भारतातील प्रमुख नद्या

भारतातील प्रमुख नद्या

०१. गोदावरी

उगम
त्र्यंबकेश्वर १,६२० मी.
उपनद्या
उजव्या तिराने :- दारणा, प्रवरा, मुळा, बोरा, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, सरस्वती.
डाव्या तिराने :- कादवा, शिवना, खाम, खेळणा
वैशिष्ट्ये
मुख- काकिनाडा (बंगालचा उपसागर )
लांबी- १,४६५ कि.मी.
सरासरी प्रवाह– ३,५०५ मी³ /से
पाणलोट क्षेत्र- ३,१९,८१० किमी²
धरण– गंगापूर (नाशिक ), नांदूर मधमेश्वर ( नाशिक ), डौलेश्वरम

०२. भीमा नदी

उपनद्या
उजव्या तिराने :- भामा, इंद्रायणी, मुळा-मुठा, पवना, वेळ, क-हा, नीरा, माण, बोर.
डाव्या तिराने :- कुकडी, पुष्पावती, मीना, घोड, भोगावती, बोर

०३. कृष्णा नदी

उगम
धोममहाबळेश्वर.
उपनद्या
उजव्या तिराने :- कोयना, वारणा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा, घटप्रभा, ताम्रपणी..
डाव्या तिराने :- येरळा, नंदला, अग्रणी
वैशिष्ट्ये
गोदावरी & कावेरी यादरम्यानची प्रमुख नदी.

०४. तापी नदी

*उगम*
मध्य प्रदेशात बेतूल जिल्ह्यात मुलताई
*उपनद्या*
उजव्या तिराने:– चंद्रभागा, भुलेश्वरी, नंद, वान, गोमई.
डाव्या तिराने:– कापरा, सिपना, गाडगी, डोलर, (अमरावती जिल्ह्यातील तापीच्या उपनद्या) पेढी, काटेपुर्णा, मोरणा, मण, नळगंगा, बिसवा, वाघुर, गिरणा (अरम, लितूर, मोसम) बोरी, पांझरा, बुराई.

०५. नर्मदा नदी

*उगम*
अमरकंटक पठारावर
*उपनद्या*
उजवा किनारा : हिरण, बरना, कोलार, ओसरंग.
डावा किनारा : बु-हनेर, बंजार, शेर, शक्कर, गंजाल, तवा कुंडी.
*वैशिष्ट्ये*
नंदुरबार जिल्ह्याची वायव्य सरहद्द.
संगम : अरबी समुद्रास खंबायतच्या आखातात.
पश्चिमवाहिनी सर्वात मोठी नदी. खचदरीतून प्रवाह मार्ग.
मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्र, गुजरात. उड्या मारत जाणारी नदी

०६. गंगा नदी

*उगम*
उत्तराखंडात उत्तर काशी जिल्ह्यात गंगोत्री हिमनदीपासून (७०१० मी) भगीरथी आणि देवप्रयाग येथे अलकनंदापासून ‘गंगा’ नावाचा प्रवाह.
गंगेच्या प्रवाहाची निर्मीती :- भगीरथी व अलकनंदा नद्यांच्या संयुक्त प्रवाहास गंगा.
भगीरथी :- गंगोत्री हिमनदीची हिमगुहा.
अलकनंदा :- तिबेट सरहद्दीजवळ अलकनंदा शीर्षप्रवाहाचा उगम. विष्णुगंगा व धौलीगंगा यांचा एकत्रीच प्रवाह अलकनंदा.
*उपनद्या*
डावा किनारा :- रामगंगा, गोमती, तमसा किंवा पुर्व तोन्स, घाघरा (शरयू), गंडकी, बुरी गंडक, कोसी, महानंदा..
उजवा किनारा :- यमुना (उपनद्या चंबळ, सिंद, बेटवा, केन) ; शोण, दामोदर.
*वैशिष्ट्ये*
त्रिभुज प्रदेश :- प. बंगाल व बांग्लादेशात गंगा-ब्रम्हपुत्रा त्रिभुज प्रदेश.

गंगा उत्तर भारताच्या विशाल पठारावरून वाहत बंगालच्या उपसागराला बऱ्याच शाखांमध्ये विभाजित होऊन मिळते. यामध्ये एक शाखा हुगळी नदी आहे जी कोलकाता जवळून वाहते, दुसरी शाखा पद्मा नदी बांगलादेशात प्रवेश करते.

गंगा नदीची पूर्ण लांबी जवळजवळ २५०७ किलोमीटर आहे.
अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत गंगा नदी बंगालच्या उपसागरास मिळत होती तर ब्रह्मपुत्रा नदी काही कि.मी. पूर्वेस स्वतंत्रपणे मिळायची. साधारण अठराव्या शतकाच्या अखेरीस ब्रह्मपुत्राने पूर्वेस वळण घेतले व आता दोन्ही नद्यांचा अरिचा येथे संगम होतो. या बदलास १८९७चा भूकंप काही अंशी कारणीभूत होता.
गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशाला सुंदरवन असे म्हणतात. येथे बऱ्याच वनस्पती आणि बंगाली वाघ आढळतात.
डॉल्फिनच्या दोन जाती गंगेमध्ये सापडतात. त्यांना गंगा डॉल्फिन आणि इरावदी डॉल्फिन या नावाने ओळखले जाते.
याशिवाय गंगेमध्ये असलेले शार्कसुद्धा प्रसिद्ध आहेत

०७. यमुना नदी

*उगम*
उत्तराखंडात उत्तर काशी जिल्ह्यात जन्मोत्री हिमनदी.
*उपनद्या*
डावा किनारा :- तोन्स, कार्वान, सेंगर.
उजवा किनारा :- गिरी, बाणगंगा, चंबळ, सिंद, बेटवा, केन
*वैशिष्ट्ये*
गंगानदीची सर्वात लांब आणि महत्त्वाची उपनदी यमुना नदी..
बहुतेक प्रवाह गंगेला समांतर
संगम – गंगा & यमुनेचा संगम अलाहाबाद (प्रयाग).

०८. शोण नदी

*उगम*
अमरकंटक पठार (६००मी)
*उपनद्या*
जोहिला, गोपत, रिहांद, कनहार, & उत्तर कोयल.
*वैशिष्ट्ये*
संगम :- मनेर (पाटणा) येथे गंगा-शोण संगम.

०९. दामोदर नदी

*उगम*
छोटा नागपुर पठार (झारखंड) बाजुमथाजवळ..
*उपनद्या*
गरटूस, कोनार, जमुनिया, बरकार.
*वैशिष्ट्ये*
संगम :- प. बंगालमध्ये कोलकत्याच्या खाली ५६ किमी अंतरावर गंगेचा उपफाटा हुगळी नदीस मिळतो.

१०. रामगंगा नदी

*उगम*
उत्तराखंडात गढवाल जिल्ह्यात नैनीतालजवळ.
*उपनद्या*
खोह, गंगन, अरिलकोसी, देओहा

११. गोमती नदी

*उगम*
पिलीभितच्या पुर्वेस.
*उपनद्या*
गोचाई, जोमकी, सई, बरमा, सरया, चुहा.
*वैशिष्ट्ये*
संगम :– उत्तर प्रदेशात गाझियापुर जिल्ह्यात सैदपुर येथे गंगा-गोमतीचा संगम.

१२. घाघरा नदी

*उपनद्या*
रापी, शारदा.
*वैशिष्ट्ये*
तिबेटमध्ये मान सरोवराच्या दक्षिणेस गुरला मधंता शिखराजवळ गंगा नदीच्या उगमाच्या पुर्वेस संगम.

१३. गंडकी नदी

*उगम*
दक्षिणेस तिबेटमध्ये मध्य हिमालयात.
*वैशिष्ट्ये*
संगम :- पाटण्याजवळ गंगा-गंडकी संगम

१४. कोसी नदी

*उगम*
ट्रान्स हिमालयात हिमनदीमधुन.
*उपनद्या*
सतकोसी, तंबाकोसी, तलखा, दुधकोसी, बोतीया कोसी, अरुण. तांबर
*वैशिष्ट्ये*
बिहारच्या दुःखाश्रूंची नदी.
संगम :– बिहारमध्ये पूर्णिया जिल्ह्यात गंगा-कोसी संगम

१५. साबरमती नदी

*उगम*
राजस्थानात अरवली रांगेच्या मेवाड टेकड्यांमध्ये.
*उपनद्या*
साबर, हाथमती, सेदही, वाकुल, हरनव, मेशवा, वतरक.
*वैशिष्ट्ये*
संगम : खंबातचे आखात

१६. मही नदी

*उगम*
विंध्य पर्वत, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात.
*उपनद्या*
सोम, अनास, पनाम.
*वैशिष्ट्ये*
संगम : खंबातचे आखात

१७. लुनी नदी

*उगम*
राजस्थानात अजमेरच्या उत्तरेस
*उपनद्या*
सरसुती.
*वैशिष्ट्ये*
संगम : कच्छच्या रणाच्या दलदलीच्या प्रदेशात विलीन

१८. कावेरी नदी

*उगम*
कर्नाटक राज्याच्या कूर्ग जिल्ह्यातील ब्रम्हगिरी डोंगरावर.
*उपनद्या*
ककब्बे, सुवर्णवती, हेमावती, शिम्शा, कर्णावली, कब्बनी, भवानी
Scroll to Top