चालू घडामोडी ६ एप्रिल २०१८

चालू घडामोडी ६ एप्रिल २०१८

युआयडीकडून ‘व्हर्च्युअल आयडी’ सुविधेला सुरुवात 
युआयडीकडून ‘व्हर्च्युअल आयडी’ सुविधेला सुरुवात झाली असून आता आधार क्रमांकाऐवजी संग्रहित छायाचित्र वापरता येणार आहेत.


आजवर ज्या कामांसाठी आपला आधार क्रमांक द्यावा लागत होता. त्यासाठी आता तो देण्याची गरज भासणार नाही. तर केवळ हा व्हिआयडी सांगितला तरी चालणार आहे.

याचा सर्वांत मोठा फायदा हा असेल की लोकांना वारंवार आपला आधार क्रमांक दुसऱ्यांना सांगावा लागणार नाही. एकूणच हा व्हिआयडी आधार क्रमांकासाठी प्राथमिक स्वरुपातील पर्याय म्हणून वापरता येणार आहे.



भारताच्या वेटलिफ्टींग प्रकारात पदकाची कमाई 

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा प्रकारात भारताने पहिल्या दिवशी धडाकेबाज सुरुवात केली आहे. भारताला पहिले सुवर्णपदक मीराबाई चानूने मिळवून दिले आहे.

भारोत्तोलनमध्ये ४८ किलो वजनी गटात चानूने विक्रमी १८९ किलो वजन उचलत राष्ट्रकुल स्पर्धेचा विक्रम मोडीत काढला.

५६ किलो वजनी गटात भारताच्या गुरुराजाने वेटलिफ्टींग प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली आहे. 
तीन प्रयत्नांमध्ये २४९ किलो वजन उचलत गुरुराजाने भारताला पहिलं यश मिळवून दिलं आहे.
या प्रकारात मलेशियाच्या अझर अहमदने सुवर्ण तर श्रीलंकेच्या चतुरंगा लकमलने कांस्यपदकाची कमाई केली आहे.


नासा मंगळावर पाठविणार यांत्रिक माश्या 
नासा मंगळावर यांत्रिक माश्या पाठविणार आहे, तर मंगळासंदर्भात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संशोधन करण्यासाठी नासाकडे २३० प्रस्ताव आले होते. त्यातील एक प्रस्ताव यांत्रिक माश्या पाठविण्याबाबतचा होता.

या यांत्रिक माश्यांना ‘रोबोटिक बीज’ असे नाव देण्यात आले आहे.

मंगळावरील वातावरण पृथ्वीपेक्षा विरळ आहे. त्यामुळे या ग्रहावर उड्डाणासाठी या माश्यांचे पंख मोठ्या आकाराचे असतील. 

अमेरिकी व जपानी शास्त्रज्ञांनी संयुक्त संशोधनातून यांत्रिक माश्या बनविल्या आहेत. त्यांच्या शरीरात सेन्सर, वायरलेस संपर्क आदी उपकरणे बसविण्यात आली आहेत. 

मंगळावर भूप्रदेशाची मापे घेणे, खडक, माती आदींचे नमुने गोळा करणे, जीवसृष्टीचे अस्तित्व आढळल्यास त्याचे पुरावे गोळा करणे ही कामे या यांत्रिक माश्या करणार आहेत. तर या यांत्रिक माश्यांचे मोबाइल बेसद्वारे रिचार्जिंग होणार आहे.



रशिया, टर्की, इराण यांनी सीरियाच्या एकात्मिकतेला अबाधित राखण्याची शपथ घेतली 

रशिया, टर्की, इराण यांनी सीरियाच्या एकात्मिकतेला अबाधित राखण्यासाठी आणि संघर्षाला विराम देण्यासाठी शपथ घेतली आहे.

तिन्ही देशांचे राष्ट्रपती – हसन रुहानी (इराण), रजब तय्यब अर्दोगान (टर्की) आणि व्लादमीर पुतिन (रशिया) – सीरियाच्या मुद्द्यावर त्रिपक्षीय बैठकीसाठी अंकारामध्ये एकत्र आले होते. त्या बैठकीचे मुख्य उद्देश्य म्हणजे सीरियातील संघर्षाला विराम देणे आणि देशाच्या क्षेत्रीय अखंडतेवर चर्चा करणे.



नवी दिल्लीत भारत-जपान-अमेरिका यांची ९ वी त्रिपक्षीय बैठक संपन्न 

४ एप्रिल २०१८ रोजी नवी दिल्लीत भारत, जपान आणि संयुक्त राज्य अमेरिका यांच्या अधिकार्‍यांची ९ वी त्रिपक्षीय बैठक यशस्वीरीत्या पार पडली.

या बैठकीत संयुक्त सचिव/महासंचालक/सहाय्यक सचिव पातळीवरील अधिकार्‍यांनी भाग घेतला होता. बैठकीत क्षेत्रीय आणि वैश्विक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
Scroll to Top