चीन च्या अध्यक्ष पदाच्या तरतुदीमध्ये सुधारणा
चीनने ११ मार्च रोजी ऐतिहासिक निर्णय घेतला. दोनदा अध्यक्षपद भूषविलेले शी जिनपिंग यांचा आजीवन अध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
चीन संसदेच्या वार्षिक सत्राच्या आधीच ‘सीपीसी’ पक्षाने राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षपदासाठी दोन कार्यकाळांची असलेली सीमा हटवण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
वायुदलांचा बहुपक्षीय ‘संवेदना’ सराव १२ मार्च पासून सुरू
केरळच्या तटीय क्षेत्रात १२ मार्च ते १७ मार्च या कालावधीत दक्षिण आशियाई क्षेत्रीय राष्ट्रांसोबत भारतीय वायुदलाचा ‘संवेदना’ नावाचा पहिला मानवतावादी मदत व आपत्ती निवारण (HADR) सराव आयोजित केला गेला आहे.
या बहुपक्षीय अभ्यासात श्रीलंका, बांग्लादेश, नेपाळ आणि संयुक्त अरब अमिरात (UAE) या देशांचा सहभाग आहे. दक्षिण आशियाई क्षेत्रात पहिल्यांदाच असा संयुक्त HADR सराव आयोजित करण्यात आला आहे. हा सराव भारताच्या पश्चिम तटामध्ये सुनामी परिस्थितीवर आधारित आहे.
नवी दिल्लीत प्रथम आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) परिषदेला सुरुवात
नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनमध्ये ११ मार्च २०१८ पासून आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) च्या पहिल्या परिषदेला सुरुवात झाली आहे.
फ्रांसचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रो यांनी परिषदेचे उद्घाटन केले आहे. यामध्ये भारतासह २३ देशांच्या राष्ट्रपतींसोबतच १० मंत्रिस्तरीय प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे.
पॅरिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रान्स यांच्याकडून सुरू करण्यात आलेला एक जागतिक पुढाकार आहे.
तीन दिवस चालणार्या या सरावात ८ देशांच्या नौदलांची ११ जहाजे आणि ९ भारतीय जहाजांचा सहभाग आहे. विविध समुद्री सुरक्षा परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी हा सराव आयोजित करण्यात आला आहे
मानवी अनुवांशिकता क्षेत्रातले प्रसिद्ध जॉन सल्सटन यांचे निधन
मानवी अनुवांशिकता क्षेत्रात प्रसिद्ध शास्त्रज्ञ जॉन सल्सटन यांचे निधन झाले आहे. ते ७५ वर्षांचे होते.
ब्रिटनचे शास्त्रज्ञ जॉन सल्सटन यांनी मानवी अनुवांशिकता शोधून काढण्यामध्ये मदत केली होती. त्यांना आनुवंशिकतावाहक (gene) याच्या आंतरिक संरचनेला नियंत्रित करण्याच्या कार्यासाठी सन २००२ मध्ये नोबेल पुरस्कार प्राप्त झाला.
ऑस्ट्रेलियाने सुल्तान अजलान शाह चषक जिंकला
मलेशियात खेळल्या गेलेल्या ‘२०१८ सुल्तान अजलान शाह चषक’ या हॉकी स्पर्धेत अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा २-१ असा पराभव करत विजेतेपद जिंकले आहे.
या स्पर्धेत भारतीय संघाने पाचव्या क्रमांकावर आपली यात्रा संपवली.
सुल्तान अजलान शाह चषक ही मलेशियात आयोजित केली जाणारी वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरुष हॉकी स्पर्धा आहे. या खेळाची सुरुवात सन १९८३ मध्ये झाली.

चीनच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष पदासाठीचा दोन कार्यकाळांची विशिष्ट मर्यादा हटवली आहे. त्यामुळे सध्याचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा आजीवन राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
चीनच्या संसदेत राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष या दोन पदांसाठी बंधनकारक असलेली मर्यादा दोन तृतीयांश बहुमताने संपवली आहे. सत्ताधारी ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’ (सीपीसी) द्वारे प्रस्तावित सुधारणेस मंजुरी मिळणार हे निश्चितच मानले जात होते.
चीन संसदेच्या वार्षिक सत्राच्या आधीच ‘सीपीसी’ पक्षाने राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षपदासाठी दोन कार्यकाळांची असलेली सीमा हटवण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
दरम्यान, शी जिनपिंग यांचा सध्या दुसरा कार्यकाळ सुरू असून, हा कार्यकाळ २०२३ मध्ये संपणार आहे. या झालेल्या बदलानंतर शी जिनपिंग यांचा आजीवन राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वायुदलांचा बहुपक्षीय ‘संवेदना’ सराव १२ मार्च पासून सुरू
केरळच्या तटीय क्षेत्रात १२ मार्च ते १७ मार्च या कालावधीत दक्षिण आशियाई क्षेत्रीय राष्ट्रांसोबत भारतीय वायुदलाचा ‘संवेदना’ नावाचा पहिला मानवतावादी मदत व आपत्ती निवारण (HADR) सराव आयोजित केला गेला आहे.
या बहुपक्षीय अभ्यासात श्रीलंका, बांग्लादेश, नेपाळ आणि संयुक्त अरब अमिरात (UAE) या देशांचा सहभाग आहे. दक्षिण आशियाई क्षेत्रात पहिल्यांदाच असा संयुक्त HADR सराव आयोजित करण्यात आला आहे. हा सराव भारताच्या पश्चिम तटामध्ये सुनामी परिस्थितीवर आधारित आहे.
नवी दिल्लीत प्रथम आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) परिषदेला सुरुवात
नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनमध्ये ११ मार्च २०१८ पासून आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) च्या पहिल्या परिषदेला सुरुवात झाली आहे.
फ्रांसचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रो यांनी परिषदेचे उद्घाटन केले आहे. यामध्ये भारतासह २३ देशांच्या राष्ट्रपतींसोबतच १० मंत्रिस्तरीय प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे.
पॅरिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रान्स यांच्याकडून सुरू करण्यात आलेला एक जागतिक पुढाकार आहे.
गुडगावमधील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थान (NISE, गवलपहारी) येथे ISA चे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-शासकीय संस्था आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्स राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) ची स्थापना ३० नोव्हेंबर २०१५ रोजी केली.
ISA १२१ सदस्य देशांमधील सौर ऊर्जा प्रकल्पांना उभारण्यासाठी समन्वय साधणारा उपक्रम आहे. आतापर्यंत १९ देशांनी याला स्वीकृती दिली आहे आणि ४८ देशांनी ISA कार्यचौकट करारावर स्वाक्षर्या केल्या आहेत.
‘माइल्स-१८’ प्रथम बहूराष्ट्रीय नौदलांच्या सरावाला सुरुवात
अंदमान समुद्रात १० मार्च २०१८ रोजी ‘माइल्स-१८’ नावाने प्रथम बहूराष्ट्रीय नौदल सरावाला सुरुवात करण्यात आली आहे.
अंदमान समुद्रात १० मार्च २०१८ रोजी ‘माइल्स-१८’ नावाने प्रथम बहूराष्ट्रीय नौदल सरावाला सुरुवात करण्यात आली आहे.
तीन दिवस चालणार्या या सरावात ८ देशांच्या नौदलांची ११ जहाजे आणि ९ भारतीय जहाजांचा सहभाग आहे. विविध समुद्री सुरक्षा परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी हा सराव आयोजित करण्यात आला आहे
मानवी अनुवांशिकता क्षेत्रातले प्रसिद्ध जॉन सल्सटन यांचे निधन
मानवी अनुवांशिकता क्षेत्रात प्रसिद्ध शास्त्रज्ञ जॉन सल्सटन यांचे निधन झाले आहे. ते ७५ वर्षांचे होते.
ब्रिटनचे शास्त्रज्ञ जॉन सल्सटन यांनी मानवी अनुवांशिकता शोधून काढण्यामध्ये मदत केली होती. त्यांना आनुवंशिकतावाहक (gene) याच्या आंतरिक संरचनेला नियंत्रित करण्याच्या कार्यासाठी सन २००२ मध्ये नोबेल पुरस्कार प्राप्त झाला.
त्यांनी औषधी वर्गात ब्रेनर आणि राबर्ट हारवित्झ यांच्यासह नोबेल सामायिक केला. याशिवाय त्यांनी केलेल्या ‘सी. इलेगंस’ या नेमाटोड कृमीच्या अभ्यासातून कर्करोग कसा विकसित होती याविषयी माहिती मिळाली.