चालू घडामोडी ७ मे २०१८

चालू घडामोडी ७ मे २०१८

पहिल्यांदाच ‘जयपूर फूट’ हा कृत्रिम अवयव संयुक्त राष्ट्रसंघात प्रदर्शनाला ठेवणार 
सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे जगप्रसिद्ध ‘जयपूर फूट’ हा कृत्रिम अवयव 15-18 मे 2018 या कालावधीत न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात प्रदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.


भगवान महावीर विकलांग सहयता समितीचे (BMVSS) संस्थापक आणि मुख्य संरक्षक डी. आर. मेहता हे जयपूर फूटचे (कृत्रिम पाय) निर्माते आहेत. या कृत्रिम अंगाची 29 देशांमध्ये उपस्थिती आहे.



APTAR-6C: चीनचा दळणवळण उपग्रह प्रक्षेपित 
चीनने दक्षिण-पश्चिम झिचांग उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरुन ‘APTAR-6C’ नावाचा एक नवा दळणवळण उपग्रह अवकाशात सोडला आहे.

लोंगमार्च-3B या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हा उपग्रह सोडण्यात आला आहे. हा उपग्रह चीन एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनने विकसित केला आहे. 


इनसाइट: मंगळ ग्रहाच्या आंतरिक बाजूचा अभ्यास करणारी NASAची मोहीम 
अमेरिकेच्या NASA संस्थेने मंगळ ग्रहाच्या आंतरिक बाजूचा अभ्यास चालविण्यासाठी 5 मे 2018 रोजी ‘इनसाइट (InSight)’ ही आपली पहिली मोहीम अंतराळात पाठवली आहे.

इनसाइट (इंटेरियर एक्सप्लोरेशन युजींग सिस्मिक इंव्हेस्टिगेशंस) मार्फत ग्रहावरील भूकंपाचे मापन करण्याकरिता सिस्मोमीटर उपकरण प्रस्थापित केले जाणार. याच्या माध्यमातून 4.5 अब्ज वर्षांपूर्वी मंगळ ग्रहाच्या जन्माबाबत माहिती प्राप्त केली जाणार आहे



दक्षिण आशियाई कनिष्ठ क्रिडा स्पर्धांमध्ये भारताला 11 सुवर्णपदके 
श्रीलंकेच्या कोलंबो शहरात भारतीय खेळाडूंनी भारताला दक्षिण आशियाई कनिष्ठ क्रिडा स्पर्धांमध्ये पहिल्याच दिवशी 11 सुवर्णपदकांसह 10 रौप्य आणि 3 कांस्यपदके मिळवून दिली आहेत.

अर्शदीप सिंगने भालाफेक स्पर्धेत 71.47 मीटरचा नवा विक्रम करत पहिला सुवर्णपदक जिंकला. किरण बालियान (गोळाफेक), लोकेश सत्यनाथन (लांब उडी), सपना कुमारी (अडथळा शर्यत), दुर्गा (धावशर्यत), मुलांची 4×100 मीटर रिले यांनी सुवर्ण जिंकले आहे.



बोरिया मजुमदार लिखित ‘एलेव्हन गॉड्स अँड ए बिलियन इंडियन्स’ 
बोरिया मजुमदार यांचे ‘एलेव्हन गॉड्स अँड ए बिलियन इंडियन्स: द ऑन अँड ऑफ द फील्ड स्टोरी ऑफ क्रिकेट इन इंडिया अँड बियॉन्ड’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.

बोरिया मजूमदार यांना क्रिडा क्षेत्रात भारताच्या सर्वात प्रभावशाली समीक्षक म्हणून ओळखल्या जाते.
Scroll to Top