चालू घडामोडी १२ फेब्रुवारी २०१८

चालू घडामोडी १२ फेब्रुवारी २०१८

नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय युनानी चिकित्सा परिषद संपन्न
१०-११ फेब्रुवारी २०१८ रोजी नवी दिल्लीत ‘मुख्य प्रवाहात आरोग्य सेवांमध्ये युनानी चिकित्सा प्रणालीचे एकीकरण’ या विषयाखाली आंतरराष्ट्रीय युनानी चिकित्सा परिषद भरविण्यात आली.


युनानी चिकित्सा क्षेत्रातले प्रसिद्ध हकीम अजमल खाँ (जन्म: ११ फेब्रुवारी) यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत केंद्रीय युनानी चिकित्सा संशोधन परिषद (CCRUM) च्या वतीने ही परिषद आयोजित करण्यात आली. 

युनानी चिकित्सा क्षेत्राला उद्योगांशी जोडण्याकरिता संशोधन व विकास प्रक्रियेला चालना देण्यासाठी या परिषदेत विविध विषयांवर चर्चा केली गेली.

या प्रसंगी, बांग्लादेशमध्ये वैद्यकीय क्षेत्रात युनानी प्रणालीला ‘शैक्षणिक’ स्वरूप देण्याकरिता CCRUM आणि हमदर्द विद्यापीठ (बांग्लादेश) यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला.

११ फेब्रुवारी १८६८ ला जन्मलेले प्रसिद्ध हकीम अजमल खाँ यांचा जन्मदिवस भारतात युनानी दिवस म्हणून पाळला जातो. हकीम अजमल खान एक प्रसिद्ध भारतीय युनानी चिकित्सक होते आणि ते युनानी चिकित्सामध्ये वैज्ञानिक शोधाचे संस्थापक होते.



भारतीय पंतप्रधानांच्या हस्ते अबू धाबीत पहिल्या हिंदू धर्माच्या मंदिराचे भूमिपूजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संयुक्त अरब अमिरातची राजधानी अबू धाबीमध्ये हिंदू धर्माशी संबंधित पहिल्या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले आहे.

२०००० चौ. मीटर परिसरात मंदिर दुबई-अबू धाबी महामार्गावर अबू मुरेंखाह येथे उभारले जाणार आहे. मंदिराचे व्यवस्थापन बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (BAPS) यांच्याकडे आहे.


पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांकडून नरेंद्र मोदी यांचा ‘ग्रँड कॉलर’ देऊन सन्मान
पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्रँड कॉलर’ देऊन सन्मान केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या चार देशांच्या दौर्‍यात जॉर्डननंतर पॅलेस्टाईनकडे प्रस्थान केले. भेटी दरम्यान दोन्ही देशांच्या संबंधांना बळकट करण्यासाठी विविध क्षेत्रात करार करण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी पॅलेस्टाईनच्या अधिकृत दौर्‍यावर जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.

पॅलेस्टाईन हा (अधिकृतपणे पॅलेस्टाईन राज्य) मध्य-पूर्व प्रांतातील एक स्वायत्त देश आहे, या देशाची राजधानी जेरुसलेम (पूर्व) शहर असून अरबी ही अधिकृत भाषा आहे. 

देशात इजरायली न्यू शेकेल, इजिप्शियन पाउंड, जॉर्डन दिनार ही चलने वापरली जातात. पॅलेस्टाईनचा ‘ग्रँड कॉलर’ सन्मान हा एखाद्या देशाच्या राज्याला, राज्याचे प्रमुख किंवा अश्याच प्रकारच्या सर्वोच्च पदावर असलेल्या प्रतिष्ठित व्यक्तिला दिला जातो.



दिल्लीत ‘क्लीन एयर’ मोहिमेला सुरुवात
दिल्ली सरकारने १० फेब्रुवारी २०१८ रोजी ‘क्लीन एयर’ मोहिमेला सुरुवात केली आहे.

ही मोहीम २३ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण २ आठवडे चालू राहणार आहे. 

मोहिमेचा भाग म्हणून प्रदूषणाच्या कमी करण्यासाठी प्रदूषणाच्या स्त्रोतांचा अभ्यास करून विज्ञानाच्या आधारे या समस्येला हाताळण्यासाठी कार्य केले जाणार आहे. शिवाय बिगर-शासकीय संस्था, नागरी समाज, नागरिक, शैक्षणिक संस्था आणि संशोधन संस्था यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी प्रयत्न केले जाणार.



गृहमंत्र्यांच्या हस्ते गुजरात विद्यापीठात ‘स्पोकन संस्कृत’ केंद्राचे उद्घाटन
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते गुजरात विद्यापीठात ‘स्पोकन संस्कृत’ अभ्यासक्रमासाठी या प्रकारचे एकमेव अश्या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे.

‘स्पोकन संस्कृत’ हा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम आहे, ज्यादरम्यान संस्कृत भाषा शिकविण्यात येणार आहे.
Scroll to Top