पहिली पंचवार्षिक योजना
उपाध्यक्ष : गुलजारीलाल नंदा
प्रतिमान : हेरॉल्ड डोमर
योजना कालावधी : १ एप्रिल १९५१ ते ३१ मार्च १९५६ पर्यंत
विकासदर उद्दिष्ट : २.१% ( ५ वर्षात – १०.५%)
वैशिष्ट्ये
त्यामुळे शेती, जलसिंचन व ऊर्जा (४५%) यावर या योजनेत प्राधान्य देण्यात आले होते. या काळात मान्सून अनुकूल होतात.
१९५४ मध्ये आवडी येथे झालेल्या अधिवेशनात समाजवादी समाज रचनेचा स्विकार करण्यात आला.
सुरुवातीस २०६९ कोटी रु. इतकी रक्कम मंजुर केली होती. त्यात वाढ करून नियोजित प्रस्तावित खर्च २३७८ कोटी इतका केला होता. मात्र वास्तविक १९६० कोटी खर्च झाला.
योजनेचा परिणाम
अन्न धान्य उत्पादनात ४% (५ वर्षात – २०%) झाली. अन्नधान्याचे उत्पादन ५२.२ दशलक्ष टनावरून ६५.८ दशलक्ष टनापर्यंत वाढले.
औद्योगिक उत्पादनात ८% (५ वर्षात – ४०%) वाढ झाली.
मोठ्या प्रमाणावर जलसिंचन व ऊर्जेचा पायाभूत सोयींना सुरवात.
राष्ट्रीय उत्पन्न १८% नी तर दरडोई उत्पन्न ११% नी वाढले. या योजनेचे विशेष म्हणजे या योजनेदरम्यान किंमत निर्देशांक १३% ने कमी झाला. पहिल्या योजनेत वस्तुंच्या किंमती २२% कमी झाल्या होत्या.
योजना सर्व बाबतीत यशस्वी झाली कारण, योजनेचा कालावधी मान्सूनला अनुकूल होता, योजनेची लक्षे कमी होती.
महत्वाचे प्रकल्प
०२. १९५१ – चित्तरंजन (पश्चिम बंगाल) येथे रेल्वेचा कारखाना सुरु करण्यात आला
०३. १९५२ – कोयना प्रकल्प (हेलवाड, ता. पाटण, जि. सातारा, महाराष्ट्र)
०४. १९५३ – HMT(बंगलोर)
०५. १९५४ – कोसी योजना (बिहार)
०६. १९५४ – पेरांबुर (तामिळनाडू) येथे रेल्वेचा कारखाना सुरु करण्यात आला.
०७. १९५४ – हिंदुस्थान अँटीबायोटिक्स, पिंपरी पुणे येथे स्थापन
०८. १९५५ – दामोदर खोरे विकास योजना. (झारखंड आणि पश्चिम बंगाल)
०९. १९५५ – भाक्रा नांगल प्रकल्प (सतलज नदी) (हिमाचल प्रदेश व पंजाब)
१०. १९५५ – नेपानगर (मध्य प्रदेश) वृत्तपात्र कागदनिर्मितीचा कारखाना
११. टेलिफोन इंडस्ट्रिज
१२. हिराकुड प्रकल्प (ओरिसा) महानदीवर
विशेष घटनाक्रम
८ मे, १९५२ पासून ओद्योगिक विकास व नियमन अधिवेशन १९५१ लागू करण्यात आला.
२ ऑक्टोबर १९५२ रोजी सामुदायिक विकास कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करण्यात आली.
२ ऑक्टोबर १९५२ रोजी राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमाला सुरुवात झाली. परंतु १९६१ नंतर या कार्यक्रमाची गती वाढली.
हातमाग उद्योगाचा विकास करण्यासाठी २ ऑक्टोबर १९५२ रोजी अखिल भारतील हातमाग बोर्डची स्थापना करण्यात आली.
१९५३ मध्ये अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग बोर्डाची स्थापना करण्यात आली
१९५४ साली राज्य कामगार विमा योजना सुरु झाली
१९५५ कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम सुरु झाला
१जुलै १९५५ रोजी अखिल भारतीय ग्रामीण पतपाहणी समितीच्या शिफारसीनुसार(गोरवाल समिती) एम्पिरियल बँकेचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्येकरण्यात आले.
योजनेतील खर्चकृषी अनुषंगिक ३१% (शेती १५% व सिंचन १६%)वाहतूक व दळणवळण २७%सामाजिक सेवा २२%ऊर्जा १२%उद्योग ६%