राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते पोर्ट लुईसमध्ये जागतिक हिंदी सचिवालयाचे उद्घाटन
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते मॉरिशसच्या पोर्ट लुईस शहरात भारताच्या मदतीने उभारलेल्या ‘जागतिक हिंदी सचिवालय’ याचे उद्घाटन करण्यात आले आहे. शिवाय सचिवालयाचे बोधचिन्ह आणि अर्ली डिजिटल लर्निंग प्रोग्राम यांचे देखील अनावरण केले.
राष्ट्रपती मॉरिशसच्या तीन दिवसांच्या दौर्यावर होते. पुढे त्यांनी मादागास्करकडे प्रस्थान केले.
मॉरीशस हा आफ्रिका खंडाच्या किनारी दक्षिण-पूर्व भागात जवळजवळ ९०० किलोमीटर दूर हिंद महासागरात आणि मेडागास्करच्या पूर्वेकडे असलेले एक बेट राष्ट्र आहे. पोर्ट लुईस देशाचे राजधानी शहर आहे आणि मॉरीशस रुपया देशाचे चलन आहे.
जागतिक ग्राहक हक्क दिन १५ मार्च
ग्राहक कल्याण विभाग १५ मार्च २०१८ रोजी ‘मेकिंग डिजिटल मार्केटप्लेसेस फेअरर (डिजिटल बाजारांना अधिक पारदर्शी बनविणे)’ या विषयाखाली ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ साजरा करीत आहे.
१९६२ साली १५ मार्च रोजी तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी औपचारिकपणे अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये ग्राहक हक्क या संदर्भात संकल्पना सादर केली होती. ते प्रथम जागतिक नेते होते, ज्यांनी हा मुद्दा जगासमोर मांडला होता.
इंडिया टीबी रिसर्च कंसोर्टियम (ITBRC) याच्या स्थापनेसाठी ICMR याला कोरियाच्या कोचोन फाउंडेशन या विना-नफा संस्थेकडून $65,000 रोख पुरस्कार प्राप्त झाला.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) याची स्थापना १९११ साली करण्यात आली, जी जगातल्या सर्वात जुन्या वैद्यकीय संशोधन संस्थांपैकी एक आहे. याचे नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे. ITBRC सार्वजनिक आणि खाजगी संस्थांसोबत कार्य करीत आहे, जे जागेवरच निदान, कमी उपचार प्रक्रिया आणि क्षयरोगासाठी एक प्रभावी लस विकासीत करण्यासाठी देशातील शोध प्रयत्नांचे संचालन करीत आहे.
भारत व मादागास्कर यांच्यात दोन करार झालेत
दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि विमान वाहतूक या क्षेत्रांमध्ये सहकार्य चालविण्यासाठी दोन द्विपक्षीय करार करण्यात आले आहे.
भारतीय राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मादागास्करला कृषी व यांत्रिकीकरण क्षेत्रात विकासासाठी $80 दशलक्षची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपती कोविंद हे मॉरिशस आणि मादागास्कर यांच्या पाच दिवसांच्या दौर्यावर आहेत. मादागास्करला भेट देणारे राष्ट्रपती कोविंद पहिले भारतीय राष्ट्रपती ठरले.
मादागास्कर हा आफ्रिकेमधील एक बेट राष्ट्र आहे आणि आफ्रिकेमधील चौथा सर्वात मोठा देश आहे. अँटानानारिवो ही या देशाची राजधानी आहे आणि देशात मालागासी एरिअरी, मालागासी फ्रँक ही चलने वापरली जातात. मालागासी, फ्रेंच या देशाच्या अधिकृत भाषा आहेत. मादागास्करचे वर्तमान राष्ट्रपती हेरी राजोनरीमंपियानीना हे आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाने इराणसोबतच्या ४ सामंजस्य करारांना मंजूर केले
इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यान १७ फेब्रुवारी २०१८ रोजी पुढील सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.
पारंपारिक औषध प्रणालीच्या क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
दुहेरी कर टाळण्यासाठी करार (DTAA)

प्रथम जागतिक ग्राहक हक्क दिन (WCRD) १९८३ साली साजरा करण्यात आला. या दिनाला अनुसरून भारतात दरवर्षी २४ डिसेंबर या दिवशी ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ साजरा केला जातो. या दिनी सर्व ग्राहकांच्या मूलभूत अधिकारांना प्रोत्साहन देण्यास संधी प्रदान केली जाते.
ICMR ने क्षयरोगासाठी ‘कोचोन पुरस्कार २०१७’ जिंकला
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) याला क्षयरोगाच्या (tuberculosis) उपचारांमध्ये संशोधन व विकास (R&D) यामध्ये प्रयत्नांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय कोचोन पुरस्कार २०१७’ याने सन्मानित करण्यात आले आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) याला क्षयरोगाच्या (tuberculosis) उपचारांमध्ये संशोधन व विकास (R&D) यामध्ये प्रयत्नांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय कोचोन पुरस्कार २०१७’ याने सन्मानित करण्यात आले आहे.
इंडिया टीबी रिसर्च कंसोर्टियम (ITBRC) याच्या स्थापनेसाठी ICMR याला कोरियाच्या कोचोन फाउंडेशन या विना-नफा संस्थेकडून $65,000 रोख पुरस्कार प्राप्त झाला.
कोचोन पुरस्कार अश्या व्यक्तीला आणि/किंवा संस्थेला ‘स्टॉप टीबी’ भागीदारीद्वारे दरवर्षी दिला जातो, ज्यांनी क्षयरोगाशी लढण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. पुरस्काराची २००६ साली स्थापना झाली. हा $ 65,000 रोख पुरस्कार कोरियाच्या कोचोन फाउंडेशनकडून दिला जातो.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) याची स्थापना १९११ साली करण्यात आली, जी जगातल्या सर्वात जुन्या वैद्यकीय संशोधन संस्थांपैकी एक आहे. याचे नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे. ITBRC सार्वजनिक आणि खाजगी संस्थांसोबत कार्य करीत आहे, जे जागेवरच निदान, कमी उपचार प्रक्रिया आणि क्षयरोगासाठी एक प्रभावी लस विकासीत करण्यासाठी देशातील शोध प्रयत्नांचे संचालन करीत आहे.
भारत व मादागास्कर यांच्यात दोन करार झालेत
दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि विमान वाहतूक या क्षेत्रांमध्ये सहकार्य चालविण्यासाठी दोन द्विपक्षीय करार करण्यात आले आहे.
भारतीय राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मादागास्करला कृषी व यांत्रिकीकरण क्षेत्रात विकासासाठी $80 दशलक्षची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपती कोविंद हे मॉरिशस आणि मादागास्कर यांच्या पाच दिवसांच्या दौर्यावर आहेत. मादागास्करला भेट देणारे राष्ट्रपती कोविंद पहिले भारतीय राष्ट्रपती ठरले.
मादागास्कर हा आफ्रिकेमधील एक बेट राष्ट्र आहे आणि आफ्रिकेमधील चौथा सर्वात मोठा देश आहे. अँटानानारिवो ही या देशाची राजधानी आहे आणि देशात मालागासी एरिअरी, मालागासी फ्रँक ही चलने वापरली जातात. मालागासी, फ्रेंच या देशाच्या अधिकृत भाषा आहेत. मादागास्करचे वर्तमान राष्ट्रपती हेरी राजोनरीमंपियानीना हे आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाने इराणसोबतच्या ४ सामंजस्य करारांना मंजूर केले
इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यान १७ फेब्रुवारी २०१८ रोजी पुढील सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.
पारंपारिक औषध प्रणालीच्या क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
दुहेरी कर टाळण्यासाठी करार (DTAA)
कृषी आणि संलग्न क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
आरोग्य आणि औषधी क्षेत्रातल्या सहकार्यासाठी सामंजस्य करार
इराण हा मध्यपूर्वेतील एक देश आहे. इराणचे पूर्वीचे नाव ‘पर्शिया’ असे होते. तेहरान हे या देशाचे राजधानी शहर आहे आणि इराणी रियाल हे चलन आहे. पर्शियन ही देशाची अधिकृत भाषा आहे.