चालू घडामोडी ३० एप्रिल २०१८

चालू घडामोडी ३० एप्रिल २०१८

तेजस विमानाने ‘डर्बी’ क्षेपणास्त्र यशस्वीरीत्या सोडले गेले
भारतीय हवाई दलाने ‘तेजस’ या देशी बनावटीच्या हलक्या वजनाच्या लढाऊ विमानाद्वारे इस्राएल निर्मित हवेतून हवेत मारा करणार्‍या व दृष्टीक्षेपापलीकडील (BVR) लक्ष्य भेदणार्‍या ‘डर्बी’ क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी यशस्वीरित्या पार पाडली आहे.


डर्बी (अल्टो) क्षेपणास्त्र हे हवेतून हवेत मारा करणारे व दृष्टीक्षेपापलीकडील (BVR) लक्ष्य भेदणारे, मध्यम पल्ल्याचे (जास्तीतजास्त 50 कि.मी.) अॅक्टिव रडार होमिंग क्षेपणास्त्र आहे. हे 118 किलो वजनी क्षेपणास्त्र आहे.

तेजस विमान भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) याच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी या स्वायत्त संस्थेद्वारा देशातच विकसित केले गेले आहे आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कडून याचे उत्पादन केले गेले. हे वजनानी हलके व बहू-भूमिका बजावणारे चौथ्या पिढीचे एक इंजिन असलेले लढाऊ विमान आहे. तेजस विमानाचा IAF 45 स्क्वाड्रनमध्ये समावेश करण्यात आला आहे. 



BCCI चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर 
पंकज रॉय (2016-17), अंशुमन गायकवाड (2017-18), डायना एदूलजी (2016-17) आणि सुधा शाह (2017-18) यांना सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

शिवाय, नरेन ताम्हने आणि अब्बास अली बेग (2016-17) आणि बुधी कुंदरण (2017-18) यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यांना प्रत्येकी 15 लक्ष रुपये रोख पारितोषिक दिले जाईल.

भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) ची तामिळनाडू सोसायटी नोंदणी कायद्याच्या अंतर्गत डिसेंबर 1928 मध्ये स्थापना करण्यात आली. BCCIचे मुख्यालय महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये आहे. BCCI तर्फे सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. 

पुरस्कार विजेत्याला 25 लक्ष रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाते. हा पुरस्कार पहिल्यांदा 2006-07 साली दिला गेला होता.




नेपाळच्या लुंबिनी येथे आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद 
28 एप्रिल 2018 पासून भगवान बुद्ध यांच्या जन्मस्थळी लुंबिनी (नेपाळ) येथे आंतरराष्ट्रीय बुद्ध परिषदेला सुरुवात झाली.

दोन दिवस चालणार्‍या या कार्यक्रमाचे उद्घाटन नेपाळचे पर्यटन मंत्री रबिंद्र अधिकारी यांनी केले. या कार्यक्रमात 24 देशांमधून पुरातत्त्व, इतिहासकार, बौद्ध गुरु आणि विद्वान यांच्यासह जवळपास 300 लोकांनी सहभाग घेतला आहे.


AOC तर्फे पीटर नॉर्मन यांना ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ सन्मान 
ऑस्ट्रेलियाचा दिवंगत धावपटू पीटर नॉर्मन याला ऑस्ट्रेलियन ऑलंपिक समितीकडून (AOC) तब्बल 50 वर्षांनंतर मरणोत्तर ऑस्ट्रेलियाच्या ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ या सर्वोच्च ऑलंपिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

1968 मेक्सिको सिटी ऑलंपिकमध्ये पीटर नॉर्मनने रौप्यपदक जिंकले होते आणि राष्ट्रीय विक्रम केला होता. अमेरिकेच्या टॉमी स्मिथ (सुवर्ण) आणि जॉन कार्लोस (कांस्य) यांच्यासमवेत त्यांनी पोडियमवर जागा मिळवली होती. नॉर्मन यांचा 2006 साली मृत्यू झाला.

नॉर्मन, स्मिथ आणि कार्लोस या तिघांनीही मानवाधिकारांचे समर्थन करत त्यांच्या कृतीतून देशातील परिस्थितीचा निषेध व्यक्त केला होता. नॉर्मन ऑस्ट्रेलियातील एक गौर वर्णी शारिरीक शिक्षक होते. त्यांनी स्मिथ आणि कार्लोस यांच्या समर्थनाने शर्टावर मानवाधिकारचा बॅज लावला होता. 

तर स्मिथ आणि कार्लोस यांनी श्वेत वंशाची देशातली गरीबी दर्शविण्यासाठी प्रत्येकी एक हातमोजा अशी एकच जोडी वापरली होती. त्यानंतर स्मिथ आणि कार्लोस यांना ऑलंपिकमधून काढून टाकण्यात आले आणि नॉर्मनची कधीही निवड केली गेली नाही.



अक्षय ऊर्जा साठविण्यासाठी मंत्रालयाची ‘राष्ट्रीय ऊर्जा साठवणूक मोहीम’
भारतात निर्माण झालेली अक्षय ऊर्जा साठवून ठेवण्याकरिता ग्रिडशी जोडलेला साठा तयार करून कार्यरत करण्यासाठी केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने ‘राष्ट्रीय ऊर्जा साठवणूक मोहीम’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेसाठी एक मसुदा तयार करण्यात आला आहे.

या मोहीमेंतर्गत एक नियामक कार्यचौकट स्थापन केले जाईल आणि ऊर्जा साठवून ठेवण्याकरिता लागणार्‍या बॅटरींच्या देशी उत्पादनास प्रोत्साहन दिले जाईल.

राष्ट्रीय ऊर्जा साठवणूक मोहीमेंतर्गत येत्या 5 वर्षांमध्ये 15-20 GWh (गिगावॉट अवर) क्षमतेचा ग्रिडशी जोडलेला साठा तयार करण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे.

ही मोहीम 7 घटकांवर केंद्रीत आहे, ते म्हणजे – स्वदेशी उत्पादन; तंत्रज्ञान व खर्चासंबंधी कल याचे मूल्यांकन; धोरण व नियमन कार्यचौकट; वित्त पुरवठा, व्यापार पद्धती आणि बाजारपेठ निर्मिती; संशोधन व विकास; मानके व चाचणी व्यवस्था; ऊर्जेच्या साठ्यासाठी ग्रिड योजना.
Scroll to Top