NITI आयोगाचा ‘SATH-E’ प्रकल्प
NITI आयोगाने शालेय शिक्षणात प्रशासकीय बदल घडवून आणण्याकरिता १७ मार्च २०१८ रोजी ‘मानव संपदा शिक्षणात बदलण्यासाठी शाश्वत कृती’ (Sustainable Action for Transforming Human Capital in Education -SATH-E/साथ-ई) नावाने एक नवा उपक्रम प्रस्तुत केला आहे.
हा उपक्रम २०१८-२०२० या काळात चालविला जाणार आहे. यामधून शालेय शिक्षणात ‘आदर्श राज्य’ बनविण्याचे लक्ष्य ठेवलेल्या झारखंड, मध्यप्रदेश आणि ओडिशा या तीन राज्यांसाठी विशेष आराखडा तयार केला जाईल.
राज्यात प्लॅस्टिक, थर्माकोलच्या उत्पादनांवर बंदी
राज्यात प्लॅस्टिक आणि थर्माकोलपासून तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे, अशी घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत केली.
तसेच उल्लंघन करणाऱ्यांना २५ हजारांचा दंड आणि तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे.
राज्यात वर्षाला दहा हजार ९५५ टन प्लॅस्टिकचा वापर केला जात असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. मंत्रिमंडळाने या प्रस्तावास मान्यता दिली असल्याची माहिती निवेदन करताना कदम यांनी दिली.
प्लॅस्टिकपासून तयार करण्यात येणाऱ्या पिशव्या; तसेच पॅलिस्टायरिन (थर्माकोल), प्लॅस्टिकपासून तयार होणाऱ्या डिस्पोजेबल वस्तू-ताट, कप, प्लेट्, ग्लास, काटे-चमचे, वाटी, स्ट्रॉ, कटलरी, नॉन ओव्हन पॉलिप्रॉपिलेन बॅग, स्प्रेड शीट्स, प्लॅस्टिक पाऊच, सर्व प्रकारच्या प्लॅस्टिक वेष्टनाचा वापर, उत्पादन, साठवणूक, वितरण, घाऊक आणि किरकोळ विक्री, आयात आणि वाहतूक करण्यास राज्यात बंदी असणार आहे.
मल्याळम लेखक एम. सुकुमारन यांचे निधन
सुप्रसिद्ध मल्याळम लेखक एम. सुकुमारन यांचे १६ मार्च २०१८ रोजी निधन झाले आहे. ते ७६ वर्षांचे होते.
एम. सुकुमारन यांना सन २००६ मध्ये केंद्र साहित्य अकादमी आणि आणि सन १९७६ मध्ये केरळ साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या ‘संगागनाम’ आणि ‘उनर्थपट्टू’ या लघुकथांवर चित्रपट निर्मिती करण्यात आलेली आहे
पी. एस. यादव यांच्या नेतृत्वात शास्त्रज्ञांच्या चमूच्या प्रयत्नांनी २२ डिसेंबर २०१७ रोजी आसामी म्हशीचे क्लोन जन्माला आले. त्याचे ‘सच गौरव’ असे नाव ठेवण्यात आले आहे. हे क्लोन मुर्हा म्हशीच्या जातीचे आहे.
याचा जन्म उच्च तंत्रज्ञान असलेल्या ‘सच डेयरी फार्म’ यांच्या क्लोनिंग प्रयोगशाळेपासून १०० किलोमीटर दूर एका शेतात झाला
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अल्प विकसित देशांच्या श्रेणीमधून चार देश बाहेर पडण्यास पात्र
भूटान, किरबाती, साओ टोमे व प्रिन्सिपे आणि सोलोमोन बेटे या चार देशांना अल्प विकसित देशांच्या (Least Developed Nation-LDC) श्रेणीमधून बाहेर पडण्यास पात्र असून त्यांना त्यावरील श्रेणीत सामील करण्याची शिफारस १६ मार्च २०१८ रोजी संयुक्त राष्ट्रसंघ विकास धोरण समितीकडून (CDP) करण्यात आली आहे.
या चार देशांमध्ये राष्ट्रीय उत्पन्न क्षमता वाढल्याने तसेच आरोग्य व शिक्षण परिस्थितीत सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. समिती आपल्या शिफारसी UN च्या आर्थिक व सामाजिक परिषदेकडे (ECOSOC) पाठविणार, जे पुढे त्यांचा निर्णय संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेपुढे मांडणार.
सध्या LDC श्रेणीत ४७ देश आहेत, ज्यातील ३३ देश आफ्रिकेत आहेत, तर १३ देश आशिया-प्रशांत भागात आणि एक लॅटिन अमेरिकेमध्ये आहेत.
चीनने रॉकेट तंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिम हृदय विकसित केले
चीनच्या संशोधकांनी रॉकेट तंत्रज्ञानाचा वापर करून एक कृत्रिम हृदय विकसित केले आहे. याचा पशूंवरील प्रयोग यशस्वी ठरला आहे.
चीनच्या अकॅडमी ऑफ लॉंच व्हिएकल टेक्नॉलॉजी (CALT) आणि उत्तर चीनच्या टियांजिनमधील टाडा इंटरनॅशनल कार्डियोव्हॅस्कुलर हॉस्पिटल यांनी संयुक्तपणे ‘एयरोस्पेस हार्ट’ नामक कृत्रिम हृदय तयार केले आहे. कृत्रिम हृदय रॉकेट प्रणालीमधील चुंबकीय आणि लिक्विड लेव्हिटेशनचा उपयोग करतो.

हा या प्रकारचा पहिलाच प्रयोगात्मक कृतीशील कार्यक्रम आहे, ज्यामध्ये वैयक्तिक, जिल्हा आणि राज्य पातळीवर हस्तक्षेप होईल.
हा आराखडा NITI आयोग, तिन्ही राज्ये आणि बोस्टन कंसल्टिंग ग्रुप (BCG) आणि पिरामल फाउंडेशन फॉर एज्युकेशन लीडरशिप (PFEL) या ज्ञान भागीदारांनी तयार केला आहे.

‘सच-गौरव’ भारतात प्रथमच क्लोन आसामी म्हैस जन्माला आली
हिसार येथील केंद्रीय म्हैस संशोधन संस्था (Central Institute for Research on Buffaloes -CIRB) येथील भारतीय शास्त्रज्ञांनी क्लोन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रथमच आसामी जातीची म्हैस जन्माला आणण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे.
हिसार येथील केंद्रीय म्हैस संशोधन संस्था (Central Institute for Research on Buffaloes -CIRB) येथील भारतीय शास्त्रज्ञांनी क्लोन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रथमच आसामी जातीची म्हैस जन्माला आणण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे.
पी. एस. यादव यांच्या नेतृत्वात शास्त्रज्ञांच्या चमूच्या प्रयत्नांनी २२ डिसेंबर २०१७ रोजी आसामी म्हशीचे क्लोन जन्माला आले. त्याचे ‘सच गौरव’ असे नाव ठेवण्यात आले आहे. हे क्लोन मुर्हा म्हशीच्या जातीचे आहे.
याचा जन्म उच्च तंत्रज्ञान असलेल्या ‘सच डेयरी फार्म’ यांच्या क्लोनिंग प्रयोगशाळेपासून १०० किलोमीटर दूर एका शेतात झाला
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अल्प विकसित देशांच्या श्रेणीमधून चार देश बाहेर पडण्यास पात्र
भूटान, किरबाती, साओ टोमे व प्रिन्सिपे आणि सोलोमोन बेटे या चार देशांना अल्प विकसित देशांच्या (Least Developed Nation-LDC) श्रेणीमधून बाहेर पडण्यास पात्र असून त्यांना त्यावरील श्रेणीत सामील करण्याची शिफारस १६ मार्च २०१८ रोजी संयुक्त राष्ट्रसंघ विकास धोरण समितीकडून (CDP) करण्यात आली आहे.
या चार देशांमध्ये राष्ट्रीय उत्पन्न क्षमता वाढल्याने तसेच आरोग्य व शिक्षण परिस्थितीत सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. समिती आपल्या शिफारसी UN च्या आर्थिक व सामाजिक परिषदेकडे (ECOSOC) पाठविणार, जे पुढे त्यांचा निर्णय संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेपुढे मांडणार.
सध्या LDC श्रेणीत ४७ देश आहेत, ज्यातील ३३ देश आफ्रिकेत आहेत, तर १३ देश आशिया-प्रशांत भागात आणि एक लॅटिन अमेरिकेमध्ये आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघाकडून १९७१ साली LDC श्रेणीची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत केवळ बोत्सवाना, काबो वर्दे, इक्वेटोरियल गिनी, मालदीव आणि सामोआ हे पाच देश या श्रेणीमधून बाहेर पडलेली आहेत.