चालू घडामोडी १७ मार्च २०१८

चालू घडामोडी १७ मार्च २०१८

शहर प्रशासनाच्या गुणवत्तेत पुणे अव्वल 
जनाग्रह सेंटर फोर सिटीजनशिप अँड डेमोक्रेसी (JCCD) द्वारे २०१७ साली भारताच्या शहर प्रणालीचे वार्षिक सर्वेक्षण (ASICS) अनुसार, शहर प्रशासनाच्या गुणवत्तेच्या बाबतीत क्रमवारीत पुणे (महाराष्ट्र) अग्रस्थानी आहे.


शहर प्रशासनाच्या बाबतीत पुण्यानंतर कोलकाता, तिरूवनंतपुरम, भुवनेश्वर आणि सूरत यांचा शीर्ष पाचमध्ये समावेश आहे. २३ शहरांच्या या यादीत दिल्ली सहाव्या स्थानी आहे.


सर्वेक्षणात प्रशासनाच्या गुणवत्तेचे आकलन २० राज्यांमध्ये २३ मोठ्या शहरांमध्ये शहरी स्थानिक पालिकांच्या कार्यप्रणालीच्या माध्यमातून केले गेले. शहरांना १० पैकी ३.० आणि ५.१ या दरम्यान गुण दिले गेलेत.



इंफाळमध्ये १०५ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसला सुरूवात 
इंफाळमधील मणिपूर केंद्रीय विद्यापीठात ‘रिचिंग द अनरिच्ड थ्रू सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ या विषयाखाली ‘२०१८ भारतीय विज्ञान काँग्रेस (ISC)’ भरविण्यात आली आहे.

१६ मार्च २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ISC मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे. परिषद पाच दिवस चालणार आहे.

भारतीय विज्ञान काँग्रेस महामंडळ (ISCA) ही कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे मुख्यालय असलेली भारतातली एक प्रमुख वैज्ञानिक संघटना आहे. याची १९१४ साली स्थापना करण्यात आली. 

यामध्ये ३०००० हून अधिक वैज्ञानिक सदस्य म्हणून आहेत. १५-१७ जानेवारी १९१४ या काळात ISCA ची पहिली बैठक एशियाटिक सोसायटी (कलकत्ता) येथील परिसरात झाली.



नवी दिल्लीत वार्षिक ‘कृषी उन्नती मेळावा’चे आयोजन 
नवी दिल्लीत भारतीय कृषी संशोधन संस्था (पूसा) याच्या परिसरात १६-१८ मार्च २०१८ या काळात वार्षिक ‘कृषी उन्नती मेळावा’ याचे आयोजन करण्यात आले आहे.

आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख देण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ मार्चला या मेळाव्याचे उद्घाटन करणार आहेत. शिवाय जैविक शेती संबंधित एका ऑनलाइन व्यासपीठाचे अनावरण केले जाणार आणि २५ कृषी विज्ञान केंद्रांची कोणशीला ठेवली जाणार आहे.

१९७२ सालापासून कृषी उन्नती मेळाव्याचे आयोजन दरवर्षी केले जात आहे. याचे आयोजन भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) च्या वतीने केले जाते.


मॉन्ट्रियल बाल चित्रपट महोत्सवात ‘हल्का’ या भारतीय चित्रपटाला पुरस्कार 
भारतीय चित्रपट निर्माता नील माधव पंडा यांचा चित्रपट ‘हल्का’ याला २१ व्या मॉन्ट्रियल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवात (Festival International du Film Pour Enfants de Montreal Film -FIFEM) ‘ग्रँड प्रिक्स डी मॉन्ट्रियल’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

मॉन्ट्रियल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सव कॅनडाच्या क्युबेक प्रांतात मॉन्ट्रियल शहरामध्ये दरवर्षी आयोजित केला जाणारा बाल चित्रपट महोत्सव आहे.



के. एल. राहुल – विस्डेन इंडिया अल्मनॅकचा ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ 
भारतीय फलंदाज कन्ननूर लोकेश राहुल याला विस्डेन इंडिया अल्मनॅकचा ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ (वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटर) हा किताब प्राप्त झाला आहे.

विस्डेन इंडिया अल्मनॅकने आपल्या नियतकालिकेच्या सहाव्या आवृत्तीत हा मान बहाल केला आहे. के. एल. राहुल टी-२० प्रकारात एक यशस्वी फलंदाज आहे.


दीप्ती शर्मा हिला ‘वुमन क्रिकेटर ऑफ द इयर’ घोषित करण्यात आले आहे आणि भारताची पहिली महिला क्रिकेट खेळाडू शांता रंगास्वामी हिला ‘विस्डेन हॉल ऑफ फेम’ मध्ये इरापल्ली प्रसन्ना (पुरुष खेळाडू) सोबत ठेवण्यात आले आहे



अँजेला मर्केल चौथ्यांदा जर्मनीच्या चांसलर पदी 
अँजेला मर्केल यांनी चौथ्यांदा जर्मनीच्या चांसलर पदाची शपथ घेतली आहे. मर्केल या सन २०१३ पासून जर्मनीचे चांसलर पद सांभाळत आहेत. चांसलर पदाचा कार्यकाळ चार वर्षांचा आहे.

जर्मनीतल्या सोशल डेमोक्रेट्स (SPD) पक्षाच्या अँजेला मर्केल यांच्या नेतृत्वाखाली पुराणमतवादी पक्ष आणि SPD मिळून देशात बहुपक्षीय सरकारची स्थापना करण्यात येणार आहे.

जर्मनी हा पश्चिम युरोप प्रदेशातला एक देश आहे. बर्लिन हे देशाचे राजधानी शहर आहे आणि युरो हे चलन आहे. देशाचे वर्तमान राष्ट्रपती फ्रॅंक-वॉल्टर स्टीनमेयर हे आहेत.
Scroll to Top