अंकगणितीय-क्रिया

अंकगणितीय क्रिया

जर भागिले म्हणजे वजा, गुणिले म्हणजे भागिले, बेरीज म्हणजे गुणिले आणि वजाबाकी म्हणजे बेरीज तर पुढील उदाहरण सोडवा?

4×2+3-4÷1-3
स्पष्टीकरण:-
अशा प्रकारच्या गणितीय क्रियांमध्ये विशेष असे काही  करण्याची गरज नाही. दिलेल्या निर्देशाप्रमाणे गणितीय चिन्हांचा बदल करावा. आणि उदाहरण सोडवावे.
उदाहरणे सोडविताना गणितीय नियमांचे पालन करावे.
सर्वप्रथम कंसातील उदाहरणे सोडवावीत. नंतर गुणाकार किंवा भागाकार यापैकी ज्या क्रिया प्रथम एसटीतील त्या सोडवाव्यात. सर्वात शेवटी बेरीज किंवा वजाबाकी यापैकी जी क्रिया प्रथम असेल ती सोडवावी.
चिन्हे बदलल्यानंतर नवीन समीकरण.
= 4÷2×3+4-1+3
= 2×3+4-1+3
= 6+4-1+3
= 10-1+3
= 9+3
= 12
जर x म्हणजे ÷, – म्हणजे x, ÷ म्हणजे +, + म्हणजे – या चिन्हांची परिभाषा वापरली तर पुढील उदाहरणे सोडवा?
(3-15÷11)x8+7
नवीन समीकरण
= (3×15+11)÷8-7
= (45+11)÷8-7
= 56÷8-7
= 7-7
= 0
8888+848+88-y=7337+737 तर y=?
8888+848+88-y=7337+737
9824-y=8074
9824-8074=y
1750=y
y=1750
खाली दिलेल्या समीकरणात बेरीज व भागिले हे चिन्ह तसेच 2 व 4 या संख्यांची अदलाबदल केल्यास कोणते समीकरण बरोबर येईल?
a] 2+4÷3=3
b] 4+2÷6=1.5
c] 4÷2+3=2
d] 2+4÷6=8
Option a]
2+4÷3=3
4÷2+3=3
2+3=3
5=3 (हा पर्याय चुकीचा आहे)
Option b]
4+2÷6=1.5
2+4÷6=1.5
2+0.67=1.5
2.67=1.5 (हा पर्याय चुकीचा आहे)
Option c]
4÷2+3=2
2+4÷3=2
2+1.34=2
3.34=2 (हा पर्याय चुकीचा आहे)
Option d]
2+4÷6=8
4÷2+6=8
2+6=8
8=8 (हा पर्याय बरोबरआहे)
जर a*b=a+b+√ab तर 8*32 ची किंमत किती?
a*b=a+b+√ab
8*32=8+32+√8×32
=8+32+√256
=8+32+16
=56
उदाहरणे सोडवा?
01) 1982+1345+736+y=4588+992 तर y=?
02) 16×12-672÷21=y-211 तर y=?
03) 54-[82-(73-(15-y))]=37 तर y=?
04) खालील समीकरण बरोबर येण्यसासाठी कोणती दोन गणितीय चिन्हे आपापसात बदलणे आवश्यक आहे?
12÷2-6×3+18=16
a. ÷ & +
b. – & +
c. x & +
d. ÷ & x
अंकगणितीय प्रकारातील गणिते सोडविताना सराव हेच प्रमुख अस्त्र आहे. यासाठी प्रभावी अशी कोणतीही ट्रीक नाही. तुम्ही जेवढा सराव करत जाल तेवढ्या वेगात तुम्ही या प्रकारची गणिते लवकर सोडवू शकाल.
परीक्षा ही वस्तुनिष्ठ असल्याने विद्यार्थ्याने येथे प्रत्येक पायरी सोडविण्याची गरज नाही. याकडे लक्ष द्यावे लागेल. अनेक विद्यार्थी परीक्षांमध्ये सुद्धा उगाचच कारण नसताना सर्व पायऱ्या लिहिताना दिसतात. त्याची काही आवश्यकता नाही.
सरावानंतर या प्रकारच्या गणितांसाठी जितक्या शक्य असतील तितक्या पायऱ्या गाळणे उत्तम. यामुळे तुमचा वेळ वाचेल व गणिते लवकर सोडविता येतील. मात्र हे केवळ वारंवार सरावानेच शक्य आहे. त्यामुळे याचा शक्य तितका जास्त सराव करावा.
उत्तरे:-
01) 1517
02) 371
03) 07
04) b. – & +
Scroll to Top