महाराष्ट्रातील १५ महिलांचा राष्ट्रीय गौरव
विविध क्षेत्रांत प्रथम पाऊल टाकत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातील ११३ महिलांचा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे ‘फर्स्ट लेडी पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्रातील १५ महिलांचा समावेश आहे.
राष्ट्रपती भवनात २० जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
समाजातील दमनकारी प्रवृत्तींचा विरोध झुगारून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या, वेगळी वाट चोखाळणाऱ्या महिलांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.
उदयपुरमध्ये १८ व्या ‘अखिल भारतीय व्हीप्स परिषद’ आयोजित
८ जानेवारी २०१८ रोजी राजस्थानच्या उदयपुरमध्ये १८ व्या ‘अखिल भारतीय व्हीप्स परिषद’ ला सुरुवात झाली आहे.
येथील संगणक-नियंत्रित एलईडीज हे इतिहासातील अत्यंत महत्वाकांक्षी कलाकृती दर्शविते. या कलाकृतींमध्ये बीजिंगचे टेम्पल ऑफ हेव्हन, मॉस्कोचे रेड स्क्वेअर आणि बँगकॉकचे बुद्ध मंदिर यांच्या प्रतिकृती उभ्या केलेल्या आहेत
राष्ट्रीय हवामान वेधशाळेने म्हटले आहे की, या भागात तापमान कमालीचे घसरले असून थंड वारे वाहत आहेत. अमेरिकेच्या अनेक भागांत थंडीची लाट पसरली असून त्यात काही जणांचे मृत्यू झाले आहेत. अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली असून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
बर्फ सगळीकडे साचला असून ईशान्येकडे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. ला गार्डिया व केनेडी विमानतळावर वाहतूक बंद करण्यात आली आहे.
उत्तर न्यूयॉर्कमध्ये तापमान इतके कमी आहे की, नायगारा धबधबा गोठला आहे. हा धबधबा अमेरिका व कॅनडाच्या सीमेवर आहे. बॉम्ब चक्रीवादळात तापमान झपाटय़ाने खाली जाते. त्यातून वादळी वारे निर्माण होतात.
WTO चे माजी प्रमुख पीटर स्यूदरलँड यांचे निधन
जागतिक व्यापार संघटना (WTO) चे माजी महासंचालक आणि गोल्डमॅन सॅक्सचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पीटर स्यूदरलँड यांचे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते.
वकीलीचे शिक्षण घेतलेले आयरिश व्यावसायिक आणि राजनैतिक पीटर स्यूदरलँड १९९३ साली स्थापित WTO चे संस्थापक महासंचालक होते आणि २००६ साली आंतरराष्ट्रीय स्थानांतरण याबाबत संयुक्त राष्ट्रसंघाचे दूत म्हणून नेमले गेले होते.
स्टर्लिंग के. ब्राउनने गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला
स्टर्लिंग के. ब्राउनने टीव्ही श्रृंखलेच्या नाट्य (Drama) श्रेणीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकणारा पहिला आफ्रिकी-अमेरिकी नागरिक बनला.
NBC च्या ‘धिस इज अस’ या टीव्ही मालिकेत रॅनडन पिर्यसनच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार दिला गेला आहे. वर्ष १९८८ नंतर ‘नाट्य’ मालिका श्रेणीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा पहिला अभिनेता ठरला.

या दोन दिवसीय परिषदेत संसद व राज्य विधानसभांचे व्हिप व विविध राज्य विधानसभांचे, मंत्रालयाचे प्रभावी शासन यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.
व्हिप हा कोणत्याही राजकीय दलाच्या संसदीय भागाचा एक महत्त्वपूर्ण सदस्य असतो, ज्यांची संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये ‘सभागृहांच्या आत पक्ष व्यवस्थापन’ यामध्ये केंद्रीय भूमिका असते आणि ते पक्षामध्ये आंतरिक शिस्त राखण्यासाठी जबाबदार असतात.
त्यांचे मुख्य कार्य म्हणजे हे सुनिश्चित करणे की संसद व राज्य विधानसभांमध्ये पक्ष सदस्य महत्त्वपूर्ण विषयांवर पक्षाच्या अधिकृत धोरणाच्या अनुरूप मतदान करावे व महत्त्वपूर्ण संधींवर मतदानाच्या हेतूने उपस्थित राहणे.
संसदीय प्रथेमध्ये व्हिपची महत्त्व १९५२ साली पहिल्या लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रथम वर्षात आयोजित प्रथम अखिल भारतीय व्हिप परिषदेत रेखांकित केले गेले होते.
जगातील सर्वात मोठ्या आईस फेस्टिवलला सुरवात
जगातील सर्वात मोठ्या आईस फेस्टिवलला उत्तरपूर्व चीनच्या हार्बिन शहरात सुरवात झाली आहे. येत्या महिन्यात हजारो पर्यटकांना हे फेस्टिवल आकर्षित करण्याची अपेक्षा केली जात आहे.

या ३४ व्या हार्बिन इंटरनॅशनल आईस अँड स्नो स्कल्पचर फेस्टिवलची सुरवात ५ जानेवारी ला झाली आहे. हे फेस्टिवल फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत चालणार आहे. १५ आणि २३ फेब्रुवारीच्या दरम्यान चिनी नववर्षाच्या उत्सवात पर्यटक संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
येथील संगणक-नियंत्रित एलईडीज हे इतिहासातील अत्यंत महत्वाकांक्षी कलाकृती दर्शविते. या कलाकृतींमध्ये बीजिंगचे टेम्पल ऑफ हेव्हन, मॉस्कोचे रेड स्क्वेअर आणि बँगकॉकचे बुद्ध मंदिर यांच्या प्रतिकृती उभ्या केलेल्या आहेत
बॉम्ब नामक वादळाने नायगारा गोठला
अमेरिकेत बॉम्ब नावाच्या चक्रीवादळाने पूर्व किनाऱ्याला फटका दिला असून तेथे मोठय़ा प्रमाणात हिमवृष्टी झाली तर गोठवणारी थंडी पडली आहे. त्यामुळे या भागात प्रवास करणे अशक्य बनले आहे. या वादळात आतापर्यंत आग्नेयेकडील उत्तर व दक्षिण कॅलिफोर्नियात चार जण मरण पावले असून बर्फाळ रस्त्यावर वाहने चालवणे अशक्य बनले आहे.
अमेरिकेत बॉम्ब नावाच्या चक्रीवादळाने पूर्व किनाऱ्याला फटका दिला असून तेथे मोठय़ा प्रमाणात हिमवृष्टी झाली तर गोठवणारी थंडी पडली आहे. त्यामुळे या भागात प्रवास करणे अशक्य बनले आहे. या वादळात आतापर्यंत आग्नेयेकडील उत्तर व दक्षिण कॅलिफोर्नियात चार जण मरण पावले असून बर्फाळ रस्त्यावर वाहने चालवणे अशक्य बनले आहे.
राष्ट्रीय हवामान वेधशाळेने म्हटले आहे की, या भागात तापमान कमालीचे घसरले असून थंड वारे वाहत आहेत. अमेरिकेच्या अनेक भागांत थंडीची लाट पसरली असून त्यात काही जणांचे मृत्यू झाले आहेत. अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली असून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
बर्फ सगळीकडे साचला असून ईशान्येकडे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. ला गार्डिया व केनेडी विमानतळावर वाहतूक बंद करण्यात आली आहे.
उत्तर न्यूयॉर्कमध्ये तापमान इतके कमी आहे की, नायगारा धबधबा गोठला आहे. हा धबधबा अमेरिका व कॅनडाच्या सीमेवर आहे. बॉम्ब चक्रीवादळात तापमान झपाटय़ाने खाली जाते. त्यातून वादळी वारे निर्माण होतात.
WTO चे माजी प्रमुख पीटर स्यूदरलँड यांचे निधन
जागतिक व्यापार संघटना (WTO) चे माजी महासंचालक आणि गोल्डमॅन सॅक्सचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पीटर स्यूदरलँड यांचे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते.
वकीलीचे शिक्षण घेतलेले आयरिश व्यावसायिक आणि राजनैतिक पीटर स्यूदरलँड १९९३ साली स्थापित WTO चे संस्थापक महासंचालक होते आणि २००६ साली आंतरराष्ट्रीय स्थानांतरण याबाबत संयुक्त राष्ट्रसंघाचे दूत म्हणून नेमले गेले होते.
स्यूदरलँड यांनी ८० च्या दशकात आयरलँडचे यूरोपीय संघ आयुक्त आणि महाधिवक्ता म्हणून सेवा दिलेली होती.
स्टर्लिंग के. ब्राउनने गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला
स्टर्लिंग के. ब्राउनने टीव्ही श्रृंखलेच्या नाट्य (Drama) श्रेणीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकणारा पहिला आफ्रिकी-अमेरिकी नागरिक बनला.
NBC च्या ‘धिस इज अस’ या टीव्ही मालिकेत रॅनडन पिर्यसनच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार दिला गेला आहे. वर्ष १९८८ नंतर ‘नाट्य’ मालिका श्रेणीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा पहिला अभिनेता ठरला.
या भूमिकेसाठी ब्राउनला यापूर्वीही एमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे.