२. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (दिल्ली) विमानतळाला जगातील सर्वातकृष्ट विमानतळाचा पुरस्कार मिळाला.
३. डॉ. प्रमोद पाटील यांना लंडनमधील व्हाइटली फंड फॉर नेचर या संस्थेचा “ग्रीन ऑस्कर‘ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
४. “फाईट ऑफ दी सेन्च्युरी‘ असे वर्णन करण्यात आलेल्या जागतिक वेल्टरवेट विजेतेपदाच्या बॉक्सिं ग लढतीत फ्लॉइड मेवेदर’ याने विजय मिळवला.
५. ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायती महत्त्वाची भूमिका बजावू शकतात,त्यामुळे येत्या काळात लहान ग्रामपंचायतींना 15 लाख, तर मोठ्या ग्रामपंचायतींना एक कोटीपर्यंतचा निधी देण्यात येणार आहे.
६. क्रिस्टल पॅलेसचा १-० ने पराभव करत चेल्सी संघाने इंग्लिश प्रिमियर लीगचे जेतेपद पटकावले.
७. भारतीय रेल्वेसंघाने 2015 मधील पुरुष राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप जिंकली.
८. न्यूयॉर्क शहरातील पहिली न्यायाधीश म्हणून राजा राजेश्वरी या पहिल्या भारतीय स्त्री ची नेमणूक करण्यात आली आहे.
९. रशियाचे प्रोग्रेस एम २७ एस हे १० टन वजनाचे मालवाहू निर्मनुष्य अवकाशयान उड्डाणानंतर भरकटल्याने पृथ्वीच्या दिशेने कोसळले आहे. यानाचे २९ एप्रिलला सोयुझ अग्निबानाने उड्डाण करण्यात आले होते.
– आतापर्यंतच्या दुर्घटना
१९७७ – कोस्मोस ९५४
१९७९ – स्कायलैब, ७७ टन वजनाची रशियाची प्रयोगशाळा हिंदी महासागरात कोसळली.
१९८६ – २८ जानेवारी १९८६ अमेरिकेचे चैलेंजर यान फ्लोरीडाजवळ अटलांटिक
महासागरात कोसळले. ७ अवकाशवीरांचा मृत्यू.
२००३- १ फेब्रुवारी २००३, अमेरिकेचे कोलंबिया यान दुर्घटनाग्रस्त. ७ अवकाशवीरांचा मृत्यू.
१०. चालू वर्षात सोन्याची आयात वाढली आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये रिजर्व बँकेने सोन्याच्या आयातीवरील निर्बंध कमी केले आहेत.
११. भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष (All India Football Federation) प्रफुल्ल पटेल यांची आशियायी फुटबॉल महासंघाच्या (Asian Football Confederation) उपाध्यक्षपदी निवड.
१२. राज्य शासनाकडून दिला जाणारा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांना जाहीर तर विशेष योगदान पुरस्कार विद्या बालन यांना जाहीर.
१३. तर व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सिने छायाचित्रकार सुर्यकांत लवांदे यांना तर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना प्रदान करण्यात येणार आहे.
१४. ‘भारत-बांगलादेश जमीन सीमा करार’ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी. हे 119वे घटनादुरुस्ती विधेयक असून, त्यात दोन्ही देशांनी आपापल्या ताब्यातील अनेक भाग परस्परांना सोपविण्याची तरतूद आहे. दोन वर्षांपूर्वी (2013) हे विधेयक सर्वप्रथम राज्यसभेत मांडण्यात आले होते.
१५. ‘भारत-बांगलादेश जमीन सीमा करार’ (एलबीए) विधेयकात दोन्ही देशांतील एकमेकांच्या हद्दीतील दोन्ही देशांच्या सुमारे 161 तुकड्यांत विखुरलेल्या भूभागांच्या परस्पर आदान-प्रदानाची तरतूद आहे. यात आसाम, पश्चिम बंगाल, त्रिपुरा व मेघालय ही राज्ये येत आहेत.
१६. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी १०० स्मार्ट शहरे बनविण्याच्या प्रकल्पाला मंजुरी व ही योजना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने चालविण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे.
१७. नेपाळमध्ये पंचायत राज व्यवस्था सुरू झाल्यानंतरचे पहिले पंतप्रधान व १९६३ ते २००४ या दरम्यान पाचवेळा पंतप्रधान झालेल्या सूर्य बहादूर थापा या माजी पंतप्रधानांचे नुकतेच निधन झाले आहे.
१८. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “ड्रीम प्रोजेक्ट‘ असणाऱ्या स्मार्ट शहरांच्या उभारणीला आता हिरवा कंदील मिळाला असून, देशातील पहिली स्मार्ट सिटी साबरमती नदीच्या तीरावर-गुजरात येथे तयार करण्यात येणार आहे.
१९. देशातील स्मार्ट शहरांच्या उभारणीसाठी सरकारने 60 अब्ज रुपयांची अर्थसंकल्पी तरतूद केली आहे.या स्मार्टसिटीला ‘गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (गिफ्ट)’ असे नाव देण्यात आले असून, हे शहर मोठे आर्थिक केंद्रही असेल. ‘आय. एल. अँड एफ. एस. इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन’च्या सहकार्याने या शहराची उभारणी केली जात आहे.
२०. गुजरातचे माजी मुख्य सचिव आचल कुमार ज्योती यांची निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक. १९७५ च्या IAS बॅचचे अधिकारी आहेत. १९९९ ते २००४ या काळात ते कांडला या बंदराचे अध्यक्ष होते
२१. स्वामी चिन्मयानंद यांच्या स्मृती प्रित्यर्थ, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नाण्याचे प्रकाशन. स्वामी चिन्मयानंद यांचा जन्म ८ मे १९१६ रोजी झाला. त्यांचे मुऴ नाव बाळकृष्ण मेनन असे होते. ते भग्वत गीता व उपनिषिदांचे अभ्यासक होते
२२. डॉ. अमलेंदू गुहा यांचा मृत्यू, ते एक प्रसिद्ध इतिहासकार होते. राज्याच्या सामाजिक-आर्थिक घटनेवर आधारित ‘Planter Raj to Swaraj: Freedom Struggle and Electoral Politics in Assam’ हे त्यांनी लिहिलेले एक प्रसिद्ध पुस्तक.
२३. यंदाचा आबेल पुरस्कार अमेरिकेचे श्रेष्ठ गणितज्ज्ञ जॉन नॅश आणि कॅनडाचे लुईस निरेनबर्ग यांना विज्ञानात हरघडीला उपयोगी पडणाऱ्या ‘पार्शल डिफरन्शियल इक्वेशन’च्या सखोल संशोधनाबद्दल जाहीर झालाय. त्याचं वितरण नॉर्वेचे राजे हेराल्ड यांच्या हस्ते ऑस्लोमध्ये १९ मे रोजी केले जाईल.
२४. जॉन नॅश यांना अर्थशास्त्रामधील नोबेल मेमोरियल ॲवॉर्ड १९९४ मध्ये मिळाला होता. जॉन नॅश यांच्यावर आधारित ‘ए ब्यूटिफुल माइंड‘ हा चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला आणि तो गाजला.त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह चार अकादमी ॲवॉर्ड मिळाली!