अर्थव्यवस्थेचे स्वरूप

अर्थव्यवस्थेचे स्वरूप

अर्थव्यवस्थेचे स्वरूप

अर्थव्यवस्था (Economics) हे एक प्रकारचे सामाजिकशास्त्र (Social Science) आहे. अर्थशास्त्र वस्तू आणि सेवा यांच्या उत्पादन, वितरण आणि वापराचे विश्लेषण करते.

अॅडम स्मिथ यांच्या मते – ‘अर्थशास्त्र म्हणजे राष्ट्राच्या संपतीच्या स्वभाववैशिष्ट्यांची आणि कारणांची चिकित्सा होय.’

अर्थशास्त्र हि संज्ञा (OIKONOMIA) या ग्रीक शब्दापासून बनली आहे.

स्कॉटलंड चे एडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. त्यांच्या १७७६ साली प्रकाशित झालेल्या (Wealth Of Nations) या पुस्तकानुसार ‘अर्थशास्त्र‘ हे एक संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र आहे.

प्रा. आल्फ्रेड मार्शल यांच्या १८९० साली प्रकाशित झालेल्या (Principle Of Economics) या पुस्तकानुसार अर्थाशास्त्र हे मानव कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे.

लिओनेल रोबिन्स यांच्या १९३२ साली प्रकाशित झालेल्या ‘Nature and Significance Of Economics) या पुस्तकानुसार अनंत गरजा आणि मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ साधताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय.

अर्थव्यवस्थेचे भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था असे तीन प्रमुख प्रकार पडतात.

१९९९ च्या जागतिक बैंक च्या ‘द इस्ट एशियन मिरकल’ या रिपोर्ट मध्ये एकीकडे अर्थव्यवस्थेत सरकारी हस्तक्षेप न करण्याची समीक्षा केली तर ‘मिश्र अर्थव्यवस्थे’ला उत्तम विकल्प म्हटले गेले.

अर्थव्यवस्थेची महत्वाची वैशिष्ट्ये

०१. विशिष्ट भौगोलिक क्षेत्र
०२. नैसर्गिक साधनसामग्री
०३. राजकीय सार्वभौमत्व
०४. क्षेत्रीय विभाजन
०५. लोकसंख्या
———- पर्याप्त लोकसंख्या : हि देशातील लोकसंख्येचे आदर्श आकारमान दर्शवते. याबाबतीत देशातील उपलब्ध साधनसामग्रीचा परिपूर्ण वापर केला जातो.
———- अतिरिक्त लोकसंख्या : पर्याप्त लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या म्हणजे अतिरिक्त लोकसंख्या होय. त्यामुळे उपलब्ध साधनसामग्रीवर ताण पडतो.
———- कमी लोकसंख्या : हि अशी स्थिती असते कि ज्यात उपलब्ध साधनसामग्रीचा पूर्ण वापर करण्यासाठी लोकसंख्या पुरेशी नसते.

अर्थव्यवस्थेची क्षेत्रे ( क्षेत्रीय विभाजन )प्राथमिक क्षेत्र

हे क्षेत्र नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारलेले क्षेत्र आहे. उदा. शेती, खाणकाम, पशुपालन इत्यादी
१९५०-५१ मध्ये भारताच्या जीडीपी मध्ये प्राथमिक क्षेत्राचा ५९% हिस्सा होता. तर २०१२-१३ मध्ये भारताच्या जीडीपी मध्ये १९.९% हिस्सा होता.

द्वितीयक क्षेत्र

कच्च्या मालावर प्रक्रिया करून नवीन उत्पादन निर्माण करणाऱ्य क्षेत्राला द्वितीयक क्षेत्र म्हणतात.
कापड उद्योग, साखर कारखाना इत्यादी याची उदाहरणे आहेत.
१९५०-१९५१ मध्ये भारताच्या जीडीपी मध्ये याचा १३% हिस्सा होता. तर २०१२-२०१३ मध्ये भारताच्या जीडीपी मध्ये २३.८% हिस्सा होता.

तृतीयक क्षेत्र

यामध्ये प्राथमिक व द्वितीयक क्षेत्रांना पूरक असणाऱ्या सेवांचा समावेश होतो.
पतपुरवठा, व्यापार, दळणवळण,होटल व्यवसाय ही याची उदाहरणे आहेत
१९५०-१९५१ मध्ये याचा भारताच्या जीडीपी मध्ये २८% हिस्सा होता. तर २०१२-२०१३ मध्ये भारताच्या जीडीपी मध्ये ५६.३% हिस्सा होता.

चतुर्थक क्षेत्र

उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर ज्या व्यवसायामध्ये करण्यात येतो व जे व्यवसाय ज्ञानाशी संबंधित असतात त्यांचा या क्षेत्रात समावेश होतो.
संशोधन व विकास, माहिती तंत्रज्ञान. ही याची उदाहरणे आहेत.

पंचम क्षेत्र

काही तज्ञांच्या मते पंचम क्षेत्र हे चतुर्थक क्षेत्राचा एक हिस्सा असतो. पण यामध्ये अर्थव्यवस्थेतील सर्वोच्च स्तरावरील निर्णय निर्धारकांचा समावेश होतो.
सरकार, विद्यापीठे, गैर सरकारी संस्था, प्रसार माध्यमे. यांचा यांच्यात समावेश होतो.

मालकीनुसार अर्थव्यवस्था क्षेत्रे

सार्वजनिक क्षेत्र

मालकी व्यवस्थापन व नियंत्रण सरकारचे.
उदा. रेल्वे, दूरदर्शन, भेल

खाजगी क्षेत्र

मालकी व्यवस्थापन व नियंत्रण खाजगी व्यक्तींचे
उदा. रिलायंस, टाटा

संयुक्त क्षेत्रे

सरकार तसेच खाजगी व्यक्ती समूहाची मालकी
उदा. मारुती, महावितरण

सहकार क्षेत्र

खाजगी क्षेत्राचा एक विशेष प्रकार
मालकी खाजगी पण व्यक्ती ऐवजी समूहाची
एक सभासद एक मत
उदा. सहकारी संस्था, साखर कारखाने

क्षेत्रावर आधारित अर्थव्यवस्थांचे प्रकार

कृषक अर्थव्यवस्था

देशाच्या एकूण जीडीपी मध्ये प्राथमिक अथवा कृषी क्षेत्राचा हिस्सा ५०% व त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला ‘कृषक अर्थव्यवस्था’ असे म्हणतात.
स्वातंत्र्यानंतर भारताचा समावेश यात होता.
सध्या जीडीपी मध्ये कृषी क्षेत्राचा हिस्सा १८% पर्यंत घसरला आहे. परंतु भारताची ६५% लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रावर निर्भर आहे.

औद्योगिक अर्थव्यवस्था

देशाच्या एकूण जीडीपी मध्ये द्वितीयक क्षेत्राचा हिस्सा ५०% व त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला ‘औद्योगिक अर्थव्यवस्था’ असे म्हणतात.
या स्थितीत भारत अजूनपर्यंत पोहोचला नाही.

सेवा अर्थव्यवस्था

देशाच्या एकूण जीडीपी मध्ये तृतीयक अथवा सेवा क्षेत्राचा हिस्सा ५०% व त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला ‘सेवा अर्थव्यवस्था’ असे म्हणतात.
यासोबत त्यामात्रेत लोकसंख्याही तृतीय क्षेत्रावर निर्भर असावी.
१९९९-२००० नंतर भारताच्या जीडीपी मध्ये सेवा क्षेत्राचा हिस्सा नेहमी ५०% पेक्षा जास्त राहिला आहे. मात्र लोकसंख्येच्या केवळ १७% लोकसंख्या यावर निर्भर आहे. म्हणून भारताला द्विधा अर्थव्यवस्था म्हणतात.

वितरण प्रणाली

बाजार वितरण प्रणाली

यांच्यात वस्तूचे वितरण बाजार संस्था करतात.
भांडवलशाही अर्थव्यवस्थेत सर्व वस्तूचे वितरण याने होते.

गैर बाजार वितरण प्रणाली

यांच्यात बाजाराची भूमिका नसते.
समाजवादी अर्थव्यवस्थेची वितरण प्रणाली याच प्रकारची असते.
परंतु आज जवळ जवळ सर्वच अर्थव्यवस्था मध्ये या वितरण प्रणालीचे अस्तित्व आहे.
उदा. भारतातील औषध, शाळा, यांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधा.

मिश्रित प्रणाली

यात काही वस्तूचे वितरण सरकारमार्फत तर काहीचे खाजगी संस्थामार्फत होते.
याला भारतात ‘सार्वजनिक वितरण प्रणाली’ या नावानेसुद्धा ओळखतात.
सरकारद्वारा दिली जाणारी सबसिडी याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.

 

Scroll to Top