पृथ्वीचे अंतरंग

पृथ्वीचे अंतरंग

पृथ्वीचे अंतरंग

पृथ्वीच्या आंतरंगाचे तीन भाग मानले जातात.

०१. भूकवच

०२. प्रावरण
०३. गाभा

भूकवचाच्या खालील भागास प्रावरण म्हणतात.

भूकवच व त्यालगतचा प्रावरणाचा भाग यांस शिलावरण असे म्हणतात.  शिलावरणाची जाडी सुमारे १०० सेमी आहे.
भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी आढळत नाही.(सरासरी जाडी ३० सेमी.) 

भूकवचाच्या वरच्या भागाला सियाल असे म्हणतात. या खडकांमध्ये प्रामुख्याने सिलिका व अल्युमिनिअमचे प्रमाण आढळते.

सियालच्या खालील थरास सायमा असे म्हणतात. बहुतांश सागरतळ या थराने बनलेला आहे. या थरातील खडक सिलिका व मेग्नेशिम च्या संयुगाने बनलेले आहे. यास सिमा म्हणतात. भूकवचाच्या खालील प्रावरणाच्या थराची जाडी २८७० किमी आहे. प्रावरण लोह व मॅग्नेशियमच्या संयुगाने तयार झालेले आहे. प्रावरणालाच मध्यावरण असे म्हणतात. पृथ्वीचा ८०% भाग प्रावरणाने व्यापला आहे.

प्रवरणाच्या खाली गाभा असून त्याची जाडी ३४७१ किमी आहे. या थराचे बाह्यगाभा वअंतर्गाभा असे दोन भाग पडतात. बाह्य गाभा द्रवरूप तर अंतर्गाभा घनरूप आहे. अंतर्गाभ्यामध्ये निकेल व लोहखनिजाचे प्रमाण जास्त आढळत असल्यामुळे यास NIFE असे म्हणतात. पृथ्वीचा १९% भाग गाभ्याने व्यापला आहे. पृथ्वीच्या एकूण वस्तुमानापैकी एक तृतीयांश वस्तुमान गाभ्याने व्यापले आहे.

भूकवचाला पृष्ठावरण हे सुद्धा नाव आहे. १९६० मध्ये हेरीहेसने पृथ्वीच्या अंतरंगासंदर्भात सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला.

१९६५ मध्ये ह्युजो विल्सनने सिद्धांत मांडला. त्यास प्लेटविवर्तनिकी सिद्धांत असे म्हणतात.

यानुसार एकूण ६ मोठ्या प्लेट्स व १४ छोट्या प्लेट्स आहेत.  ‘अस्थेनोस्फीअरस’ या द्रव्यावर्ती या प्लेट्स तरंगत आहेत. या प्लेट सरासरी एका वर्षाला १० सेमी सरकत असतात.

०१. अमेरिकन प्लेट
०२. पॅसिफिक प्लेट
०३. युरेशिअन प्लेट
०४. आफ्रिका प्लेट
०५. इंडो-ऑस्ट्रेलिया प्लेट
०६. अटलांटिक प्लेट

२०० दशलक्ष वर्षापूर्वी सर्व प्लेट्स एकत्रित होत्या. त्याला त्यांनी ‘पँजिया‘ हे नाव दिले होते. त्याच्या बाजूला असणाऱ्या समुद्राला ‘पॅन्थालस‘ हे नाव देण्यात आले होते.

१८० दशलक्ष वर्षापूर्वी पँजियाचे विभाजन झाले. उत्तरेकडे अंगारालैंड व दक्षिणेकडे गोंडवानालैंड असे दोन भूभाग झाले. दोघामधील दरीला ‘टेथिस दरी’ असे नाव देण्यात आले.

भारत हा त्यावेळी दक्षिण गोलार्धात होता. दरवर्षी भारतीय भूमी उत्तरेकडे १० सेमी सरकत आहे.

याचमुळे १२० दशलक्ष वर्षापूर्वी बृहदहिमालयाची निर्मिती झाली. २५ ते ४५ दशलक्ष वर्षापूर्वी मध्य हिमालयाची निर्मिती झाली. २ ते १२ दशलक्ष वर्षापूर्वी शिवालिक टेकड्यांची निर्मिती झाली.पृथ्वीचे तापमान दर ३० मी खोलीला १°C ने वाढते.

पृथ्वीचे तापमान

खोली (किमी)तापमान (से.)
३०५००
२००१४००
१०००१७००
३०००२३००
६०००२५०००

पृथ्वीच्या अंतरंगातील दाब

खोली (किमी)वातावरण दाब
समुद्रसपाटी
२५००१० लाख
३५००२० लाख
६३७१३५ लाख

पृथ्वीची घनता

संपूर्ण पृथ्वीची सरासरी घनता ५.५ घ.से.मी आहे

खोली (किमी)घनता (घ.से.मी.)
३०-४०२.७-३.३
४०-७००३.३-४.३
७००-२९००४.३-५.५
२९००-५१५०१०-१२
५१५०-६३७११३.३-१३.६

भूकंपलहरी

प्राथमिक लहरी
– अनुतरंग लहरी, अपकर्षण लहरी, अनुप्रस्थ लहरी, P-Waves
– दिशा आडव्या दिशेतून
– सर्वाधिक वेग ८ ते १४ किमी/सेकंद
– सर्वात कमी विध्वंसक
– घन व द्रव्य माध्यमातून प्रवास करतात
– प्राथमिक लहरी ध्वनी लहरी प्रमाणे सम्पीडन लहरी असून, कणाचे कंपन संचलन दिशेने होते

दुय्यम लहरी

– अवतरंग, अनुलंब, S-Waves
– उभ्या दिशेने प्रवास करतात
– याचा वेग ४ ते ८ किमी/सेकंद
– फक्त घन माध्यमातून प्रवास करतात
– या लहरी प्राथमिक लहरीपेक्षा जास्त विध्वंसक परतू भूपृष्ठ लहरीपेक्षा कमी विध्वंसक असतात.

भूपृष्ठ लहरी

– पृष्ठ तरंग, रेखावृत्तीय लहरी, L-Waves
– या पृथ्वीच्या पृष्ठभागावरून सागराच्या लहरीप्रमाणे प्रवास करतात.
– भूपृष्ठापासून अधिक खोलीतून प्रवास करत नाहीत.
– आरपार जात नाही तर पृथ्वी गोलाला फेरी मारतात.
– याचा आयाम उच्च असतो.
– भूपृष्ठ लहरीचे दोन प्रकार पडतात. १.लेरे २.लव्ह

शिलावरण

– पृथ्वीच्या सर्वात वरचा भाग.
– शिलावरणाची जाडी सुमारे १६ ते ४० किमी आहे.
– याचा २९% भाग जमिनीने तर ७१% भाग जलाने व्याप्त आहे.
– पृथ्वीच्या एकूण घनफळापैकी १% घनफळ शिलावरणाचे आहे.
– याचे दोन भाग पडतात सियाल व सायमा
– सियाल व सायमा यांच्यात कोनराड प्रकारची विलगता आहे.

सियाल

– भूकवचाच्या वरील भागाला सियाल असे म्हणतात.
– या खडकामध्ये प्रामुख्याने सिलिका व अलुमिनिअम चे प्रमाण आढळते.
– सियाल मध्ये ग्रेनाइट प्रकारचा खडक असतो.
– सियाल पासून भूमी खंडे बनतात.
– या थरात भूकंपाच्या प्राथमिक लहरी दर सेकंदाला ५.६ किमी तर दुय्यम लहरी दर सेकंदाला ३.२ किमी पेक्षा कमी वेगाने प्रवास करतात.

सायमा

– सियालच्या खालील थरास सायमा म्हणतात.
– बहुतांश सागरथळ या थराने बनलेला आहे.
– या थरातील खडक सिलिका व मेग्नेशिअमच्या संयुगाने बनलेले असते.  यांस सीमासुद्धा म्हणतात.
– याच्यात बेसाल्ट व गाब्रो प्रकारचे खडक आढळतात.
– भूकंपाच्या प्राथमिक लहरीचा वेग – ६.४ किमी/सेकंद ते ७.२ किमी/सेकंद
– भूकंपाच्या दुय्यम लहरीचा वेग – ३.२ किमी/सेकंद ते ४ किमी/सेकंद
– सायमा थरावर सियाल तरंगत आहे.
– सायमापासून महासागराची निर्मिती झाली आहे.

मोहविलगता
शिलावरण व प्रावरण यांच्या दरम्यान मोहविलगता आहे. मोहविलगतेचा शोध मोहविन्सेस या शास्त्रज्ञाने १९०९ मध्ये लावला.

प्रावरण

– ४२ ते २९०० किमी पर्यंत प्रावरणाचा भाग आहे.
– प्रावरणाच्या थराची जाडी सुमारे २८६० किमी आहे.
– शिलावरण आणि गाभा यांच्या दरम्यान प्रावरण आहे.
– प्रावरणामध्ये १०० ते २०० किमी अंतरावर एक ‘मंदगामी शंकूचा’ पट्टा आहे.
– प्रावरणामध्येच भूकंप आणि ज्वालामुखीचे केंद्र असतात.
– प्रावरण लोह व मॅग्नेशियम च्या संयुगाने तयार झालेले आहे.
– प्रावरण यालाच मध्यावरण असेही म्हणतात.
– पृथ्वीचा ८०% भाग प्रावरणाने व्यापला आहे.
– प्रावरणाचे दोन भाग पडतात. १.बाह्य प्रावरण २.आंतर प्रावरण
– बाह्य प्रावरण आणि आंतर प्रावरण यांच्यात रेपट्टी विलगता आहे.

बाह्य प्रावरण

– बाह्य प्रावरणात ओलीवील ६० ते ७०% असते.
– बाह्य प्रावरणात पायरोक्सीन १५ ते २०% असते.
– बाह्य प्रावरणाची खोली ४२ ते ७०० किमी आहे.

आंतर प्रावरण

– आंतर प्रावरणाची खोली ७०० ते २९०० किमी आहे.
– या ठिकाणी सिलिका व विविध ऑक्साइडे सापडतात.
– आंतर प्रावरणाचा खालचा भाग द्रायू स्वरुपात आढळतो.
-प्रावरण आणि गाभा यांच्या दरम्यान गटेनबर्ग विलगता आहे.

गाभा

– प्रावरणाच्या खाली गाभा असून याची जाडी ३४७१ किमी आहे.
– गाभ्याची खोली २९०० ते ६३७१ किमी
– या थराचे बाह्यगाभा व अंतर्गाभा असे दोन भाग पडतात.
– बाह्यगाभा द्रवरूप तर अंतर्गाभा घनरूप आहे.
– अंतर्गाभ्यामध्ये निकेल व लोह (फेरस) चे प्रमाण अधिक आढळत असल्याने यास निफे असेही म्हणतात. – पृथ्वीचा १९% भाग गाभ्याने व्यापला आहे.
– पृथ्वीच्या एकूण वस्तुमानापैकी एक तृतीयांश वस्तुमान गाभ्याने व्यापले आहे.
– गाभ्याचे दोन भाग पडतात. १.बाह्यगाभा २.आंतरगाभा
– बाह्यगाभा आणि आंतरगाभा यांच्यात लेहमन विलगता आहे.

बाह्यगाभा

– बाह्यगाभ्याची खोली २९०० ते ५१५० किमी
– बाह्यगाभा हा द्रवस्वरुपात आहे.
– बाह्यगाभ्यातून भूकंपाच्या दुय्यम लहरी प्रवास करू शकत नसल्याने हा भाग द्रव स्वरुपात आहे असे सांगितले जाते.

आंतर गाभा

– याची खोली ५१५० ते ६३७१ किमी
– हा गाभा घन स्वरूपाचा आहे, कारण यातून भूकंपाच्या प्राथमिक लहरी प्रवास करतात.
– चुंबकत्व, लवचिकपणा आणि लिबलिबीतपणा हे वैशिष्ट्यपूर्ण असे गुणधर्म या आंतरगाभ्याचे आहेत.
– निकेल आणि फेरस मोठ्या प्रमाणात सापडतात. ८०% निफे आणि २०% इतर ऑक्साइडे.
– घनता १३.३ ते १३.६ ग्राम/घसेमी
– तापमान २५०००°C

Scroll to Top