मानव विकास निर्देशांक
संयुक्त राष्ट्राने मानवी विकासाची व्याख्या ‘लोकांच्या निवडींच्या विस्ताराची प्रक्रिया’ (Process of enlarging people’s choices) अशी केली आहे.
मानवी विकासाच्या सर्वात महत्वाच्या घटकांमध्ये दीर्घ व आरोग्यवान जीवन, शिक्षण व उत्तम राहिणीमानाचा दर्जा, यांचा समावेश होतो.
या अत्यावश्यक निवडी (essential choices) आहत, कारण त्यांच्या अभावी अनेक संधीपासून वंचित रहावे लागू शकते, यावरून, मानवी विकास ही लोकांच्या निवडींच्या विस्ताराच्या प्रक्रियेबरोबरच सुस्थिती उंचवण्याचीही प्रक्रिया आहे.
म्हणून, विकास लोकांभोवती रचला पाहिजे, लोक विकासाच्या भोवती नाही. तसेच विकास हा सहभागायुक्त (participatory) असावा, आणि त्यासाठी लोकांना आपल्या क्षमातांमध्ये (आरोग्य, शिक्षण व प्रशिक्षणविषयक) सुधारणा करण्यासाठी गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध असाव्या.
तसेच लोकांना आपल्या क्षमता वापरण्याच्याही संधी उपलब्ध असाव्या, त्यासाठी सामुदायिक निर्णयांमध्ये (community decisions) पूर्ण सहभाग घेता यावा आणि तसेच मानवी, आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्याचा लाभ प्राप्त व्हावा.
आर्थिक वृद्धी व मानवी विकास या संकल्पनांमध्ये मूलभूत फरक असा आहे की, आर्थिक वृद्धिमध्ये केवळ राष्ट्रीय उत्पन्न वाढीवर भर दिला जातो, मात्र मानवी विकासात मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा-आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय समावेश केला जातो.
अर्थात, मानवी विकास घडून येण्यासाठी आर्थिक वृद्धी गरजेची असतेच, मात्र वेगळ्या दृष्टीकोनातून त्यामागील तत्व असे आहे की, मानवी निवडींच्या विस्तारासाठी राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा उत्पन्नाचा वापर (use of income and not income itself) अधिक निर्णायक ठरत असतो.
विकासाचे आर्थिक निर्देशक (Economic indicators)
राष्ट्रीय उत्पाद व उत्पन्न
दर डोई उत्पन्न
उत्पन्न व संपत्तीची समानता/ विषमता
दारिद्रयाचा स्तर
विकासाचे सामाजिक निर्देशक (Social indicators)
शिक्षणविषयक निर्देशक
आरोग्यविषयक निर्देशक
लोकसंख्येच्या वाढीचा दर
लिंगविषयक विकास निर्देशक
जागतिक स्तरावरील विकासाचे निर्देशांक
यु.एन.डी.पी. मार्फत दरवर्षी ‘मानव विकास अहवाल’ (Human Development Report) जाहीर केला जातो. या अहवालात विविध देशांसाठी पुढील 4 प्रमुख निर्देशांकांची गणना केली जाते.
०२. असमानता-समायोजित मानव विकास निर्देशांक,
०३. जेंडर असमानता निर्देशांक, आणि
०४. बहुआयामी दारिद्रय निर्देशांक
मानव विकास निर्देशांक
(Human Development Index: HDI)
त्यामागील प्रेरणा पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब-उल-हक आणि अमर्त्य सेन यांची होती. महबूब-उल-हक यांना ‘मानव विकास निर्देशांकाचे जनक’ म्हणून संबोधले जाते.
२०१० मध्ये हा निर्देशांक ज्या घटकांवरून काढला जातो, त्यात बदल करण्यात आला. त्यानुसार, मानव विकास निर्देशांक पुढील तीन निकष (dimensions) व त्यांच्याशी संबंधित चार निर्देशक (indicators) यांवरून काढला जातो.
आरोग्य (Health)
शिक्षण (Education)
०२. १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांची अपेक्षित शालेय वर्षे (Expected years of schooling). शिक्षणाचा निर्देशांक या दोन्ही निर्देशकांचा भूमितीय मध्य असतो.
जीवनमानाचा दर्जा (Living Standards)
प्रथम वरील चार निर्देशांकासाठी किमान व कमाल मूल्ये ठरविली जातात.
२०११ च्या मानव विकास अहवालनुसार भारताचा मानव विकास निर्देशांक ०.५७० इतका होता. १८७ देशांच्या सूचीमध्ये भारताचा क्रमांक १३४ व होता.
प्रथम क्रमांकावर नॉर्वे (०.९४३), तर शेवटच्या क्रमांकावर कॉगो (०.२८६) होता.
भारताची गणना मध्यम मानव विकास (medium human development) गटात करण्यात आली.
असमानता-समायोजित मानव विकास निर्देशांक
(In-equalitiy adjusted Human Development Index: IHDI)
२०१० च्या अहवालात हा निर्देशांक लागू करण्यात आला. हा निर्देशांक मानव विकास निर्देशांकाप्रमाणेच काढला जातो.
मानव विकास निर्देशांक काढतांना प्रत्येक निर्देशकाचे सरासरी मूल्य धरले जात असते. मात्र लोकसंखेमध्ये त्याबाबतीत मोठी असमानता असते. त्यामुळे IHDI काढतांना ही असमानता समयोजित (adjust) केली जाते.
देशात चारही निर्देशकांच्या बाबत पूर्ण समानता असेल तर HDI आणि IHDI समान येतील. मात्र IHDI चे मूल्य HDI पेक्षा जसजसे कमी होईल तशी असमानता वाढत जाईल.
लैंगिक असमानता निर्देशांक
(Gender Inequality Index: GII)
हा निर्देशांक २०१० च्या अहवालात लागू करण्यात आला. त्याने १९९५ पासून लागू करण्यात आलेल्या लिंग-आधारित विकास निर्देशांक (GDI) व लिंग सबळीकरण परिमाण (GEM) यांची जागा घेतली आहे.
हा निर्देशांक 3 निकष व 5 निर्देशांकांच्या आधारे काढला जातो.जनन आरोग्य (Reproductive health)
ते मोजण्यासाठी पुढील निर्देशक वापरले जातात
०१. माता मर्त्यता (Maternal mortality)
०२. किशोरवयीन जन्यता (Adolescent fertility)
सबळीकरण (Empowerment)त्याचे प्रमाण मोजण्यासाठी पुढील निर्देशक वापरले जातात
०१. संसदीय प्रतिनिधित्व (Parliamentary representation)
०२. शैक्षणिक स्तर (Educational attainment) माध्यमिक व वरील स्तरावरील
०३. श्रम बाजार (Labour market) : त्याचे प्रमाण श्रम शक्तीतील सहभागावरून मोजले जाते.
बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (Multi-Dimensional Poverty Index: MPI) :
या निर्देशांकाची सुरुवात यु.एन.डी.पी. आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी मिळून जुलै २०१० मध्ये केली. या निर्देशांकाने १९९७ पासून लागू करण्यात आलेल्या मानवी दारिद्र्य निर्देशांकांची (HPI) जागा घेतली.
विकासाप्रमाणेच दारिद्र्य सुद्धा बहुआयामी (multi-dimensional) असते. हेडलाईन आकडे दरिद्रयाचा बहुआयामीपणा दडवून ठेवतात.
त्यामुळे या निर्देशांकाची रचना HDI च्या तिन्ही निकषांच्या बाबतीत आढळणारी बहुवंचितता (multiple deprivations) ओळखण्यासाठी करण्यात आली आहे.
हा निर्देशांक 3 निकष व 10 निर्देशकांच्या सहाय्याने काढला जातो.
आरोग्य (Education)
त्याचा स्तर मोजण्यासाठी
०१. पोषण
०२. बाल मर्त्यता
शिक्षण (Education)
त्याचा स्तर मोजण्यासाठी
०१. शालेय वर्षे
०२. बालक पटसंख्या
जीवनमान दर्जा (Living Standards)
त्याचा स्तर मोजण्यासाठी
०१. मालमत्ता
०२. वीज
०३. पाणी
०४. स्वच्छतागृह
०५. स्वयंपाकाचे इंधन
०६. जमीन (अस्वच्छ जमीनीवरील जगणे)