चालू घडामोडी २ जानेवारी २०१८

चालू घडामोडी २ जानेवारी २०१८

विजय गोखले हे देशाचे नवे पराराष्ट्र सचिव 
चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केलेले आणि महाराष्ट्राचे सुपुत्र विजय केशव गोखले हे आता देशाचे नवे परराष्ट्र सचिव असणार आहेत. विजय केशव गोखले यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती झाल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे.


सध्याचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांचा कार्यकाळ २८ जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे या पदावर विजय केशव गोखले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांसाठी ते भारताचे परराष्ट्र सचिव असतील.

चीन आणि भारत यांच्यात निर्माण झालेला डोकलाम वाद सोडवण्यात विजय केशव गोखलेंनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. 

ते १९८१ च्या बॅचचे ते आयएफएस अधिकारी आहेत. सध्या ते परराष्ट्र मंत्रालायाच्या आर्थिक संबंधांचे सचिव म्हणून काम करत आहेत. मात्र त्यांनी जर्मनीतही भारताचे राजदूत म्हणून काम केले आहे. तसेच हाँगकाँग, चीन आणि अमेरिका या देशांमध्येही त्यांनी काम केले आहे. 



विनय सहस्त्रबुद्धे ICCR चे नवे अध्यक्ष 
विनय सहस्त्रबुद्धे यांची राष्ट्रपतींकडून ‘भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR)’ चे नवे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ही नेमणूक लोकेश चंद्र यांच्या जागेवर केली गेली आहे.

विनय सहस्रबुद्धे हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्रमधून राज्यसभा सदस्य आहेत. सहस्त्रबुद्धे हे रामभाऊ म्हल्गी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष आहेत. 

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) ची १९५० साली भारताचे प्रथम शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी स्थापना केली आणि ते पहिले अध्यक्ष देखील होते. 

भारताचे बाह्य सांस्कृतिक संबंधांशी संबंधित धोरणे आणि कार्यक्रमांच्या सुसूत्रीकरणामध्ये आणि अंमलबजावणीमध्ये सक्रिय सहभाग घेणे हे ICCR चे उद्दिष्ट आहे.



गोल्फपटू शिव कपूरने ‘रॉयल चषक’ जिंकले
भारतीय गोल्फपटू शिव कपूर याने वर्षाच्या अखेरचे ‘रॉयल चषक’ जिंकले. हा त्याचा या वर्षातला तिसरा आशियाई टूर किताब आहे.

थायलंडमध्ये पट्टया येथे आयोजित स्पर्धेत कपूरने थायलंडच्या प्रोम मीसावातला मागे टाकले. तर तिसर्‍या स्थानी भारतीय गगनजीत भुल्लर हा खेळाडू होता.


सर्वाधिक उंच बुर्ज खलिफाला पुर्णपणे प्रकाशमान करण्याचा नवा विश्वविक्रम
दुबईतल्या जगातल्या सर्वाधिक उंच बुर्ज खलिफा या इमारतीला पुर्णपणे प्रकाशमान करण्याचा नवा विश्वविक्रम करण्यात आला आहे.

२०१८ या वर्षाला चिन्हांकित करण्यासाठी, UAE ने त्याच्या ‘#लाइटअप 2018’ मोहिमेचा भाग म्हणून, बुर्ज खलिफाला संपूर्णपणे लेजर दिव्यांनी सजवले गेले आणि नव्या वर्षाच्या सुरूवातीला प्रकाशमान केले गेले.


बुर्ज खलिफा संयुक्त अरब अमीरातची राजधानी दुबईमध्ये ८२८ मीटर उंच १६८ मजली इमारत आहे. ही जगातली सर्वात उंच इमारत असून त्याचे लोकार्पण ४ जानेवारी २०१० रोजी केले गेले. यामध्ये बसविण्यात आलेली लिफ्ट जगातली सर्वात वेगाने चालणारी लिफ्ट आहे.



चीनमध्ये जगातला दूसरा ‘सोलर एक्सप्रेस-वे’ तयार
चीनने देशातला पहिला आणि जगातला दूसरा ‘सोलर एक्सप्रेस-वे’ तयार केला आहे. पूर्व शडोंग प्रांताची राजधानी जिनानमध्ये एक किलोमीटर लांबीच्या या सौर महामार्गाची यशस्वी चाचणी घेतली.

रस्त्याच्या खाली सोलर पटलांना प्रस्थापित केले गेले आहे आणि रस्त्याची पातळी पारदर्शी बनविण्यात आलेली आहे. ५८७५ चौ. मीटर क्षेत्रात पसरलेल्या सौर पटलांमुळे वर्षाला १ दशलक्ष KWh ऊर्जा निर्मिती होऊ शकणार.

फ्रान्सने २०१६ साली जगातला सर्वात पहिला फोटोव्होल्टाईक रस्ता तयार केला होता.



WHO ने मानसिक आरोग्य स्थिती म्हणून ‘गेमिंग विकार’ ला वर्गीकृत केले
ऑनलाइन असो वा ऑफलाइन असो अत्यधिक व्हिडियो गेमिंगच्या आहारी जाणे हे WHO कडून मानसिक विकार असल्याचे परिभाषित करण्यात आले आहे.

वर्ष २०१८ मध्ये जागतिक आरोग्य संघटना (WHO) मानसिक आरोग्य स्थितीच्या आपल्या सूचित गेमिंग विकाराला वर्गीकृत करणार आहे.

गेमिंग विकाराने जवळजवळ ७% लोकसंख्या ग्रस्त आहे आणि ते उदासीनता आणि काळजीचे लक्षण आणि शारिरीक व वर्तणुकीत बदल आणि झोप न लागणे ही लक्षणे प्रदर्शित करते.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संबंधित संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संघटना आहे. ७ एप्रिल १९४८ रोजी स्थापित WHO चे जिनेव्हा (स्वित्झर्लंड) मध्ये मुख्यालय आहे. 

WHO हा संयुक्त राष्ट्रसंघ विकास गटाचा सदस्य आहे. ही आरोग्य संघटना पूर्वी ‘एजन्सी ऑफ द लीग ऑफ नेशन्स’ म्हणून ओळखली जात होती.
Scroll to Top