नवीन आर्थिक धोरण, १९९१

नवीन आर्थिक धोरण, १९९१

हे धोरण १९९१ साली लागू करण्यात आले होते. भारताचे माजी पंतप्रधान व अर्थतज्ञ डॉ.मनमोहन सिंग या आर्थिक धोरणाचे प्रणेते मानले जातात.


या धोरणाचाच LPG मॉडेल असे म्हटले जाते. याचे विस्तृत रूप Liberalization, Privatization, Globalization असे होते. याचाच अर्थ उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकरण असे होते.
उदारीकरण
उदारीकरणाची व्याप्ती आणि फायदे.भांडवल –
भारत सरकार FDI ला टप्प्याटप्याने मान्यता देत आहे. त्यामुळे भारतातील भांडवलाचा प्रश्न नाहीसा होतो, उत्पादनात वाढ होत आहे. 

वित्तपुरवठा – 
बँक क्षेत्रात सुधारणा करून बैंक व्यवसायात स्पर्धा निर्माण करण्यात आली आहे. तसेच बँकांना स्वयंनिर्णयाचे व नफ्याचे धोरण ठरविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. 

उद्योगधंदे – 
औद्योगिक क्षेत्रातील परवाना पद्धत रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योगधंद्याच्या वाढीस चालना मिळाली आहे.

व्यापार –
व्यापारास प्रोत्साहन मिळावे यासाठी सोपी व पोषक कर संरचना तसेच आयात निर्यात धोरण ठरविण्यात आले.

कृषी क्षेत्र – 

कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास चालना मिळाली आहे.

सार्वजनिक क्षेत्र – 

सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक कमी झाल्याने सरकारला हा निधी इतर विकासकामांवर खर्च करता येऊ लागला आहे.

सेवाक्षेत्र – 
सेवाक्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणुकीला चालना मिळाली आहे.



खाजगीकरणसार्वजनिक क्षेत्राचे खाजगी क्षेत्रात पूर्णतःकिंवा अंशत परिवर्तन करणे होये.

या अंतर्गत शासन प्रक्रिया उद्योगांचे सार्वजनिक क्षेत्राकडून खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरण करते.


सार्वजनिक क्षेत्रासाठीच राखीव असलेल्या उद्योगातून शासनाने आपला मालकी हक्क (भांडवल)काढून घेऊन त्यात खाजगी क्षेत्राला गुंतवणुकीची परवानगी देणे किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या खाजगी क्षेत्राला सरळ विकून टाकणे.

भारतात सार्वजनिक क्षेत्रातील उणिवा व त्रुटी यांवर मात करण्यासाठी तसेच उपलब्ध साधन सामग्रीचा कार्यक्षम आणि काटेकोर वापर करण्यासाठी खाजगीकरणाच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाद्वारे सामान्यजनांना भाग भांडवल (शेअर्स) विकण्याच्या प्रक्रियेस निर्गुंतवणूकीकरण असे म्हणतात.


खाजगीकरणाचे फायदे

०१. कार्यक्षमता व कामगिरी यांमध्ये सुधारणा
०२. जबाबदारीची निश्चितीकरण भांडवल बाजारात शिस्तीचे पालन.
०३. राजकीय हस्तक्षेपाचा अभाव
०४. नियोजनात यश
०५. त्वरित प्रतिसाद 

खाजगीकरणाचे तोटे 
०१. व्यवहारात पारदर्शकतेचा अभाव
०२. राजकीय दूरदृष्टीचा अभाव
०३. नफा मिळवणे हा उद्देश
०४. समाजहितावर प्रतिकूल परिणाम
०५. आवश्यक वस्तूंचे उत्पादन कमी
०६. चैनीच्या वस्तूच्या उत्पादनात वाढ
०७. बेरोजगारीत वाढ.



जागतिकीकरण
देशाच्या भौगोलिक सीमा क्षेत्राबाहेर होणारा आर्थिक क्रियांचा विकास व विस्तार म्हणजे जागतिकीकरण होय.

ही एक प्रक्रिया आहे. ज्यामध्ये जगातील देशांत आर्थिक एकात्मता आणि परस्पर अवलंबित वाढते.

त्याचप्रमाणे या प्रक्रियेत देशाच्या सीमा क्षेत्राबाहेर भांडवल वस्तू,उद्योजक व्यवसायिक व कामगार इत्यादींची मुक्त येजा सुरु होते.

थोडक्यात, राष्ट्रीय अर्थव्यवस्थांचे जागतिक अर्थव्यवस्थेत परिवर्तनाची प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय.

जागतिकीकरणाचे दोन मुख्य घटक आहे.

०१. बाजारपेठांचे जागतिकीकरण
०२. उत्पादनांचे जागतिकीकरण 

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते,जागतिक पातळीवर देशांचे पुढील प्रकारे आर्थिक परस्परावलंबन वाढणे म्हणजे जागतिकीकरण होय.

०१. देशाच्या सीमा क्षेत्राबाहेर होणाऱ्या वस्तू आणि सेवा व्यवहारांचे संकेत आणि प्रकारात वाढ होणे.
०२. आंतरराष्ट्रीय भांडवल प्रवाहाचा विस्तार आणि तंत्रज्ञानाचा जलद व मोठ्या प्रमाणात प्रसार.


जागतिकीकरणाचे वैशिष्ट्ये
०१. व्यापाराचा संपूर्ण जगात विकास व विस्तार
०२. देशांतर्गत बाजार व विदेशी बाजार यात भेदभाव करण्याचे टाळणे.
०३. संपूर्ण जगात उत्पादन व वितरणाच्या सुविधा प्रस्थापित करणे.
०४. जागतिक बाजाराचा विचार करून उत्पादनाचे नियोजन व विकास करणे.
०५. बहुराष्ट्रीय कंपन्या व त्यांची गुंतवणूक यांमध्ये तीव्र गतीत वाढ करणे.
०६. कच्चा माल,यंत्रे,वित्त,तांत्रिक ज्ञान,मानवी साधन सामग्री व व्यवस्थापकीय कौशल्य इत्यादीचे जागतिक पातळीवर संतुलन करणे.
Scroll to Top