हा संसर्गजन्य आजार असून तो ‘मायक्रोबॅक्टेरियम’ ट्युबरक्युलोसिंस’ या जिवाणूमुळे होतो. या जिवाणूचा शोध ‘सर रॉबर्ड कॉक’ यांनी २४ मार्च १८८२ रोजी लावला म्हणून ‘कॉक्स इन्फेक्शन’ असेही म्हणतात.
क्षयरोगचा प्रसार हवेमार्फत (रुग्णाच्या खोकण्याने, शिकण्याने) होतो. क्षयरोगाचे जंतू मुख्यतः फुप्फुसावर परिणाम करतात म्हणून फुप्फुसाच्या क्षयरोगाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
क्षयरोगाचे प्रकार –
०१. फुप्फुसाचा
०२. इतर अवयवांचा (ग्रंथी, हाडे/सांधे, मूत्रपिंड, मेंदूआवरण, आतड्यांचा, कातडीचा इ.)
क्षयरोगाची लक्षणे
तीन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला,
हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप
वजन कमी होणे
थुंकीतून रक्त पडणे
भूक मंदावणे इ.
क्षयरोगाचे निदान
लहान मुलांमधील क्षयरोग निदानासाठी ‘मोन्टोक्स टेस्ट’ वापरली जाते.
०१. थुंकी तपासणी (बेडका) : सर्वात खात्रीशीर, कमी खर्चाची पद्धत. संशयित रुग्णाच्या थुंकीचे तीन नमुने तपासण्यात येतात.
०२. ‘क्ष-किरण’ तपासणी (X-Ray) : छातीचा एक्स-रे काढून करतात. वरील तपासणीपेक्षा कमी खात्रीशीर. विशिष्ट तज्ञांची आवश्यकता असते.
०१. थुंकी तपासणी (बेडका) : सर्वात खात्रीशीर, कमी खर्चाची पद्धत. संशयित रुग्णाच्या थुंकीचे तीन नमुने तपासण्यात येतात.
०२. ‘क्ष-किरण’ तपासणी (X-Ray) : छातीचा एक्स-रे काढून करतात. वरील तपासणीपेक्षा कमी खात्रीशीर. विशिष्ट तज्ञांची आवश्यकता असते.
प्रतिबंधक लस
० ते १ वर्ष बालकांना क्षयरोग प्रतिबंधक लस टोचण्यात येते. त्या लसीला ‘बी.बी.सी’ (बॅसिलस कॉलमेटग्युरिन) असे म्हणतात. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम १९६२ साली सुरू करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये एक्स-रे तपासणीवर जास्त भर होता तसेच औषधोपचाराचा कालावधी जास्त होता.(दीर्घ मुदतीचा)
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (RNTCP) सन १९९२-९३ मध्ये सुरू करण्यात आला.
क्षयरोग औषधोपचार
सुधारित कार्यक्रमामध्ये क्षय रुग्णांना प्रत्यक्ष देखरेखीखाली चार प्रकारच्या गोळ्या तसेच ‘स्ट्रेप्टोमायसीन’ हे इन्जेक्शन देण्यात येते.
०१. सदर औषधोपचार पद्धतीला डॉट्स (DOTS) असे म्हणतात.
०२. DOTS – Directly Observed Treatment With Short Cource Cheniotherapy (प्रत्यक्ष निरीक्षणाखाली दिलेल्या अल्प मुदतीचा क्षयरोग औषधोपचार)
जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.