.
सन 1854 साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल (जन्म 12 मे 1820) यांचा हा जन्मदिवस आहे. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते.
1965 साली इंटरनॅशनल काउंसिल ऑफ नर्सेज (ICN) तर्फे पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला होता. जानेवारी 1974 मध्ये 12 मे हा दिवस ‘जागतिक परिचारिका दिन’ पाळण्याची घोषणा केली गेली. याप्रसंगी, भारत सरकारतर्फे फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार दिला जातो. 50,000 रुपये रोख, प्रमाणपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘ब्लॉक 5’ या नावाने ओळखल्या जाणार्या या प्रक्षेपकाद्वारे पृथ्वीपासून 35,000 किलोमीटर वरती भूस्थिर कक्षेत ‘बांगलाबंधू उपग्रह-1’ हा बांग्लादेशाचा पहिला उच्च-कक्षेतील दळणवळण उपग्रह अंतराळात पाठविण्यात आला आहे.
ज्ञान भूषण लिखित ‘अॅक्रॉस द बेंच-इनसाइट इंटू द इंडियन मिलिटरी ज्यूडिशियल सिस्टिम’ पुस्तक
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) ज्ञान भूषण यांच्या ‘अॅक्रॉस द बेंच-इनसाइट इंटू द इंडियन मिलिटरी ज्यूडिशियल सिस्टिम’ शीर्षक असलेल्या या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले आहे.
ज्ञान भूषण हे सशस्त्र दल तंटा न्यायाधिकरण, लखनऊ खंडपीठ येथील ‘अ’ दर्जाचे सदस्य आहेत.
भारतीय लष्करांसाठी फोर्सच्या विशेष गाड्या
समाजातील विविध घटकांच्या गरजांनुसार गाडी तयार करण्याचे काम कंपनीकडून कायमच प्राधान्याने करण्यात येते. त्यानुसारच हे आणखी एक पुढचे आणि महत्त्वाचे पाऊल ठरेल असे म्हणता येईल. या गाड्या हलक्या वजनाच्या असून त्या लष्करामध्ये विशिष्ट कामांसाठी वापरण्यात येतील असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या गाड्या पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या आहेत असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
लष्कराच्या कामाचा वेग आणि नेमकेपणा वाढावा यादृष्टीने या गाड्यांची निर्मिती केली जाणार आहे. लष्कराच्या गरजेप्रमाणे ही वाहने मजबूत असून कोणत्याही कठिण प्रसंगाला तोंड द्यायला सज्ज असतील.
तसेच या गाड्यांची चाचणी अतिशय कठोर पद्धतीने करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. या गाडीच्या सातत्याने दोन वर्ष राजस्थानमध्ये 50 अंश सेल्सिअसमध्ये तसेच हिमालयासारख्या उणे 30 अंश सेल्सिअसमध्ये चाचण्या करण्यात आल्या. या गाड्यांची मोठी ऑर्डर कंपनीला लष्कराने दिली आहे.

स्पेस-एक्स कंपनीने आत्तापर्यंतचा सर्वात शक्तिशाली ‘फाल्कन-9’ अग्निबाण सोडला
अंतराळ क्षेत्रातली अमेरिकेची खाजगी कंपनी ‘स्पेस-एक्स (SpaceX)’ ने 11 मे 2018 रोजी आपला सर्वात शक्तिशाली असा ‘फाल्कन-9’ अग्निबाण अंतराळात पाठवला आहे. पुनर्वापरायोग्य अग्निबाण तयार करण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे.

भारतीय लष्कराला अधिक बळकट करण्यासाठी नेहमीच विविध स्तरावर प्रयत्न सुरु असतात. त्यातच आणखी एक भर पडली असून त्यासाठी फोर्स मोटार्स कंपनीने पुढाकार घेतला आहे. गाड्यांच्या निर्मितीत नामवंत म्हणून ओळखली जाणारी ही कंपनी आता लष्करासाठी विशेष गाड्या तयार केल्या आहेत.