भारतातील सध्याचे राज्यपाल (२७ मे २०१७)

भारतातील सध्याचे राज्यपाल (२७ मे २०१७)

भारतातील सध्याचे राज्यपाल (२७ मे २०१७

०१. भारताच्या संविधानानुसार राज्यपाल हा राज्यप्रमुख असून त्याचे अधिकार औपचारिक स्वरूपाचे असतात. राज्य सरकारच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी मुख्यमंत्री व त्याच्या मंत्रीमंडळावर असते.
०२. राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर राज्यपाल सर्वाधिक जागा मिळालेल्या राजकीय पक्षाला सरकार बनवण्यासाठी आमंत्रित करतो. हा सत्ताधारी पक्ष आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करतो.मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ साधारणपणे ५ वर्षांचा असून ह्यादरम्यान सत्ताधारी पक्ष कधीही मुख्यमंत्री बदलू शकतो.

०३. राज्यपाल पदासाठी विशिष्ट असा कार्यकाळ नाही. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल त्या पदावर राहू शकतो. राज्यपाल हे पद फक्त घटकराज्यांसाठीच असते. केंद्रशासित प्रदेशांसाठी नायब राज्यपाल किंवा प्रशासकाची तरतूद करण्यात आलेली आहे.

०४. १९८५ पासून पंजाबचे राज्यपाल चंदीगडचे प्रशासक म्हणून कार्य पाहतात.

०५. दादरा व नगर हवेली, दमण व दीव आणि लक्षद्वीप यांचे प्रशासक हे भारतीय प्रशासकीय सेवेतील पदाधिकारी असतात.

घटकराज्यांचे राज्यपाल

राज्याचे नावराज्यपालांचे नाव
आंध्र प्रदेशइ.एस.एल. नरसिम्हन
अरुणाचल प्रदेशपद्मनाभ आचार्य
आसामबनवारीलाल पुरोहित
बिहारराम नाथ कोविंद
छत्तीसगडबलराम दास टंडन
गोवामृदुला सिन्हा
गुजरातओम प्रकाश कोहली
हरियाणाकप्तान सिंग सोळंकी
हिमाचल प्रदेशआचार्य देव व्रत
जम्मू आणि काश्मीरनरेंद्र नाथ व्होरा
झारखंडद्रौपदि मुरमु
कर्नाटकवजुभाई वाला
केरळपी. सताशिवम
मध्यप्रदेशओम प्रकाश कोहली
महाराष्ट्रसी. विद्यासागर राव
मणिपूरनजमा हेपतुल्ला
मेघालयबनवारीलाल पुरोहित
मिझोरामनिर्भय शर्मा
नागालँडपद्मनाभ आचार्य
ओडिशाएस.सी. जमीर
पंजाबव्ही.पी. सिंग बदनोरे
राजस्थानकल्याण सिंग
सिक्कीमश्रीनिवास पाटील
तामिळनाडूसी. विद्यासागर राव
तेलंगणाइ.एस.एल. नरसिम्हन
त्रिपुरातथागत रॉय
उत्तर प्रदेशराम नाईक
उत्तराखंडकृष्णकांत पॉल
पश्चिम बंगालकेशरी नाथ त्रिपाठी

केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल व प्रशासक

केंद्रशासित प्रदेशनायब राज्यपाल / प्रशासक
अंदमान व निकोबारजगदीश मुखी (नायब राज्यपाल)
चंदीगडव्ही.पी. सिंग बदनोरे (प्रशासक)
दादरा व नगर हवेलीप्रफुल खोडा पटेल (प्रशासक)
दमण व दीवप्रफुल खोडा पटेल (प्रशासक)
दिल्लीअनिल बैजल (नायब राज्यपाल)
लक्षद्वीपफारूक खान (प्रशासक)
पुडुचेरीकिरण बेदी (नायब राज्यपाल)

 

Scroll to Top